02/12/2012
Do read today mah times pg 11! Another new day for Yellow Ginger Films!Really happy!Thank u for all love & support!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17445570.cms
मिताली राजाध्यक्ष , यलो जिंजर फिल्म्स
अवघ्या पंचवीशीतल्या मितालीनं जे . जे . स्कूल ऑफ आर्टसमधून शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीतून सिनेमामेकिंगचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं . यातल्या खाचाखोचा समजून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर यलो जिंजर फिल्म्स या नावाने स्वत : ची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली . या कंपनीने नुकतीच ' द फ्रीडम चेंजर्स ' ही आपली पहिली शॉटफिल्मही प्रदर्शित केली . ' मी अमेरिकेत फिल्ममेकिंगचं शिक्षण घेत असताना माझी अनेक तत्रज्ञांशी ओळख झाली . त्यांच्या तंत्रज्ञानाची मी माहिती करून घेतली . माझ्या कंपनीतर्फे मला अनेक विषयांवरच्या शॉर्टफिल्म बनवायच्या आहेत . माझं मूळ उद्दिष्ट आहे , आपल्या मातीतले विषय इथल्या आणि तिथल्या तंत्रज्ञाची सांगड घालून तिथल्या प्रेक्षकांसमोर पेश करायचे , त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून द्यायचा ', असं आपल्या प्रॉडक्शन कंपनीविषयी मिताली सांगत होती . आजवर मितालीला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत . छोटी सिनेमामेकर म्हणून इण्डस्ट्रीमध्येही तिची ओळख निर्माण होतेय .
फिल्मी दुनियेविषयी पॅशनेट असलेल्या काही क्रिएटिव्ह तरुणांना याच क्षेत्रात करिअरही घडवायचंय... पण ग्लॅमरला भुलून त्यामध्ये स्ट्रगल करण्यापेक्षा त्यांना या चमचमाटात स्वयंप्रकाशित तारा म्हणून ओळख कमवायचीय... स्वतःची कंपनी सुरू करण्याची धडक मारून त्यांनी या दृष्टीने वाटचालही सुरू केलीय... ही गोष्ट आहे, ...