OnlineMaharashtra.In

OnlineMaharashtra.In ||जय महाराष्ट्र||
या शब्दाचा अभिमान असेल तर लाईक करा
(1275)

मराठी असाल तर नक्कीच लाईक कराल पेज
चुकल तर वाट दावु पण,
आणि भुंकला तर वाट लावु पण"
आम्ही हवा करत नाही,
जर झालीच तर आम्हाला माहित नाही,
आम्ही फक्त माणतो शिवरायांना

10/05/2025

ना बिजली फ्री चाहिए, ना कर्जा माफ चाहिए
सारा पैसा लगा दो युद्ध में, हमे बस पाकिस्तान साफ चाहिए!

🤨अक्षय तृतीया  योगायोग 😂
30/04/2025

🤨
अक्षय तृतीया
योगायोग 😂

बाप, बाप होता है !______________शेजारच्या देशांतून टीव्ही फुटण्याचे किती आवाज आले माहीत नाही, पण तिथल्या प्रत्येक फॅनची ...
24/02/2025

बाप, बाप होता है !
______________

शेजारच्या देशांतून टीव्ही फुटण्याचे किती आवाज आले माहीत नाही, पण तिथल्या प्रत्येक फॅनची भावना मात्र हीच आहे, हे मी १०० % खात्रीने सांगू शकतो ! 'आंतरराष्ट्रीय आयसीसी स्पर्धा आणि भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भारत विजयी ' हा एक अलिखित नियम झालाय जणू! त्यामुळे प्रत्येक पाकिस्तानी फॅन मनोमन म्हणत असेल:

'' भैय्या, ये दु:ख काहे ख़त्म नहीं होता ? ''

आंतरराष्ट्रीय स्तरावरची अशी कोणतीही स्पर्धा असो सर्वात प्रमुख आकर्षण असतं ते भारत-पाकिस्तान सामन्याचं. सामन्याचा दिवस येईपर्यंत दावे-प्रतिदावे, विधानं-प्रतिविधानं अगदी मिम्स आणि प्रतिमिम्स या स्तरावर खेळाडू तसेच फॅन्स जोरजोरात लढत असतात. सामन्याचा दिवस उजाडतो, शक्यतो तो रविवार असतो, जसा काल होता... आणि मग फॅन्सचे डोळे टीव्ही,मोबाइलला चिकटतात. 'क्रिकेट' ही नशा असेल तर भारत-पाकिस्तान सामना हा या नशेचा परमोच्च बिंदू असतो. यमराज एखाद्याचे प्राण हरण करण्यास आले असतील तर तेसुद्धा कदाचित एखादी ओव्हर थांबतील इतकी या मॅचची उत्कंठा असते आणि कालचा सामना याला अपवाद नव्हता.

मस्त रविवार दुपारची वेळ आणि काही क्षणांत सुरू होणारा चॅम्पियन ट्रॉफीचा भारत-पाकिस्तान सामना... असं इक्वेशन असल्यावर आणखी काय पाहिजे ? अगदी वामकुक्षीपंथी माणसंही झोप आवरून सावरून बसली नाही तरच नवल! सामान्यत: भारताची पहिली बॅटिंग असावी अशी बहुतांश फॅन्सची इच्छा असते,कारण आपल्याकडे असणारे दिग्गज फलंदाज त्यावेळी चौखूर उधळत असतात, पण टॉस पाकिस्तानने जिंकून फलंदाजी घेतली.

गंमत बघा, भारत आणि रेकॉर्डस हे नातं हे अतूट असं आहे. आपण कशातही रेकॉर्ड करतो! आता टॉस हरण्याचं वगैरे रेकॉर्ड असू शकतं का ? हो, तेही आहे आणि चक्क ते भारताने आता आपल्या नावे केलं आहे ! आतापर्यंत भारत सलग 12 वेळा ( म्हणजे काल 12व्यांदा !) टॉस हरला आहे! यापूर्वी हा विक्रम नेदरलँडच्या नावावर (सलग 11 टॉस ) होता! क्रिकेट हा म्हणूनच रंजक खेळ आहे, इथे काहीही होऊ शकतं!

टॉस जिंकून पाकने बॅटिंग घेतली. बुमराहच्या गैरहजेरीत 'पेस अटॅक' ची धुरा शमीकडे होती. गेल्या काही महिन्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी की काय शमीने 12 चेंडूंची ओव्हर टाकली! गेल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या शमील लय सापडायला कठीण जातंय म्हटल्याबरोबर हुशार कप्तान रोहित शर्माने हार्दिक 7 व्या षटकातच पंड्याला बोलिंग दिली त्याने आपल्या दुसर्‍याच षटकात बाबर आजमला कराचीचा रस्ता दाखवला! इंझमाम उल हकचा वारसा चालवणार्‍या इमाम उल हकने रन आऊट होण्यातलं आपलं कौशल्य दाखवून भारतीयांना खुश केलं. पाकिस्तानची प्रगती 47 धावा आणि 2 बाद!

त्यानंतर आलेला रिझवान याने शकीलला सोबत घेत पाकिस्तान संघाची धावसंख्या वेगाने वाढणार नाही याची खबरदारी घेतली. सर्वात स्लो कोण खेळतंय याची निकोप स्पर्धाच जणू दोघांमध्ये सुरू होती. सगळं उत्तम सुरू असताना अचानक मेनकेप्रमाणे रवींद्र जडेजा त्यांचा तपोभंग करण्यासाठी आला आणि रिझवान महोदयांना नाईलाजास्तव चौकार मारावा लागला. धावांच्या मोहात पडून आपल्या हातून अक्षम्य अपराध घडल्याची जाणीव होताच त्याने त्वरित प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं आणि पंड्याच्या गोलंदाजीवर झेल काढून दिला, पण हाय रे दैवा ! नियतीला बहुधा ते मान्य नव्हतं. ही काही हर्षित होण्याची गोष्ट नव्हतीच! त्यामुळे पुढच्याच षटकात अक्षरश: त्याने आत्मक्लेश करून घेतला व बाद झाला. पुढे पाकिस्तानी फलदाजांनी आपल्या कप्तानाचा जमेल तेवढा मान राखत संघ धावसंख्या आटोक्यात ठेवली! याला म्हणतात शिस्त ! नाही म्हणजे नाही !49.4 षटकांत संघाची धावसंख्या सर्वबाद 241 धावा !

विदर्भ-मराठवाडाकडील मित्रांच्या तोंडून एक म्हण ऐकली आहे,

" बडी बडी बाते और वडापाव खाते .."

