Pustak Sagar

Pustak Sagar Narrative and written discourse of Marathi literary aspirations.
मराठी लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचा सेतू. Words need voice.

This page is an open platform for the various streams of thoughts, ideas, opinions and literary aspirations. We are offering this inclusive opportunity which welcomes all the possible types of narrative and written discourse which enriches the unique flavour of humane experience and communication for not just the discerning readers as well as aspiring writers. We acknowledge that words are the bes

t possible medium of expressions. The collective voices of readers and writers can be crystallized on this page. May we welcome you to step on this junction to enrich our collective identities. Pustak Sagar brings an ocean of literature, a plethora of books. In one of its kind effort, the portal is designed to contain books in every regional language of India. We are beginning with Marathi, a language that has legacy of ages. Marathi literature is transforming in pace and we are delighted to bring the creative pieces from all the eras to our readers. Pustak Sagar desires to serve as a bridge between authors and readers. The fictions and non-fictions of various genres including drama, romance, mystery, horror, action, adventure, satire, travel, religious, poetry and many more are made available online by Pustak Sagar. Distinction of publications, authors and poets makes the reading experience comprehensive on this book portal. We wish to make reading convenient through our ebooks, audio books and Mobile App. Not only had this but if you wish to keep a copy of any book in collection we can get it printed for you through our Print on Demand service. Welcome to Pustak Sagar, a virtual book mall. Select from range of books and enrich your life with wisdom as it is rightly said that “you are what you read!”

हे फेसबुक पेज म्हणजे एक खुला कट्टा आहे. विचार, कल्पना, मत आणि साहित्यिक आशा-आकांक्षांचे मुक्त व्यासपीठ. नवे लेखक आणि नवे वाचक यांच्यात संवादाचा सेतू बांधायचा हा प्रयत्न आहे. फेसबुकवर मराठी भाषा आता मोठ्या संख्येने वाचली आणि लिहिली जाऊ लागली आहे. मात्र अजूनही लोकांना हा उथळ कारभार वाटतो. ही तरुणाई इतक्या मोठ्या संख्येने ऑनलाइन मराठी संवादात स्वारस्य घेत असताना मराठी ऑनलाइन वाचन का मूळ धरत नाही, असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतोय. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. नव्या दमाचे अनेक लेखक आणि अर्थात नव्या दमाच्या वाचकांना या पानावर जोडायचं आहे.
व्यावसायिक हेतू लपवलेला नाही. उलट त्यामुळेच दीर्घकाळ अशा गोष्टी चालवता येतात. लेखकांना वाचक आणि वाचकांना आवडीचा लेखक गवसावा यासाठी व्यावसायिक पातळीवर काही गोष्टी करतोय.
मोबाइल अॅपवर मराठी इ-बुक घेऊन आम्ही येतोय. ही काळाची मागणी आहे. मात्र मराठी इबुक वाचली जात नाहीत असा एक समज पसरलाय. कारणं काहीही असोत. पण नेटाने चांगली पुस्तकं मोबाइलवर कमी किमतीत वाचायला मिळाली तर ती नकोयत असं कुणी म्हणणार नाही. पण हा व्यवसाय आमच्या वेबसाइटवर आहे. इथे या चव्हाट्यावर मात्र लिहिण्या-वाचण्यावर मोकळी-ढाकळी चर्चा अपेक्षित आहे. नव्या-जुन्या पुस्तकांचं, लेखकांचं, घटनांचं, पुढाकारांचं, कल्पनांचं प्रमोशन इथे आपल्याला करता येईल. तुमचं स्वागत आहे.

Releasing 'ATMAN', a collection of poems on 27th September, 2017 by Anokhi Publications.  A young poet Maharajan Thevar ...
22/09/2017

Releasing 'ATMAN', a collection of poems on 27th September, 2017 by
Anokhi Publications. A young poet Maharajan Thevar seeks to ignite a sense of self-liberation, love and inner peace in readers.

