02/01/2026
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र. १८३ मधील अधिकृत उमेदवार श्रीम. आशा दिपक काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यानंतर आयोजित भव्य प्रचार रॅलीत सहभागी होत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.
प्रभागातील विकास, नागरी सुविधा, महिलांचे प्रश्न, तरुणांचा रोजगार आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणी यावर चर्चा करत काँग्रेस पक्षाची भूमिका आणि भावी विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन नागरिकांसमोर मांडला. सदर रॅलीला प्रभाग क्र. १८६ मधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेला विश्वास निश्चितच विजयाचं द्योतक आहे.