पाकिस्तानच्या बोलिंगबद्दल हेच म्हणता येईल. गोलंदाज वाईट आहेत असं नाही, पण आपल्याच मनात मांडे खात 'बेडकाला बैल' म्हणण्याची त्यांची वृत्ती काही जाता जात नाही आणि मग तोंडावर आपटतात.

समा टीव्ही नामक एका पाकिस्तानी वाहिनीवरील होस्ट समा म्हणते,


"आमची टीम अशीच आहे, आधी हरून घेते आणि मग टुर्नामेंट जिंकते !"

हे ऐकल्यावर लक्षात येतं, दोष टीमचा नाहीये, तिथल्या लोकांचाच आहे. पाक संघाबद्दल एक लोकप्रिय म्हणीच्या भाषेत थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचं तर,

'You get the team, you deserve !'

शाहीन, नसीम यांची जेवढी हवा सुरूवातीला झाली होती, तेवढा काही त्यांचा फुगा फुगला नाही, फुटला मात्र नक्की. रोहितने दणक्यात सुरुवात करून दिली आणि गिलने आपला फॉर्म पुन्हा दाखवून दिला. रोहित छोटीशी खेळी खेळून बाद झाल्यावर स्टेडीयममध्ये एकच गलका झाला, कारण फलंदाजीला येत होता, विराट कोहली !

गेले काही महिने विशेष बॅट न तळपलेला ( लोकांच्या मते ) विराट पाकिस्तान संघ समोर दिसला की खेळतोच हा इतिहास आहे. मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असतं, ते मोठ्या मॅचमध्ये आवर्जून खेळतात. त्यात समोर विराटचा आवडता संघ पाकिस्तान असल्यावर मग काय विचारूच नका. सामना सुरू झाला तेव्हा 14000 धावा पूर्ण करण्यासाठी विराटला 15 धावा हव्या होत्या. विराट लयीत आला आणि 14000 धावाही पूर्ण केल्या, त्यासुद्धा त्याच्या आणि सर्वांच्या लाडक्या कव्हर ड्राइव्हने ! तिथून विराट जो सुसाट सुटला तो पाकिस्तानला स्टेडीयमबाहेर घालवूनच थांबला !

विराटने टीकाकारांची तोंडं गप्प केलीच त्याशिवाय नसत्या तुलना करत बसणार्‍य पाकिस्तानी फॅन्सनाही जणू बॅटने दाखवून दिलं,

"बाप हमेशा बाप होता है ! "

त्याच्या प्रत्येक फटक्याने पाकच्या फॅन्सच्या पाठीवर वळ उठत होते. टी20 वर्ल्डकपमधील त्या ऐतिहासिक दोन षटकारांचे व्रण अजून ओले असताना नवे वळ देण्याची क्रूरता विराटची बॅट करत होती. संघाची धावसंख्या बरोबर हलती ठेवत पाकिस्तानी धावसंख्या, त्यांची निगेटिव्ह बोलिंग आणि हार्दिकची पंड्यागिरी या सर्व अडथळयांना लीलया पार करत 'किंग'ने पुन्हा शतक झळकावलं! कितवं ? 51 वं ! एकूण 82 वं !


पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान रोहित म्हणाला,

"त्या शतकाचं तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटलं असेल, आम्हाला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. तो काय आहे हे आम्हाला माहीत आहे !"

विराटने गेली अनेक वर्षं आपलं काम चोख केलं आहे आणि चेसिंग असेल तर विषयच संपला !

शोएब अख्तर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता,

"विराट फॉर्ममध्ये नाही वगैरे ठीक आहे, त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे आणि मग गंमत बघा !"

काल ती गंमत सगळ्या जगाने बघितली ! अनुभवली आणि त्याचा आनंदही घेतला! राजा हा राजा असतो. पाकिस्तानला लोळवण्यात विराटला वेगळीच मजा येत असावी. शतक झाल्यावरही त्याने जो इशारा केला त्यावरून सिद्ध होतं, तो शांत तर आहेच लोकांनाही सांगतोय, शतकं मारणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, तुम्ही फक्त शांत रहा.

कालच्या सामन्यात रोहित शर्माच्या कप्तानीनेही उत्तम भूमिका बजावली. योग्यवेळी योग्य गोलंदाज आणणे, क्षेत्ररचना करणे आणि कोंडीत पकडणे या गोष्टी त्याने अगदी शांत डोक्याने केल्या आणि पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या!

रो-को फॉर्ममध्ये आलेत लेको! तेही असे आलेत की तुमच्यातल्या उपेंद्र लिमयेला पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल,

''आता फक्त आपण धावा मोजायच्या !"

पुढचा सामना न्यूझीलंडशी आहे, तोही आपण जिंकूच. सेमीफायनलला पोचलोच आहोत, आता ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा !


अभिनंदन विराट 'द ओरिजनल किंग' कोहली ! अभिनंदन टीम भारत !

~ अनिल विद्याधर आठलेकर
Cp

#आठलेकरी

"छत्रपती संभाजी महाराज" हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. पहिल्या दिवसाचा तिसरा शो पाहतान...
16/02/2025

"छत्रपती संभाजी महाराज" हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. पहिल्या दिवसाचा तिसरा शो पाहताना तो सिनेमा नाही, तर साक्षात इतिहास जिवंत होत आहे, असेच जाणवत होते.

चित्रपट सुरू झाल्यापासून विकी कौशल फक्त एक अभिनेता वाटत नाही, तर तो संभाजी महाराजच भासतो.

त्याची देहबोली, चेहऱ्यावरचा करारी भाव, डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील स्वाभिमान – प्रत्येक क्षणी तो संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभं करतो.

युद्धाच्या प्रसंगात तलवारीचा चमकणारा वार, सिंहासारखी गरज, आणि शत्रूच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी नजर – हे सगळं पाहताना अंगावर शहारा येतो.

काही प्रसंग इतके प्रभावी आहेत की अश्रूंना वाट करून देणं अशक्य होऊन जातं.

हा फक्त सिनेमा नाही, ही तीव्र अनुभूती आहे!

चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे "छत्रपती संभाजी महाराज" हा चित्रपट. या सिनेमानंतर विकी कौशलच्या रूपातच संभाजी महाराज दिसतील, हे निश्चित!

