11/07/2026
गंगाखेड पेटलं... अन्यायाविरोधात समाज रस्त्यावर!
मत मांडलं म्हणून एखाद्या व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करायची? गच्चीला धरून फरफटत नेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत, नाक घासून माफी मागायला लावायची? आणि त्यावरही ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करायचा?
गंगाखेडचे आरक्षण चळवळीतील सहकारी महेश बिडगर यांच्यासोबत घडलेल्या या घटनेविरोधात आज गंगाखेडमध्ये संतप्त निषेध मोर्चा काढण्यात आला. अन्याय करणाऱ्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे.
लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण दहशत, मारहाण आणि अपमान याला कधीही मान्यता असू शकत नाही. कायद्याचा धाक सर्वांसाठी समान असला पाहिजे. अन्यायाविरोधातील हा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तर तो आणखी बुलंद होईल.
अन्याय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा! दोषींना अटक करा!
#महेश_बिडगर