Book will be available on www.pustaksagar.com

Atman, a collection of poems authored by the young poet Maharajan Thevar seeks to ignite a sense of self-liberation, love and inner peace in readers. In his maiden attempt to combine spirituality with poetry, he has given us a unique perspective about the intertwined relationship between the creator, his beings, their emotions and our soul.

Releasing on 27th September 2017
by Anokhi Publications

only on www.pustaksagar.com

शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, वादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये आणि उत्तम रसिक श्रोते अशा ...
12/06/2017

शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, वादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये आणि उत्तम रसिक श्रोते अशा अनेक रूपांत पु.ल.देशपांडे रसिकांच्या आयुष्यात आले आणि अमर झाले. अचूक निरिक्षण हा त्यांच्या विनोदाचा गाभा... त्यांची विनोदाची शैली कधी कुणाला हलकीशी टपली मारण्याची तर कुणाला शालजोडीतील टोमणे मारण्याची .. पु.ल. म्हणजे हास्याचा कल्लोळ असे वाटले तरी त्यांचे साहित्यकधीही विनोदापुरतेच मर्यादित राहिले नाही. चित्रपटांच्या कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शनापासून ते अगदी नट म्हणून काम करण्यापर्यंत त्यांचा प्रवास अफाट आहे. हा प्रवास १२ जून २००० रोजी थांबला. पण आजही त्यांच्या साहित्यसहवासामुळे महाराष्ट्र व जगभरातील त्यांच्या रसिकांच्या मनात अजरामर राहिले आहेत.

29/05/2017

आपल्या आवडलेल्या, न आवडलेल्या पुस्तकांवर कॉमेण्ट्स देण्याची सवय आपल्याला असतेच. चांगल्या आणि वाईट शेरेबाजीमुळे पुस्तकांची वर्गवारी केली जाते. निगेटीव्ह शेरेबाजीने खराब झालेली पुस्तके मग अडगळीत जातात. त्यांना पुर्नजीवीत करण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचकांनी शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात ३० मे पासून आयोजित करण्यात येत आहे. अशाप्रकारचे राज्यातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. शेरेबाजी करुन पुस्तके खराब करु नका, असा संदेश या प्रदर्शनातून वाचकांना देण्यात येणार आहे.

http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/29052017/0/3/

योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील योग महोत्सवात योगसाधनेतील सूर्यनमस्कार आणि नमाज यांचा संबंध जोडला. इतिहास आणि पुरातत्व क्ष...
30/03/2017

योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील योग महोत्सवात योगसाधनेतील सूर्यनमस्कार आणि नमाज यांचा संबंध जोडला. इतिहास आणि पुरातत्व क्षेत्राचे अभ्यासक डॉ. यशवंत रायकर यांनी आपल्या 'अथातो धर्मजिज्ञासा' या पुस्तकातून माणूस, धर्म आणि योगसाधनेचा ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. भारतीय संस्कृतीतील योगाभ्यासाबद्दल त्यांनी समर्पक विचार मांडले आहेत.

योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांनी लखनऊमधील योग महोत्सवात योगसाधनेतील सूर्यनमस्कार आणि नमाज यांचा संबंध जोडला. त्यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे.

इतिहास आणि पुरातत्व क्षेत्राचे अभ्यासक डॉ. यशवंत रायकर यांनी आपल्या 'अथातो धर्मजिज्ञासा' या पुस्तकातून माणूस, धर्म आणि योगसाधनेचा ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. भारतीय संस्कृतीतील योगाभ्यासाबद्दल त्यांनी समर्पक विचार मांडले आहेत. योग हे अत्यंत पुरातन तसेच स्वयंअनुशासनासाठी महत्त्वपूर्ण असे शास्त्र आहे. सूर्यनमस्कारातील प्राणायाम आणि नमाजमधील अनेक क्रियांमध्ये समानता असल्याचे त्यांनी नमूद केलेय.