साभार - परेश सुनील पाटील

मध्यरात्री चित्रपट संपला...छावा  कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते तशाच अवस्थेत बाहेर पडलो .गाडी काढेपर्यंत डोळ्...
16/02/2025

मध्यरात्री चित्रपट संपला...छावा कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते तशाच अवस्थेत बाहेर पडलो .गाडी काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं ...खूप दुर्मिळ क्षण असतात हे ..ह्या क्षणांसाठी .utekar सर तुमचा आभारी आहे ...मराठयांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला जाणूनबुजून बदलला गेला त्यात शंभूराजांसाखे खरे धर्मवीर होरपळले गेले तो इतिहास तितक्याच भव्यतेने सर तुम्ही रजतपटावर आणून आम्हाला उपकृत केलंत ....मी समीक्षक नाही पण जे भिडलं ते आणि तसंच लिहितोय ...
विकी कौशल ने छावा साकारताना प्राण ओतलेयत तीच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब साकारताना ..निशब्द ....ए आर रहमान च संगीत सोडल्यास चित्रपटाने कहर केलाय ...माझ्या लाडक्या संत्या च काम त्याच्यासारखंच देखणं ....ह्यांची दृश्य बघताना अक्षरशः चेव चढतो नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात दात ओठ चावले जातात ...इतका जबरदस्त परिणाम साधतो चित्रपट ...सगळ्या टीम चे आभार आम्हाला संपूर्ण अनुभव देण्यासाठी ......चित्रपट सगळे रेकॉर्डस् मोडेल ह्यात शंकाच नाही .....आवर्जून बघा ....ओटीटी वर येण्याची वाट बघू नका चित्रपट गृहात जाऊन बघा ...आणि संगरात न्हाऊन जा ....
जय शिवराय
हर हर महादेव 🙏

17/10/2024

`रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी-

१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता... साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं... एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी , त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती...

२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते... सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली... `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं...

३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले... आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला... काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली... तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला... `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या...चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´... केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले

४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला... एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही...बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली... अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या... त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली... शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-
`टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´ ... बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं -
`टॅक्सी´से जाते है... स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच... शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला

५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं... माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता... काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते... समोरुन टाटांचं पार्थिव गेलं , पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते...डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या...

६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता... ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले... तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले... भेट झालीच नाही

७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला... हा पण तिथला लहानसा उद्योजकच... मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला

८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला... एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली... यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात...या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती... रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं

९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच...पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला... त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली...

१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता... आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन
`टाटांचंच पाणी´ पुरवत होता...

Cp Manshree Pathak

रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, अमर असायला हवी! त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही. चांगली माणसही यशस्वी ह...
10/10/2024

रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, अमर असायला हवी! त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही. चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण..... अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटाआज या जगातून गेले, पण त्यांचे विचार, आयुष्याची फिलॉसॉफी कायम रहावी, अजरामर व्हावी ही मनःपूर्वक इच्छा!
अजूनही विश्वास बसत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली सर...💐

18/09/2024
आणि शेतकरी विठ्ठल हसला...आज सकाळी सकाळी  किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुप...
26/08/2024

आणि शेतकरी विठ्ठल हसला...
आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – ८० वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते. एव्हढ्या वयात थकलेले शरीर असताना सुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला. म्हटलं बाबा समोरून या. बाबा गेट उघडून आत आले.

थकलेले शरीर, फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकेलेले नाहीत. तसही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांच अर्थकारण थोडंस समजून घेवूया. बाबाला विचारले बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कढीपत्त्याची गड्डी तुम्ही एक रुपयाला विकत आहात काय पुरते तुम्हाला ? आणि हीच गड्डी तर भाजी मार्केट मध्ये ५ रुपयाला मिळते. बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब हाय. सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली. शेतीच पार वाटूळ झाल. लय खराब हालत हाय. पहाटच्या ७ वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो, म्हणल 3 रुपया ला एक जुडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी विकल्या नाही गेली. मी घरून दोन थैल्यात ५० जुड्या घेऊन निघलो. म्हणल ५० जुड्याचे 3 रुपये जुडीन १५० रुपये येईन, जाण्या येण्याला लागतेत ५० रुपये, शिल्लक राहतीन १०० रुपये तेव्हढाच घरखर्चाला कामी येईन. पण कशाच काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी नाही विकल्या गेली. म्हणल १०० रुपये भेटण त राहील लांब पण जाण्यायेण्याच्या ५० रुपयाच नुकसान होतय कानू . म्हणून नाही काही भेटलं काही तरी चालन पण नुकसान नको म्हणून विकतुया रुपयाला जुडी.
अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावल्या.

कठीण अवस्था आहे बळीराजाची.

बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला. थोड्या वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले. थकलेल्या बाबांना तेव्हढंच बर वाटलं. आज कुठही देवस्थानाला जा गावाच्या कमानीत प्रवेश केला की कुणीतरी माणूस ग्रामपंचायत / नगरपालिकाची पावती पुस्तक हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो. २०/४० रुपयाच्या पावतीशिवाय प्रवेश नाही. थोडे पुढे गेला की पार्किंग ची पावती परत वाट पहात असतेच. असो, देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा असा दारोदार फिरत असतो. दिवस रात्र मेहनत करायची आणि नशीब जे देईल ते स्वीकारायचे याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसते. बोलता बोलता बाबांनी सांगितले की ते १२ वेळा पंढरपूर वारीला जाऊन आलेत. चहा पाणी पिऊन झाल म्हटलं बाबाला थोडे पैसे द्यावे म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली. बाबा काही घेईना. म्हणल बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एव्हढे पैसे घ्या. डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेने एक हास्य उमलले.

त्यांचे हास्य पाहून असे वाटले की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेव्हढा प्रसन्न झाला नसेल तेव्हढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल.

बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
लेखक.....साभार

सौ. शारदा विजयकुमार खरात
कॉपी पोस्ट केली खूपच आवडली म्हणून.......
Sharda Vijaykumar Kharat

कोकण दर्शनगणपतीपुळे ते मालवण (तारकर्ली तिथेच ६ किमीवर) हा पॅच कव्हर करण्यासाठी तुम्हाला असं करता येईल:दिवस १: पुण्याहून ...
17/08/2024

कोकण दर्शन
गणपतीपुळे ते मालवण (तारकर्ली तिथेच ६ किमीवर) हा पॅच कव्हर करण्यासाठी तुम्हाला असं करता येईल:
दिवस १: पुण्याहून थेट कोल्हापूर मार्गे मालवण गाठा. गगनबावडा मार्गे गेल्यास मधला पेंच खराब रस्त्याचा आहे पण रस्ता खूप निसर्गसुंदर आहे. घाटातलं सौंदर्य तर खूपच मस्त. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद वेगळ्या प्रकारे येतो.
काही जणांना स्मूथ फीचरलेस हायवे आणि गाडीचा पिक अप आणि टॉप स्पीड टेस्ट करण्यासाठी गाडी चालवणं हे उत्तम

ड्रायव्हिंग प्लेझर वाटतं, तर काहीजणांना वळणावळणाचा जंगलातला रस्ता आणि आजूबाजूला सतत बदलत असलेल्या खाणाखुणा यात आनंद असतो. तुमचा प्रकार ठरवून घ्या. जर कमी वेळ खराब रस्ता हवा असेल तर पुणे कोल्हापूर- निपाणीनजीक उजवे वळण घेऊन आजरा आंबोलीमार्गे मालवण गाठा.. आंबोली मध्ये एक रात्र थांबण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. हिरण्यकेशी उगम आणि महादेवगड पॉईंट हे दोनच स्पॉट पाहिलेत तर मुक्काम न करताही बघता येतील वाटेत ब्रेक घेऊन. राहणार असाल तर ग्रीन व्हॅली रिसॉर्ट (एमटीडीसी) किंवा लाड हाऊस हे दोन्ही चांगले आहेत. लाड हाऊस घरगुती आहे (बेड अॅड ब्रेकफास्ट)

मालवणला पोचून तारकर्ली बीचवर कोणत्याही बऱ्या दिसणाऱ्या हॉटेलात रहा. हे अशासाठी म्हणतोय की तारकली

एमटीडीसी रिसॉर्ट हा अगदी बीचवरच आहे आणि ती गणपतिपुळ्याच्या खालोखाल कोकणातली सर्वात सुंदर आणि

मोक्याची राहण्याची जागा आहे.. पण दुर्दैवाने त्याचं बुकिंग तुम्हाला मिळण्याची काडीची शक्यता नाही. मी अनेक वर्ष प्रयत्न करतोय. ईअर एंडिगच्या सुमारास तर निव्वळ अशक्य.

बाकी तुम्ही घरगुती अरेंजमेंटचा उल्लेख केलाय, तर इथे तारकर्लीत जेवढी म्हणून ठीकठाक घरं आहेत ती सर्व रहायला भाड्याने दिली आहेत की काय अशी शंका येते. निम्मंअधिक गाव भाड्यानेच गेलंय.

तिथे घरगुती राहण्याची आणि जेवणखाणाची सोय होईलच. फॅमिलीज भरपूर असतात त्यामुळे काळजीचं कारण नाही.

तर मालवणला चिवला बीचजवळ चिवला नावाचंच नवीन हॉटेल आहे (झांट्ये काजूवाल्यांचं) त्याचा मला उत्तम अनुभव आहे. एसी आणि उत्तम रूम्स असलेलं हॉटेल, रूम सर्विसही चांगली आहे. (टिप:

घावणे चटणी ब्रेकफास्टला हवी असल्यास रात्री सांगून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी मिळतील.. अवश्य ट्राय करा..)

मालवण/तारकर्ली हाच रात्री मुक्कामाचा "हब" बनवून दिवसा कारने येऊनजाऊन कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ला अशी ठिकाणं दोन दिवसात कव्हर करा. सिंधुदुर्ग किल्ला इथून वॉकेबलच आहे, तेव्हा तो पहा असं वेगळं सांगायला नको. पण पहाटे निघून लवकरच पहा. होडीत बसून तिथे पोचून पूर्ण गड पहायला उन्हात खूप त्रास होतो. विशेषतः चार वर्षाच्या लहानग्यासोबत. रात्रीच्या वेळी मालवण बाजारात मारलेली फेरी हा स्मरणीय अनुभव ठरावा. अगदी तळकोकणातल्या खास चिजांच्या खरेदीने प्रसन्न व्हाल. मालवणी मसाले, खाजे वगैरे न चुकवण्यासारखे..

तिसऱ्या दिवशी लवकर निघून रमतगमत समुद्रकिनाऱ्याचा रस्ता पकडून रत्नागिरीपर्यंत या (राजापूरमार्गे मेन रस्त्याने नव्हे.. आतला रस्ता.. जैतापूर-आडिवरे-पूर्णगडकडून थेट पावसला निघणारा.. तिथे पाट्या बघत आणि विचारत निघालात की कळेलच.) या आतल्या रस्त्यावर कोकणचं खरं अप्रतिम रूप पहायला मिळतं. शिवाय साथीला सतत समुद्र राहतो..

फोटोग्राफीप्रेमी असाल तर हा तुम्हाला स्वर्ग वाटेल..

रत्नागिरीत पोचण्यापूर्वी गणेशगुळे असा बाण दिसेल, ते ठिकाण अर्ध्या तासात बघून घ्या..

रत्नागिरीत पावस साईडकडून पोचण्यापूर्वीच भाट्ये लागतं.. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत.

जर बजेट उत्तम असेल तर कोहिनूर समुद्र रिसॉर्ट मधे त्याच्या अफलातून लोकेशनसाठी रहा.. उंच कड्यावरुन खाली पसरलेला अनलिमिटेड समुद्र. इथे तुमच्या मुलाला आवडेल अशी रिसॉर्टच्या आत फिरायला ट्रेनही आहे. शिवाय कड्यावर टायटॅनिकसारखी बोट बांधली आहे तिथून समुद्राचा थरार कळतो.

त्या रात्री कुठेच न जाता आणि आराम करा. फारतर संध्याकाळ मिळाली असेल तर रत्नागिरीच्या बाजारपेठेत चक्कर मारुन खरेदी करा.

रत्नागिरीतच दुसऱ्या दिवशी रत्नदुर्ग किल्ला पहा
तो दिवस पूर्ण रत्नागिरीतच घालवा.. मिऱ्याबंदर, भगवती बंदर, सावरकरप्रेमी असल्यास पतितपावन मंदिर वगैरे बघा. त्यानंतरच्या दिवशी सकाळी आच्या सुमारास निघून तास दीड तासात गणपतिपुळे गाठा.. इथेही हातखंबा निवळी - चाफे - जाकादेवी असा रस्ता सरधोपट आहे. पण एक नवीन काहीतरी म्हणून पतितपावन मंदिरासमोरचा (परटवणे) रस्ताच पकडून आतून आतून गणपतिपुळ्याला जाउ शकता. हा खूपच शॉर्टकटही आहे. फक्त रस्ते जरा लहान आहेत.. हाही समुद्राला लागून जात रहातो..

