Dhananjay Diwali Magazine

Dhananjay Diwali Magazine “धनंजय" हे थ्रिलर कथांच्या प्रकारात लोकप्रिय असलेले,६५ वर्षांचा वारसा असलेले वार्षिक मराठी दिवाळी अंक

11/10/2025

भयकथेचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप यांना मानवंदना म्हणून, यंदाच्या धनंजय दिवाळी अंकाने 'नारायण धारप विशेषांका'ची निर्मिती केली आहे. या अंकातील नारायण धारप विभागामध्ये गणेश मतकरी, ह्रषीकेश गुप्ते, प्रसाद कुमठेकर, मनस्विनी लता रवींद्र, पंकज भोसले, प्रणव सखदेव, निखिलेश चित्रे, श्रीकांत बोजेवार, सुशील अत्रे, सुकल्प कारंजेकर, किरण क्षीरसागर अशा आमंत्रित लेखकांनी स्वतःच्या शैलीत भय-गूढ-विज्ञानकथा लिहिल्या आहेत. त्याजोडीला धारपांच्या दोन दुर्मिळ कथा,आणि एक विशेष लेखदेखील आहे. धारप विभागापलिकडे बाळ फोंडके, मेघश्री दळवी, गिरीश देसाई, सागर कुलकर्णी, संजय काळे, विनय खंडागळे, र.अ.नेलेकर, मेधा मराठे, असीम चाफळकर, अनंत मनोहर, मुकुंद नवरे, सुमती जोशी, कल्पिता राजोपाध्ये इत्यादी अनेक लेखकांच्या कथांचा वाचनानंद घेता येईल...

धनंजय दिवाळी अंक - नारायण धारप विशेषांक
संपादक - नीलिमा कुलकर्णी
मूल्य - 450 रुपये (पोस्टेज फ्री) / पृष्ठसंख्या - 360
संपर्क आणि जीपे क्रमांक - 9820019703 / 9664241946
मुखपृष्ठ - रविकांत सोईतकर
रेखाटने - रविकांत सोईतकर, सतीश भावसार, सतीश खानविलकर, चंद्रशेखर बेगमपुरे.

#धनंजयदिवाळीअंक #दिवाळीअंक२०२५ #नारायणधारप

, , , , , , , , , , , , , , , , Kiran Kshirsagar Neelima Kulkarni Anushree Shenoy

(प्रणव सखदेव यांच्या वॉल वरून)धनंजय दिवाळी अंक २०२५ हा नारायण धारप विशेषांक आहे. त्यात माझी बुकशेल्फ ही कथा प्रकाशित होत...
11/10/2025

(प्रणव सखदेव यांच्या वॉल वरून)

धनंजय दिवाळी अंक २०२५ हा नारायण धारप विशेषांक आहे. त्यात माझी बुकशेल्फ ही कथा प्रकाशित होते आहे. मुळात विविध प्रकृतीच्या लेखकांकडून भय, गूढ प्रकारात कथा लिहून घेण्याची ही कल्पना मला विशेष वाटली. कथेतला थोडासा भाग -
---
आणि आता विचित्र वाटलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्या दोघा वीरांनी लिफ्ट असूनही, बुकशेल्फ उचलून जिन्यावरूनच आणलं. बरं आम्ही पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर राहत असतो तरी एकवेळ समजलं असतं. पण सातव्या मजल्यावर एवढं जड बुकशेल्फ उचलून आणायचं, म्हणजे महाकाय कामच म्हणायचं.
मी त्यांना म्हणालोही, ‘अहो, लिफ्ट होती. जिन्याने का आलात?’
दोघंही एकासुरात म्हणाले, ‘साहेब आम्हाला आमची रग जिरवायची संधीच मिळत नस्ते हो. मग असं काम अस्लं ना बरं वाटतं. आम्ही जड जड सामानं पाचव्या-सहाव्या मजल्यावर पोचवायची कामं मुद्दामच घेतो. हल्ली अशी शक्ती दाखवताच येत नाही कुटे हो. पूर्वी बरं असायचं, लढाया, युद्धं करावी लागायची, ओझी वाहावी लागायची. आता मशिनंच सगळं करतात.’
‘बरं, बरं,’ मी हसण्यावारी नेलं. मला वाटलं, ते माझी मजा घेताहेत. पण त्यांचे डोळे निर्भाव होते. जणू ते अलिप्तपणे ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ सांगत असावेत असे बोलत होते. मी त्यांचं नाव विचारलं, तर एक म्हणाला, ‘मी अहिरावण.’ लगेच दुसरा म्हणाला, ‘मी महिरावण.’ मग त्यांचे तंबाखू खाऊन पिवळे-तपकिरी झालेले दात लकाकले. ते शांत स्वरात म्हणाले, ‘ल्हानपणापास्नं आडदांड आम्ही, आईच्या पोटातून आल्या आल्या आम्ही दोघांनी जो टाहो फोडला की हॉस्पिटलच्या काचा फुटल्या, आणि ज्या डॉक्टरने गांडीवर चापटी मारली, त्याला रागाने अशी काय एक लाथ मारली की त्याचा हातच फ्रॅक्चर झाला. म्हणून बापाने अशी नावं ठेवली आमची.’
---
(बुकशेल्फमधला निवडक भाग, आगामी कथामालिका/मोझाइक नॉव्हेल असेल हे. चित्र - रविकांत सोईतकर)
अंक जरूर विकत घ्या, वाचा आणि कळवा.
#धनंजय #दिवाळीअंक #नारायणधारप