या विषयावरचे लिखाण रायकर यांनी 'अथातो धर्मजिज्ञासा' पुस्तकात आधीच केले असून आसनांमध्ये समानता जाणवत असली तरी नमाज आणि योगाभ्यासातील मूलभूत फरक त्यांनी पुस्तकात विशद केला आहे. रायकर यांचे हे अभ्यासपूर्ण लिखाण नक्कीच वाचनीय आहे.

https://goo.gl/cFHCym

Corruption, Black Money, Demonetization these are the words which are bombarding on us since few days. What it is exactl...
07/12/2016

Corruption, Black Money, Demonetization these are the words which are bombarding on us since few days. What it is exactly? What are the causes for emerging these issues? Do we have any solutions to tackle these issues?
We can find answers to all these questions in a book 'The World of My Dream' written by Nanubhai Naik. He has spent 30 years of his life in studying the ideal world from the perspective of Mahatma Gandhi. As suggested by Jayprakash Narayan he put down the draft of Party-less Social System. He wants to clean the history of inequality. Our Prime Minister Narendra Modi seems to following the dream of Gandhi for nation. Let's join the hand for betterment of the country.
Draft for the Party-less Social System is inclusive and Nanubhai Naik is open for discussion and suggestions to create a dream world. We insist you to read this book and suggest your opinion for our dream world.

नटरंग या चित्रपटामुळे प्रकाशात आलेली कादंबरी नटरंगचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुणे येथे वयाच्या ८१ व्या व...
28/11/2016

नटरंग या चित्रपटामुळे प्रकाशात आलेली कादंबरी नटरंगचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना पुस्तकसागरकडून आदरांजली!
काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. खळाळ, घरजावई, माळावरची मैना, आदिताल, उखडलेली झाडे हे कथासंग्रह, तर मातीखालची माती हा व्यक्तीसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या गोतावळा, नटरंग, एकलकोंडा, माऊली, संतसूर्य तुकाराम या कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या. झोंबी, नांगरणी, घरभिंती व काचवेल ही आत्मचरित्रात्मक पुस्तकेही त्यांनी लिहिली. त्याचबरोबर त्यांची उगवती मने ही बालकथाही प्रसिद्ध झाली होती.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्...
28/11/2016

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या काही ओळींतूनच अतिशय समर्पक शब्दांत महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अठराव्या शतकातील दीन-दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करू या! असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग आज आम्ही गर्वाने सांगू इच्छितो की समस्त भारतीय स्त्रियांच्या आजच्या प्रगतीमागे एका महापुरुषाचा हात होता. ते म्हणजे महात्मा फुले...महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन देऊन त्यांनी मुहुर्तमेढ रोवली. फुलेंनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. त्यांनी आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. त्यांच्या स्मृतीस वंदन करून पुस्तकसागरतर्फे आम्ही ही शिक्षणगंगा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहू.

'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' आता ऑनलाईन उपलब्धसाडेतीन-चार हजार वर्षांच्या इतिहासात पुरुषांनीच स्त्रिला कसं जमिनीत गाड...
23/11/2016