गणपतिपुळ्याबाबतही तेच.. अफलातून लोकेशन लाभलेलं आणि अत्यंत सुंदर सोयीस्कर असं एमटीडीसी.. पण बुकिंग मिळणार नाही. ऑनलाईन बुकिंग होतं पण तीनचार महिने आधीच बुक असतं. लक ट्राय करा.. कदाचित ईअरएंडिंगच्या आधी काही दिवस जरा सुट्टीचा मूड कमी असतो तेव्हा म्हणून मिळून जाईल कदाचित.. पण फार आशा नको..

ते न मिळाल्यास अभिषेक म्हणून रिसॉर्ट आहे तो बुक करा.. हा बीचलगत नसला तरी उंचावरुन अमर्याद सी व्यू देणारा आहे.. शिवाय स्टैंडर्डही आहे.

खेरीज घनवटकर आणि अन्य गुरुर्जीच्या सारवलेल्या टिपीकल कोकणी घरांमधे राहण्याखाण्याची सोय होऊ शकते. पण तिथे राहणे किती मानवेल ते आपापले ठरवावे.. जेवणासाठी मात्र पोचल्यापोचल्या घनवटकरांकडे ऑर्डर द्या आणि सात्विक मोदकांचं घरगुती जेवण मिळवा

गणपतीमंदिराच्या अगदी दाराशी शेडवजा टी हाऊससारखी नाश्त्याची दोनतीन हॉटेल्स आहेत. त्यातल्या एक आणि दोन नंबर हॉटेलांत दर्शनानंतर (किंवा ऐवजी) मिसळ आणि साबुदाणा खिचडी आवर्जून खा आणि नंतर नेहमी आठवण काढा, गणपतिपुळ्यात मुक्काम टाकल्यावर जवळच असलेलं कोकणचं हेरिटेज दाखवणारं छोट्या डोंगरउतारावर असलेलं संग्रहालय पहा

मालगुंड आणि भंडारपुळे चुकवू नका अजिबात

गणपतीपुळ्याहून सोयीस्कर मार्गाने पुण्याला परत येऊ शकता. वाटेत वाटल्यास परशुराम पाहून, प्रसादाची गरमागरम चविष्ट खिचडी खाऊन कोकणचा निरोप घ्या.. डेरवणच्या शिवसृष्टीत गेलात तर स्त्रियांना ट्रॅडिशनल ड्रेसशिवाय आत सोडत नाहीत हे लक्षात घ्या.. पुरुषांना ही अट नाही..
दर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पायऱ्याची पातळी ४३ डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचली आणि घामाच्या धारांनी अवधी मुंबई न्हाऊन निघाली. साथ घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही कुणाचं मन धजावत नाहीये; इतका सगळ्यांनी उन्हाचा धसका घेतलाय! पण म्हणून काय. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं नाही? छे! मुळीच नाही. अहो, 'येवा, कोकण आपलाच आसा' म्हणत 'सिंधुरत्न' अर्थात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे, डॉल्फिनचे दर्शन, स्नॉर्कलिंग, विविध वॉटर स्पोर्टस् तुम्हाला आलेला थकवा नक्कीच पळवून लागतील, मग, घालवायची ना
, साहित्य पांचा स्वतंत्र वारस असलेल्या कोकणाला विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना लाभलेला समुद्रकिनारा, हिख्या माळाच्या बागा, सुंदर खाडया, जलदुर्ग, समुद्रतीरावरील देवालये पाहताना मन भारवून जाते. समुद्रसफरीत होणाऱ्या डॉल्फिन-दर्शनामुळे हा आनंद द्विगुणित होतो. शिवाय इथल्या खास मालवणी जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते, ती वेगळीचा उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली असताना येथील पर्यटन स्थळे आपल्याला माहीत झाल्पास कोकण पर्यटनाचा

मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल. सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिना-यावर आहेत. तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड व वेंगुर्ला हापूस आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. देवगड

विजयदुर्ग किल्ला व बीच विजयदुर्ग हे प्रसिद्ध बंदर आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला किल्ला मराठी आरमाराचे केंद्रस्थान म्हणून

ओळखला जातो. ८०० वर्षापूर्वी राजा भोज याने हा किल्ला उभारला. शिवाजी

महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. सुमारे सतरा एकर क्षेत्रात हा किल्ला

आहे. इथे वीस बुरुज, देवतांची मंदिरे, तोफगोळे पाहायला मिळतात.

वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा किल्ला इतिहासप्रेमींना साद घालतो. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळताना मन प्रफुल्लित होते. समुद्रातील तटावरून डॉल्फिन दर्शन घेता येते. बाजूलाच सुंदर विजयदुर्ग बीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरळे येथून विजयदुर्गला जाणारा ५२ कि. मी. चा मार्ग आहे. वाटेत वाघोटन, पडेल ही गावं लागतात. विजयदुर्ग देवगडवरून २७ कि. मी. अंतरावर आहे. नजीकचे रेल्वे स्टेशन: वैभववाडी रोड (०२३६७) २३७२५३

राहण्यासाठी : हॉटेल सुरुची (०२३६४) २४५३३५.

देवगड

येथील देवगड किल्ला, बंदर, पवनचक्की व देवगड बीच सौंदर्यात भर पाडत आहेत. इ. स. १७०५ साली कान्होजी आंग्रे यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. देवगड बंदर वाहतुकीसाठी बंद असून मच्छिमार आपल्या नौका येथे लावतात. सुरक्षित नैसर्गिक बंदर अशी याची ओळख आहे. देशातली पहिली पवनऊर्जा निर्मिती करणारी पवनचक्की येथे पाहता येते. देवगड बीच फारच वाटेत शिरगाव, तळेबाजार, जामसंडे ही गावे लागतात.

सुंदर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथून ३८ कि.मी. अंतरावर आहे, तर कणकवलीवरून ५३ कि. मी. अंतर आहे.

