AGE 21 News

AGE 21 News AGE 21 NEWS is a Marathi News Portal & all type news,events,online web portal
कोकण तसेच संपूर्ण राज्य

 #वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत...
28/10/2024

#वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो, अशी गोमातेला प्रार्थना करुया.

वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

#शुभ #दीपावली #दिवाळी

आपट्याची पाने, झेंडुची फुलेघेवूनी आली विजयादशमीदसऱ्याच्या आज शुभ दिनीसुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनीदसऱ्यानिमित्त सर्वांन...
12/10/2024

आपट्याची पाने, झेंडुची फुले
घेवूनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#दसरा #विजयादशमी
21 News

ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी,तुकोबांनी रचिली गाथा,समृद्ध संपन्न झाली,माझी मराठी भाषा!आजचा दिवस सर्व मराठी भाषिकांसा...
03/10/2024

ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी,
तुकोबांनी रचिली गाथा,
समृद्ध संपन्न झाली,
माझी मराठी भाषा!

आजचा दिवस सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे!

#मराठीभाषा #अभिजात

लोकशाही 4 था खांब "पत्रकारिता"
26/09/2024

लोकशाही 4 था खांब "पत्रकारिता"

अरुण पाटील यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटपवैभववाडी दि.१५,:  कुर्ली गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्त्व...
15/08/2024

अरुण पाटील यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप

वैभववाडी दि.१५,: कुर्ली गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्त्व ,कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी सरचिटणीस अरुण शिवराम पाटील यांच्या सौजन्याने कुर्ली माध्यमिक विद्यालय च्या विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कुर्ली उत्कर्ष मंडळ ,मुंबई चे माजी अध्यक्ष प्रकाश सावंत,मुख्याध्यापक सुरेश देसाई,शिक्षिका कांबळे मॅडम,पाटील मॅडम,शिक्षक तावडे व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील दर वर्षी कुर्ली हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत.त्यांच्या या दानशूर व्यक्तीमहत्वा बाबत कुर्ली हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणीतो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवाबहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडीसर्व सुखाचे आगर ...
16/07/2024

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर

AGE 21 News

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन ! रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अखेर वर्ल्ड कप जिंकलाच !Proud of you indi...
29/06/2024

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अखेर वर्ल्ड कप जिंकलाच !

Proud of you indian cricket team ,
टी ट्वेण्टी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेवर मात करत दणदणीत विजय खेचून आणणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं मनःपूर्वक अभिनंदन!

#भारत #अभिनंदन

आज दी. २६ जून २०२४" छत्रपती शाहू महाराज यांना जयंती       निमित्त विनम्र अभिवादन 🌹🙏🏻"रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहू मह...
26/06/2024

आज दी. २६ जून २०२४
" छत्रपती शाहू महाराज यांना जयंती
निमित्त विनम्र अभिवादन 🌹🙏🏻"

रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज
प्रताप नाईक..!!

कोल्हापूर २५ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक., शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे..!

जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्च नीचतेविरुद्ध बंड पुकारुन सामाजिक समता स्थापन करणारा रयतेचा राजा अशी त्यांची ओळख...!!

अशा या थोर राजाची आज जयंती.शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला...!

वयाच्या विसाव्या वर्षी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी आपली सत्ता आणि शक्ती जनकल्याणासाठी राबवली...!!

शाहू महाराजांनी सत्तेला सेवेचं आणि ध्येयाचं साधन बनवलं...!
त्यामुळे ते समाजासाठी दिपस्तंभच होते असं इतिहास तज्ज्ञांचं मत आहे.,
त्यामुळे शाहू महाराजांना जनतेचा सेवक शिपाई किंवा शेतकरी म्हणून घेण्यात सार्थ अभिमान वाटत असे...!$

ते खरे लोकसेवक होते आणि त्याच नात्यानं त्यांनी लोक हितासाठी राज्यकारभार पाहिला. सामान्य माणूस जागा व्हावा आणि त्यांनी आपले हक्क मिळावेत अशी त्यांची इच्छा होती....!!

शिक्षण प्रसार आणि समान संधी हा त्यांच्या राज्यकारभाराचा मुख्य गाभा होता.
अशा या राजाला तिवार मानाचा मुजरा..🌹👏

25/06/2024
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी..सर्व श्री गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
25/06/2024

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी..
सर्व श्री गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!

 #कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाला येणार वेगमुंबई :- उन्हाळा आणि गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्याकरता हक्काचे ...
24/06/2024

#कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाला येणार वेग

मुंबई :- उन्हाळा आणि गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्याकरता हक्काचे कारण. यावेळेस भरभरुन कोकण रेल्वेतून प्रवासी कोकणात दाखल होतात. मात्र, कोकण रेल्वेने जायचं म्हटलं की प्रवाशांचे मोठेच हाल होतात. रेल्वेगाड्या उशिराने धावणं, जादा रेल्वेगाड्या नसणं, मर्यादित स्थानकांनाच थांबा असणं, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणं अशा समस्या प्रवाशांना भेडसावतात. या समस्यांवर मात करण्यासाठी कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाला दिला असून आता या कामाला वेग आला आहे. त्यामुळे यंदा गणपतीसाठी गावी जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे.
रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाला देण्यात आला आहे. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळे जादा गाड्या सोडता येतील व गाड्यांचा वेग वाढेल. कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर असा ७४० किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. कोकण रेल्वेवर रोहा ते वीर ४६.८ किमीच्या रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाबाबत जलदगतीनं पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होता.
उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलदगतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते. पण वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने, अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

कसे असेल दुहेरीकरण ?

सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, घाट, बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च ८० ते १०० कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालं असून त्यासाठी ५३० कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल. सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी ५५ रेल्वेगाड्या आणि १८ मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल.

कोकण रेल्वे सुरु होऊन ३१ वर्षे झाली. १९९८ पासून तर ती पूर्णपणे सुरु आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूने धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिथलं निसर्गसौंदर्य तुमच्या जवळ आणून ठेवतात. गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर ७४० किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे.

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा... या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छावटपोर्णिमानिमित्त सर्व माता भगिनींना मं...
21/06/2024

सण सौभाग्याचा,
बंध हा अतूट नात्याचा...
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपोर्णिमा
निमित्त सर्व माता भगिनींना मंगलमय शुभेच्छा..!
#वटपौर्णिमा

Address

Chembur
Mumbai
4000071

Alerts

Be the first to know and let us send you an email when AGE 21 News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share