Neelima Kulkarni Anushree Shenoy Kiran Kshirsagar

(पंकज भोसले यांच्या वॉलवरुन)विशेषणी व्याख्यानांपलीकडले...वर्षभरापासून धारपांविषयी विशेषणी व्याख्यानांपलीकडे अभ्यासपूर्ण ...
10/10/2025

(पंकज भोसले यांच्या वॉलवरुन)

विशेषणी व्याख्यानांपलीकडले...
वर्षभरापासून धारपांविषयी विशेषणी व्याख्यानांपलीकडे अभ्यासपूर्ण असा मजकूर देखील येतोय, हे फार महत्त्वाचे. मी गेल्या वर्षभरात त्यांच्या भयकथांमधील बरेच संदर्भ उकरून उकरून त्यांना निवेदक करणारी एक कथा सुरू केलीय. ‘दप्तरदारची पुस्तके’ या शीर्षकाची. माझ्या नव्या कथामालिकेची शीर्षक असलेली गोष्ट. आता ही कथा घडते कुठे तर पुण्यात सदाशीव पेठेतल्या त्यांच्या नातूबागेतल्या जुन्या घरात नाही, तर (आजच्या) जंगली महाराज रोडवरून ओंकारेश्वर पुलाजवळ जाताना ड्याव्या बाजूला केव्हातरी असलेल्या त्यांच्या डेक्कन फर्नीचर या दुकानापासून. पानशेतच्या पुरामध्ये त्यांची खासगी लायब्ररी पूर्णपणे नष्ट झाली. एका आख्ख्या लायब्ररीत त्यांनी जमविलेली क्लासिक भयकथांची पुस्तके, मासिकांचे अनेक गठ्ठे होते. तर मी मनाने आणि अभ्यासाने कित्येक महिने त्या १९६१ सालात डोकावत होतो. भरपूूर संदर्भ आणि नोट्स तयार केल्या. पानशेत पुराच्या संदर्भातील असलेल्या साऱ्या साहित्याचा आणि तपशीलांचा फडशा पाडला. कथा पूर्ण करून ‘धनंजय’लाच देण्याचे ठरविलेले. मग कथा लिहिण्यामध्ये, पूर्ण करण्यामध्ये अनंत अडचणींनी मला ग्रासले. कामाचा ताण आणि लिहिण्याचा, हाती आलेल्या तपशीलांचा ताण यांमध्ये कथा आणि तिची डेडलाईन पुढे पुढे सरकत गेली. धनंजयची डेडलाईन (रेषा) पार पुढे-पुढे जात राहिली आणि माझ्या ताणबिंदूचाही विस्तार झाला. कथा माझ्या मनासारखी पुढे सरकायला वेळेवर आणखी संक्रांत आली. त्यातूनही मिळेल तसा आणखी काही संदर्भांना पडताळून पाहण्याचा माझा हट्ट सुरू झाला. परिसराचे नकाशे तपासले. नातूबागेतून सायकलवर धारप डेक्कन फर्नीचरपाशी येत, ते सगळे मार्ग आता पुन्हा नव्याने पालथे घातले. १९६१ सालातील पुण्यातील संगीत मंडळे, संस्था यांची उगाचच माहिती ओरपणी केली. मग पूर पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोकांना भेटत राहिलो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नोंदवत राहिलो. या