नजीकचे रेल्वेस्टेशन कणकवली, संपर्क ०२३६७-२३२२४३

राहण्यासाठी : हॉटेल रंगोली ९४२२४३६२७८; हॉटेल ग्रीन व्हिला गेस्ट हाऊस

०२३६४-२६२५४०; हॉटेल पारिजात ०२३६४-२६२३०२. कुणकेश्वर मंदिर

स्थापत्य कलेचा उत्तम नमुना व समुद्रकिनाऱ्यावरील जागृत देवस्थान अशी कुणकेश्वरची ओळख आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. हे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. देवगडपासून १४ कि. मी. अंतरावर असलेल्या

कुणकेश्वरच्या आजूबाजूलाही सुंदर बीच आहेत. येथून ३ कि. मी. अंतरावर

तांबळडेग बीच आहे. पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा व माडा-पोफळीच्या बागा येथे

पाहायला मिळतात. राहण्यासाठी : कुणकेश्वर भक्तनिवास ०२३६४-२४८६५०, २४८७५०

मालवण

जवळचे रेल्वे स्थानक: सिंधुदुर्ग, कणकवली- ०२३८७-२३२२४३

राहण्यासाठी : Name of hotel: Shree Swami Samarth Wooden cottage
Number for details: 9067980364
Address of hotel: Tarkarli (wairy) bandh Malván

अस्सल मालवणी जेवणासाठी
हॉटेल कवटकर
Kasal - Malvan Rd, Malvan, Wayari, Maharashtra 416606
Contact - 9890126545

तारकर्ली
समुद्री पर्यटनात या बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळविले आहे. संपूर्ण किनाऱ्यावर वीजप्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने तंबू निवासाची व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. मालवणपासून ६ कि.मी. अंतर आहे. येथून ४ कि.मी. वर सुंदर माडा-पोफळीच्या बागांतील 'देवबाग' पाहता येते. अरबी समुद्र व कर्ली नदीच्या संगमावरील देवबाग फिरताना फारच सुंदर वाटते.

राहण्याची सुविधा :

MTDC बांबू हाऊस आणि टेण्ट रिसॉर्ट ०२३६५-२५२३९०;

राहण्यासाठी : Name of hotel: Shree Swami Samarth Wooden cottage
Number for details: 9067980364
Address of hotel: Tarkarli (wairy) bandh Malván

अस्सल मालवणी जेवणासाठी
हॉटेल कवटकर
Kasal - Malvan Rd, Malvan, Wayari, Maharashtra 416606
Contact - 9890126545

मालवणमध्ये एमटीडीसीने स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. मालवण

जेटीजवळ याचे बुकिंग होते. किल्ल्याच्या मागील बाजूला खोल समुद्रातील सौंदर्य पर्यटकांना दाखवले जाते. मालवणमध्ये समुद्रसफर करताना तारकर्ली, देवबाग इथे सायंकाळी डॉल्फीनदर्शन होते; तारकर्लीच्या खाडीत हाऊस बोटिंगचा प्रकल्प एमटीडीसीने सुरू केला आहे. याचे बुकिंग एमटीडीसीच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्रात होते.

स्नॉर्कलिंगसाठी संपर्क :

अंतोन फर्नाडिस ९९६०४६८६३८;

यतीन मेयर ९९७५५५६४२८;

एमटीडीसी (०२३६५) २५२३९०.

वेंगुर्ले

भोगवे बीच :

सिंधुदुर्गातील सर्वात सुंदर व डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या या बीचवर

खाजगी होडय़ांतून समुद्रसफर करता येते. समुद्र पक्ष्यांचे थवे येथे असतात.

वेंगुर्लेपासून ३४ कि.मी. तर कुडाळवरून ३० कि. मी. वर भोगवे आहे. वेंगुर्लेवरून म्हापनमार्गे तर कुडाळवरून वालावलमार्गे जायला मार्ग आहे.

जवळचे रेल्वे स्टेशन :

कुडाळ- ०२३६२-२२२६०४

राहण्यासाठी हॉटेल सागरदर्शन: ०२३६६-२६९५७०

सागरेश्वर बीच :

वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.

निवती बीच :

वेंगुर्लेपासून २८ कि.मी. वर असलेला हा बीच डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध आहे.

पर्यटकांना समुद्रात २ ते ३ कि. मी. आत नेऊन डॉल्फिनदर्शन घडवले जाते.

सर्वात मोठ्या संख्येने येथे डॉल्फिन असतात. येथे पारंपरिक पद्धतीने केली

जाणारी मासेमारी पाहायला मिळते. येथे निवास व न्याहरी योजना केंद्र आहे.

संपर्क : दिगंबर केसरकर ०२३६६-२८०८१२.

रेडी आणि यशवंतगड

रेडी येथील गणपती मंदिर व यशवंतगड येथील गणपतीमंदिरात दोन हात असलेली गणेशमूर्ती आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील

हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथून जवळच रेडी खाडीमुखाजवळ यशवंतगड आहे. १६व्या शतकात हा किल्ला शिवाजी

महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. वेंगुर्लेपासून ही ठिकाणे २८ कि.मी. तर सावंतवाडीपासून ३५

कि.मी. वर आहेत. येथे निवासाची व्यवस्था नाही.

नजीकचे रेल्वे स्थानक- सावंतवाडी.

वेंगुर्लेमधील निवास व्यवस्था :

हॉटेल सीव्ह्यूब ०२३६६-२६२४७०;

हॉटेल बांबू ०२३६६- २६२२५१;

खंडे कॉर्नर ०२३६६-२६२४९८

सिंधुदुर्गात आजही व्हर्जिन बीच पाहायला मिळतात. निसर्गसौंदर्य जसेच्या तसे येथे जोपासलेले आहे. परंतु सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा होऊन १० वर्षे उलटल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात फारशी पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट झाली नसली तरी येथील समुद्रकिनारेही सिंधुदुर्गाप्रमाणेच सुंदर आहेत. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ फार वर्षापासून प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे : प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व सुंदर मूर्ती असलेले हे ठिकाण फारच सुंदर आहे. लांबच लांब समुद्रकिनारा हे येथील वैशिष्टय आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पेंडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून रत्नागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे ४० कि.मी. चा मार्ग आहे.

जवळचे स्टेशन : रत्नागिरी.

राहण्याची व्यवस्था : एमटीडीसी तंबू निवास.

संपर्क : ०२३५७- २३५२४८.

अस्सल कोकणी मालवणी पद्धतीचे जेवण रत्नागिरी शहरात जेवायचे असेल तर आठवडा बाजार मधील
आरती डायनिंग ला नक्की भेट द्या
Ragunath Apartment, Athawda bazaar, near Joshila Wine Mart, Ratnagiri, Maharashtra 415612
Contact - 9860094848

आंबुळगड
निसर्गरम्य समुद्रकिनारा असलेले हे एक पर्यटनस्थळ असून रत्नागिरीहून ६० कि.मी. वर आहे. पावसमार्ग- नाटेहून येथे जावे लागते.

राहण्यासाठी :

समुद्र बीच हाऊस ९८९२२०८६८७.

