07/09/2026
मध्य प्रदेशातील २० वर्षीय 'सुरेंद्र सिंह चौधरी' उर्फ 'बिट्टू तबाही' गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या प्रयत्नांतून प्रदूषित 'अजनार' नदीतील प्लास्टिक व कचरा साफ करत आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
The Ocean Cleanup संस्थेचे संस्थापक व CEO 'बॉयन स्लॅट' यांनी त्याच्या या कामाची दखल घेतली आहे. त्यांनी सुरेंद्रला संस्थेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. नेदरलँड्सस्थित ही संस्था समुद्र आणि नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी काम करते.
Foreign Offer for Bittu Tabahi | Boyan Slat | The Ocean Cleanup