सगळ्याचा काळ-वेळ आणि माझ्या तपशीलांचा वाढत जाणारा आवाका यांमुळे मी कथा आणखी फुरसदीत- डेडलाईनविरहीत हेड- शाबूत ठेवून लिहिण्याचे पक्के केले. कथा वेळीच सांगितल्या नाहीत, तर मरतात हे ऋषीकेश गुप्तेचे गृहितक मानायला मी काही तयार नाही. कथा जशी सांगायची, तशी ती सांगितली जाणार नाही. पण मरणार नाही, हे नक्कीच. .. अडवून ठेवलेल्या अंकाच्या डेडलाईनला आणखी एक आठवड्याने पुढे सरकवत मी कथेसारखा एक लेखच लिहीला. धनंजयच्या धारप विशेषांंकासाठी. तर त्या लेखाच्या लिखाणकाळात मेंदूतून दुसरी एक नवीच कथाकल्पना निर्माण झाली. टेंभीनाक्याजवळ असणाऱ्या वाडिया या दवाखान्याच्या बाजूला असलेल्या जोशीवाडा या लहानपणी पाहिलेल्या भागाविषयी. धारपांच्या कथेशी संबंध असलेली.
‘लुकुण्डू’ या इंग्रजी कथेमध्ये शापामुळे व्यक्तीच्या शरीरातून रोज नवा जीव तयार होत असतो. तर माझ्या स्वत:च्या कथा आणखी-आणखी लांबवत नेण्याच्या आत्महट्टामुळे आधीच्या अपुऱ्या कथेचे लिखाण पूर्ण होण्याआधीच या नव्या विषयाला भिडायची तीव्र इच्छा झाली. तो सारा मोह टाळून हा तब्बल सहा हजार शब्दांचा लेख (किंवा कथालेख म्हणा) तयार झालाय.
धारपांच्या चेटूक या समर्थ कथेचे चेटूक बराच काळ माझ्यावर होते. या कथालेखात चेटूक, अघोरी हिरावट आणि काही वैशिष्ट्यपूर्ण कथांचा माग आहे.
तो कसा, याच्या तपशीलात जाण्यासाठी अंकातच अनुभव घ्या...
धनंजयमध्ये मुख्य धारेत लिहिणाऱ्या इतर १० ते १२ कथा आणि लेखांचा विशेष विभाग फक्त धारपांवर आहे. या लेखकांनी पहिल्यांदाच धनंजयमध्ये लिहिले आहे.
पुढल्या वर्षी दप्तरदारची पुस्तके ही कथा येईलच, तोवर यंदाच्या अंकातला ‘लुकुण्डू, चेटूक आणि अघोर कथा जगत...’ हा कथालेख जमल्यास वाचा.
फोटोओळ - अघोरी हिरावट कथासंग्रहाचे पहिल्या आवृत्तीचे थोर मुखपृष्ठ...

-------

धनंजय दिवाळी अंक (नारायण धारप विशेषांक)
मूल्य - 450 रुपये / पृष्ठसंख्या - 360 (घरपोच मोफत)
अंक नोंदणी - 98200 19703 (Gpay) / 9664241946 (Gpay)
#धनंजय #दिवाळीअंक #नारायणधारप

Anushree Shenoy Neelima Kulkarni Kiran Kshirsagar

(प्रसाद कुमठेकर यांच्या वॉलवरुन)कुमार गंधर्वांनी गायलेल्या  ‘भोला मन जाने अमर मेरी काया’ या निर्गुणी भजनात 'बालू की भीत ...
09/10/2025

(प्रसाद कुमठेकर यांच्या वॉलवरुन)