नाटे

रत्नागिरीहून ५५ कि. मी. अंतरावरील या बीचवर पावसमार्गे जावे लागते. या ठिकाणी राहण्याची व जेवणाची सुंदर व्यवस्था आहे. अॅग्रो टुरीझमची संकल्पना गणेश रानडे यांनी राबवून कोकणी पद्धतीची राहण्याची व्यवस्था समुद्रकिनारीच केली आहे. संपर्क : गणेश रानडे ९४२२४३३६७६, ०२३५३-२२५५३६. भगवती किल्ला : रत्नागिरीहून १ कि.मी. वर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. येथे जवळच रत्नागिरी बंदरही आहे. रत्नागिरी येथून २० कि. मी. वरील आरेवारे पूल प्रसिद्ध ठिकाण आहे. खाडीवरील या पुलानजीकचा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो.......

परशुरामची भूमी : गुहागर

उफरटा गणपती
श्री व्याडेश्वर
गाव-मळण
वेळणेश्वर समुद्र किनारा
हेदवी
बामणघळ
रोहिला
तवसाळ
गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर आहे. गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते. परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. जाणून घेऊया गुहागर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे...दापोलीहून दाभोळखाडीमार्गे गुहागरला जाता येते. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलिकडे परशुराम घाट उतरल्यावर गुहागरकडे जाणारा मार्ग आहे.

महामार्गापासून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर नारळ-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. गुहागरला यायचं ते दोन दिवस हाती राखूनच. त्याशिवाय इथल्या भटकंतीचा आनंद लुटता येत नाही. या परिसरात वड-पिंपळाचे विशाल वृक्ष पाहायला मिळतात.

गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवास व्यवस्था उपलब्ध आहे. समुद्र किनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत. गुहागर तालुक्याच्या भटकंती करताना धार्मिक पर्यटनाचा आनंदही मिळतो. निसर्गरम्य परिसरात उभी असलेली अनेक देवस्थाने तालुक्यात आहेत. खाडीच्या भागात मासोळी बाजारालाही भेट देता येते.

मुंबई ते गुहागर 270 किलोमीटर अंतर आहे. तर पुणे-गुहागर 244 किलोमीटर अंतर आहे.गुहागर तालुक्यातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे...गोपाळगडगुहागरपासून 18 किलोमीटर अंतरावर गोपाळगड आहे. रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून गड दोन किलोमीटर अंतरावर आहे. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूर येथून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो.

किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहदेखील आहे. दुर्गादेवी मंदिर:वेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणमार्गे आल्यास मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस यावे लागते. मंदिर तेराव्या शतकातील असल्याची माहिती उपलब्ध आहे. मुळ हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मंदिरात येण्यापूर्वी बाजूला असलेल्या तळ्यातील विविधरंगी कमळाचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद घेता येतो. मंदिराच्या गाभाऱ्यातील आदिमातेचे रुप नजरेत भरण्यासारखे आहे. गाभाऱ्यासमोरील भव्य सभामंडपातील शांतता आणि परिसरातील निसर्ग यामुळे काही क्षण इथे बसून थकवा घालविता येतो. बाजूलाच असलेल्या प्रसादालयात भाविकांसाठी चहा-नास्ता आणि जेवणाची सोय माफक दरात केली जाते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय आहे. (भक्तनिवासासाठी संपर्क-02359-240665)

उफरटा गणपती
दुर्गादेवीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्र किनाऱ्याकडे जाताना रस्त्याच्या डावीकडील गणेशाचे सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिरातील श्रीगणेशाची मुर्तीही तेवढीच सुंदर आहे. 300 वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी वाढल्यावर गुहागर बुडुन जाईल, अशी भीती गावकऱ्यांना वाटल्याने त्यांनी पूर्वेकडील गणपतीचे तोंड पश्चिमेकडे फिरविले. तेव्हापासून यास 'उफरटा गणपती' म्हणून ओळखले जाऊ लागले. पांढऱ्याशुभ्र मुर्तीच्या हातातील परशु व त्रिशुळ शोभून दिसतो. निवांतपणे काही क्षण घालविण्याजोगा मंदिराचा परिसर आहे. गुहागरचा समुद्र किनारा: सूर्य थोडा डोक्यावर आल्यावर समुद्र स्नानाची मजा लुटता येते. मात्र समुद्रात जाताना गावकऱ्यांकडून माहिती घेऊन गेलेले केव्हाही बरे.

शुभ्र-रुपेरी वाळूचा तेवढाच स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. 5 किलोमीटरचा लांबीचा किनारा नारळी-पोफळी आणि सुरुच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. वाळूवर फिरणारे सागरी जिवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. किनाऱ्यावर उभे राहून समोर सह्याद्रीच्या रांगावर पसरलेल्या हिरव्या शालूचे सौंदर्यदेखील न्याहाळता येते.

समुद्र सफरीचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहेत.

श्री व्याडेश्वर
गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते.

परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. त्यांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. या स्थानाला 'व्याडेश्वर' संबोधले जाते, अशीही त्यामागची कथा आहे. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यात गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सुर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे.(संपर्क-9421140506) आनंदीबाई पेशव्याचे

गाव-मळणगुहागर परिसरात वृक्षराजींची श्रीमंती पाहायला मिळते. वटवृक्षांच्या रचनेतील सौंदर्य अनेक कलाकारांचा आकर्षणाचा विषय असतो. परिसरात भटकंती करताना आनंदीबाई पेशव्यांचे मुळ गाव असलेल्या मळण गावातील त्यांच्या वाड्याचा चौथरा आणि त्याकाळचे तळे पाहता येते. मळणला जाण्यासाठी शृंगारतळीहून मार्ग आहे. गुहागर ते मळण 15 किलोमीटर अंतर आहे.
वेळणेश्वर समुद्र किनारा
गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधारण 20 किलोमीटर अंतरावर हा वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. चंद्राच्या कोरीप्रमाणे असलेल्या या किनाऱ्यावर नारळाच्या वृक्षांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे सुंदर देऊळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून समुद्राचे विलोभनीय दृष्य पाहायला मिळते.