'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' आता ऑनलाईन उपलब्ध
साडेतीन-चार हजार वर्षांच्या इतिहासात पुरुषांनीच स्त्रिला कसं जमिनीत गाडलं. तसेच काही स्त्रियांमध्ये ही स्वातंत्र्याची आग प्रेरित करेल हे लक्षात आल्यावर पुरुषांनीच स्त्रीच्या कल्याणाचा विचार मांडण्यासाठी पुढाकार कसा घेतला, हा स्त्रीच्या जगण्याचा सारा प्रवास ज्येष्ठ लेखिका डॉ.मंगला आठलेकर यांनी 'महापुरुषाच्या नजरेतून स्त्री' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाबद्दल विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे.
आधुनिक काळात स्त्रिया एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या, तरी त्यांचे समाजातील स्थान हे दुय्यमच आहे. स्त्रियांवरील अन्याय दूर करत असतानाच काही समाजसुधारक आणि महापुरुषांच्या भूमिकेत दुटप्पीपणा पाहायला मिळतो. स्त्रियांना काही अधिकार दिल्यासारखं दाखवायचं आणि त्यापुढे एक छोटीशी वाटणारी अट ठेवायची, त्यामुळे तो अधिकार असून नसल्यासारखा व्हायचा. ही युक्ती जगातल्या अख्ख्या पुरुष जातीनं वापरली.‘तुला काय हवंय, तुला कसं जगायचंय’ हे तिला कुणी विचारलेलंच नाही. तिला काय द्यायचं आणि किती द्यायचं हे पुरुषांनीच ठरवून टाकलं. त्यामुळे शिक्षण मिळून, नोकरी करूनसुद्धा तिचं पुरुषावरचं अवलंबन संपलेलं नाही. शिक्षण आणि नोकरीची सवलत देतानासुद्धा तिचं स्थान आपल्यापेक्षा उंचावर नाही याची काळजी पुरुषानं घेतली. दुय्यम स्थानावरून ती समान स्थानावर यावी अशी जरूरच कुणाला वाटली नाही. म्हणून तसे प्रयत्नही झाले नाहीत.
शेवटी धर्मसंस्थापक, समाजसुधारक, महात्मा झाले तरी ते सारे पुरुषच होते.‘पुरुषी’पणा मिरवणाऱ्या इतर पुरुषांपेक्षा थोडी अधिक संवेदनशीलता त्यांच्याकडे होती इतकंच ! ‘स्त्री’ला मान देण्यासाठी तिला माता किंवा भगिनी होण्याचं बंधन महापुरुषांकडून घातलं जात होतं.‘स्त्रीला ठरवू द्यात तिला काय हवंय’ किंवा ‘स्त्रियांनी संततीनियमनाची साधने वापरली पाहिजेत, त्यांना समागमाचा अधिकार मिळायला हवा’ असे म्हणणारे आगरकर, र. धों. कर्वे त्यांच्या जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूंनतरही दुर्लक्षित, एकाकी पडले. याला काही अंशी स्त्रियाही जबाबदार आहेत. आधुनिक स्त्रिया अजूनही स्वत:कडे स्त्री म्हणून, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघत नाहीत. या सगळ्याचा अभ्यासपूर्ण गोषवारा महापुरुषांच्या नजरेतून स्त्री या पुस्तकातून डॉ.मंगला आठलेकर यांनी मांडला आहे.
हे पुस्तक जास्तीत जास्त महिला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ्फे पुस्तकसागर हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. पुस्तकसागरच्या वेबसाइटवर व मोबाईल अॅपवर हे पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिन्कवर क्लिक करा...
https://goo.gl/48pMus

‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ या पुस्तकातून दुय्यम स्थानाचा इतिहास धुंडाळताना लक्षात येतं, भाषा वेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले, जाती वेगळ्या असल्या इतकंच काय धर्मही वेगळे असले तरी हे स्त्रियांचे दुय्यम स्थान मात्र सगळीकडे आणि सगळ्या काळात सारखं आहे, हे वास्तववादी दर्शन होते. स्त्रिया कधी स्वत:क...

असा अनोखा प्रवास करायला तुम्हाला आवडेल का?
22/11/2016

असा अनोखा प्रवास करायला तुम्हाला आवडेल का?

छोट्या साहित्य संमेलनातून विचारांची देवाण-घेवाणछोट्या साहित्य संमेलनांतूनच खऱ्या अर्थाने विचारांची देवाण-घेवाण होते. मोठ...
22/11/2016

छोट्या साहित्य संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण
छोट्या साहित्य संमेलनांतूनच खऱ्या अर्थाने विचारांची देवाण-घेवाण होते. मोठ्या साहित्य संमेलनात अधिकतर बडेजावपणा असतो, असे वक्तव्य ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी वसईतील साहित्य जल्लोषच्या कार्यक्रमादरम्यान केले. वसईतील अनंत नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचा समारोप महाराष्ट्र महोत्सवाने झाला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षण समाजपरायण आणि शिक्षक ज्ञानपरायण आहेत का अशा विविध चर्चासत्रांत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

Address

PustakSagar Publications Pvt. Ltd. A1-52, Shah & Nahar Industrial Estate, S. J. Marg, Lower Parel (W)
Mumbai
400013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pustak Sagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share