
14/11/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ( सहकार सेल )बालाजीराव शेळके पाटील यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात सत्कार
आज १४/११/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मध्ये बालाजीराव शेळके पाटील याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल प्रदेशउपाध्यक्ष म्हणून निवड झाली. नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बालाजी पाटील यांनी आपले मनोगतात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर,सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास मोरे मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख जिल्हाध्यक्ष माधवराव धर्माधिकारी शहर कार्याध्यक्ष फिरोज पटेल या सर्व नेत्यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरात घेऊन जाण्याचे ध्येय त्यांनी व येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी आवाहनही केले. या सत्काराच्या कार्यक्रमात प्रामुख्याने शहराचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण घुले,शहराचे उपाध्यक्ष सरफराज अहमद, शहर सचिव बिलाल सय्यद,शहर सरचिटणीस गोविंद यादव,युवक जिल्हा सरचिटणीस ओमकार टाक, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस शहबाज खादरी, प्रभाग अध्यक्ष सचिन हटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
NCPSpeaks_Official