(एमटीडीसी वेळणेश्वर-02359-243282, कोकणी हट्स 10 नॉन एसी 5 एसी)

हेदवीपेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीगणेश मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आल्हाददायक अनुभव येतो. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरातील मुर्ती 'श्री दशभुजा लक्ष्मीगणेश' नावाने ओळखली जाते. या ठिकाणी भक्त निवासाची सुविधादेखील करण्यात आली आहे.
बामणघळ
हेदवी येथील गणपती मंदिराच्या अलिकडे तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास बामणघळला निसर्गाचा सुंदर अविष्कार पाहता येतो. याठिकाणी समुद्र किनारा काळ्या कातळांनी व्यापलेला आहे. या काळ्या खडकांशी चाललेला फेसाळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासारखा असतो. थोडे अंतर चढून गेल्यावर एका ठिकाणी दहा ते पंधरा फुट उंचीची अरुंद नाळ आहे. या फटीतून भरतीच्या लाटेचे पाणी शिरून ते खडकावर आदळताना उंच जलस्तंभ तयार होतो. उडणाऱ्या तुषाराचे सुर्य प्रकाशातील सौंदर्य डोळ्यात साठविण्यासारखे असते. किनाऱ्यावर उमा महेश्वराचे मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरांनाही भेट देता येते.

रोहिला
हेदवीपासनू सात किलोमीटर अंतरावर रोहिल्याच्या खाडीचा पूल लागतो. या पुलावरून डावीकडे सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलिकडे सुरुबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत. समोर विस्तारलेल्या खाडीपलिकडे डोंगरावर उभा असलेला जेएसडब्ल्यु प्रकल्प दिसतो. कॅमेऱ्यात साठविण्यासारखा परिसर असल्याने काही क्षण येथे घालविण्याचा मोह आवरत नाही.

तवसाळ
हेदवीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तवसाळ गावात विजयगडची प्राचीन गढी आहे. या गढीचे अवशेष खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पाहता येतात. गावाला लागून जयगडची खाडी आहे. या खाडीतून सुर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. खाडीतून जयगड बंदरही दृष्टीपथास पडते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे.
कोकणात जर गुहागर मध्ये येत असाल आणि राहण्यासाठी उत्तम घरघुती फिल देणारा होम स्टे शोधत असाल तर आम्ही आपल्यास Saka kadams home stay हा बेस्ट ऑप्शन सुचवू ह्या होम स्टे च्या चारी बाजूला झाडे आहेत जसे की माड, काजूचे आणि आब्यांची बाग ह्या सुंदर वातावरणात हे होम स्टे इथे आल्यावर तुमची सकाळ पक्षांच्या सुमधुर किलबिटाने होते आणि येथून गुहागर समुद्र किनारा फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा गुहागर समुद्र किनारा आहे आणि येथे तुम्हाला अस्सल घरघुती पद्धतीचे कोकणी जेवण आणि ब्रेकफास्ट सर्व्ह केला जातो रूम तुम्हाला ac,non ac असे उपलब्ध आहेत
आणि येथील owner कदम खूप प्रेमळ आणि हेल्पफुल आहेत इथे कुठे फिरायचे कसे यायचे याची सर्व माहिती तुम्हाला पुरवली जाईल 😀🙏
चला मग विचार कसला करत आहात गुहागर चा प्लॅन करत आहात तर नक्की हे होम स्टे तुमच्या बकेट लिस्ट मध्ये ऍड करा 😀🙏
*BEST FOREST VIEW HOMESTAY IN Guhagar😍🙏🏻*
📞 *For Bookings* +91 85917 66504

● दापोली 👇

शोध पोर्टल
शिक्षण
आपला महाराष्ट्र
महाराष्ट्र – पर्यटनस्थळे व किल्ले
दापोली
अवस्था:
उघडा

दापोली
दापोली तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे
पालगड
केळशी समुद्र किनारा
महालक्ष्मी मंदिर, केळशी
याकूबबाबा दर्गा, केळशी
कड्यावरचा गणपती, आंजर्ले
समुद्र किनारा, आंजर्ले
मुरुड
हर्णे बंदर
सुवर्णदुर्ग, हर्णे
कनकदुर्ग, फतेहगड, गोवा किल्ला
व्याघ्रेश्वर मंदिर, आसूद
केशवराज मंदिर, आसूद
दापोली शहर
पन्हाळकाजी लेणी
चिखलगाव
श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ
माँसाहेब मशिद, दाभोळ
हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.

पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.

दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

दापोली तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे

पालगड
मंडणगडपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर दापोली तालुक्यातील पालगड येथे पूज्य साने गुरुजींचे जन्मगाव आहे. या ठिकाणी पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जिवनातील अनेक प्रसंग छायाचित्रांच्या रुपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. गावातील प्राथमिक शाळेत गुरुजींचे प्राथमिक शिक्षण झाले होते. ट्रेकींगची आवड असल्यास गावालगतच असलेल्या पालगड किल्ल्यावर जाऊन प्राचीन अवशेष पाहता येतात. मात्र किल्ल्याची भटकंती करतांना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी.
केळशी समुद्र किनारा
मंडणगडची सफर पुर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्र किनारा लागतो. नारळाच्या दाट झाडीतून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरुबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून उटंबर डोंगराजवळील कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख-शिंपले सापडतात. शांत-निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो.
महालक्ष्मी मंदिर, केळशी
केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर परिसरात तळे असून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर सुंदर आहे. संध्यासमयी सनईचे सूर कानावर येत असतांना पाय मंदिराच्या परिसरातच रेंगाळतात. मंदिराचे बांधकाम पेशवाई काळातील आहे. उटंबर डोंगरावरील वनराईच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सौंदर्य खुलुन दिसते.
याकूबबाबा दर्गा, केळशी
महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूने 'हजरत याकूबबाबा सरवरी रहमतुल्ला दर्ग्या'कडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. पाचच मिनीटात दर्ग्यापाशी पोहचता येते. याकूबबाबा सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ स्वारीची तयारी सुरू असतांना त्यांची व याकूबबाबांची भेट झाली. याकूबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा 'उरुस' होतो. या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भावीक सहभागी होतात.
कड्यावरचा गणपती, आंजर्ले
केळशीहून दापोलीकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे श्रीगणेशाचे जागृत दैवत आहे. या स्थानाला 'कड्यावरचा गणपती' म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. देऊळ 11 व्या शतकातील असून त्याचा 1780 मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय, मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस तळे आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिराची रचनादेखील तेवढीच रेखीव आहे. मंदिर परिसरात असलेल्या भक्तिधामात भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था होते. (दूरध्वनी-02358-234300)
समुद्र किनारा, आंजर्ले
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्ले गाव आहे. गावातून अरुंद रस्ता समुद्राकडे जातो. आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावरून सुंदर दृष्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेलया असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हर्णे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्रतटाचे नयनरम्य दृष्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात दिमाखा

Address

Mumbai
431002

Telephone

+919822108555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OnlineMaharashtra.In posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OnlineMaharashtra.In:

Share