कुमार गंधर्वांनी गायलेल्या ‘भोला मन जाने अमर मेरी काया’ या निर्गुणी भजनात 'बालू की भीत पवन का खंभा ' या ओळी पहिल्यांदा ऐकलेल्या. वाळूची भिंत आणि तिला आधार कसला तर निराधार असलेल्या वाऱ्याच्या खांबाचा. ही एक अशक्य कल्पना आहे.
मुळात अस्थिर गोष्टींना शाश्वत आधार मानण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. षडरिपुनी ग्रासलेल्या माणसाला भ्रमात राहायला आवडतं. त्यातूनच भ्रम आणि संभ्रमाचं कोडं निर्माण होतं. आणि तेच पिढी दर पिढी खोल खोल रूजत जातं.
या कथेचा जन्म झाला तेव्हा हिचं शीर्षक ‘बालू की भीत पवन का खंबा’ असं होतं. मराठी नाव असावं म्हणून मी ते 'वाळूची भिंत वाऱ्याचे खांब' असं केलं. पण संपादक किरण क्षीरसागर यांना दिवाळी अंकासाठी हे शीर्षक जरा जड जटिल वाटलं. वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारं, त्यांना आत खेचून घेणारं सोपं सहज नाव हवं असं त्यांचं म्हणणं होतं. विचारांती ‘दिपुनानाची बारव’ हे नाव समोर आलं. या नामांतराने कथेचं मस्तक बदललं. शरीर आणि आत्मा तोच आहे.
एक कुआँ पाँच पनियारी
जल भरती है न्यारी न्यारी ||
डट जाएगा कुआँ, सूख जाएगी क्यारी
हाथ मल मल चली पाँचो पानियारी ||
धनंजय दिवाळी अंक २०२५.
विकत घ्या. वाचा.
ता.क. ही कथा घडली ती किरण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे. जेवढी माझी तेवढीच त्यांची.
चित्र - रविकांत सोईतकर
--
धनंजय दिवाळी अंक (नारायण धारप विशेषांक)
मूल्य - 450 रुपये / पृष्ठसंख्या - 360 (घरपोच मोफत)
अंक नोंदणी - 98200 19703 (Gpay) / 9664241946 (Gpay)
#धनंजय #दिवाळीअंक #नारायणधारप

Neelima Kulkarni Kiran Kshirsagar Anushree Shenoy Prasad Kumthekar

(गणेश मतकरी यांच्या वॉलवरुन)प्युअर फिक्शन ही मिथ आहे. प्रत्येक लेखक हा एका अर्थी आत्मकथनात्मकच लिहीत असतो. म्हणजे व्यापक...
07/10/2025

(गणेश मतकरी यांच्या वॉलवरुन)

प्युअर फिक्शन ही मिथ आहे. प्रत्येक लेखक हा एका अर्थी आत्मकथनात्मकच लिहीत असतो. म्हणजे व्यापक अर्थाने. तो काही आयुष्यातले अनुभवच उतरवून काढेलसं नाही; ज्याला आत्मकथनपर कथा म्हणण्याची एक प्रथा आहे. पण मला तसं म्हणायचं नाही. प्रत्येक कथा ही लिहिणाऱ्याच्या डोक्यातून येत असेल, तर तिथे ती कुठून आली याला काहीतरी विशिष्ट कारण असतं. कथेपुरत्या तो त्रयस्थपणे अनेक बाजू मांडत असला, तरी तो खरा कोणत्या बाजूला आहे हे त्याच्या कथेतून लक्षात येऊ शकतं. त्याचा दृष्टीकोन त्याच्या आयुष्यभराच्या अनुभवातून तयार झालेला असतो. सबब, असं म्हणता येईल की हे अनुभव हे त्या साहित्यनिर्मितीमागचं कारण आहेत. मग ते साहित्य कोणत्याही प्रकारचं असो. गंभीर तत्वचिंतनात्मक, बेस्टसेलर किंवा जान्रं फिक्शन, शेवटी सारं काही सुरु होतं ते लिहिणारा कोण आहे इथपासूनच. हा खरं तर एखाद्या लेखाचा विषय आहे, पण तो पुन्हा कधीतरी लिहिन.
बाबांचा कायमच अनेक चळवळींशी संबंध आला. गिरणी कामगारांचा लढा, निर्भय बनो, नर्मदा बचाव, अशा अनेक चळवळींशी ते संबंधित होते. या चळवळींमधले लोक आमच्याकडे येत असत, हे लढे काय पद्धतीने पुढे जातायत यात मी व्यक्तीशः गुंतलो नाही तरी अप्रत्यक्षपणे मला त्यांचा आलेख दिसत असेच. हा आलेख काही वेळा माझ्या लिहिण्यात डोकावतो. माझं ‘फ्री फॅाल’ जर कोणी वाचलं असेल तर त्यातल्या ‘खुर्ची’ या कथेला कामगार लढ्याची आणि पुढल्या आफ्टरमॅथची पार्श्वभूमी असल्याचं लक्षात येईल, जरी कथेतल्या घटना या आंदोलनातल्या नाहीत. गिरणी कामगारांच्या लढ्यावर बाबांनी ‘गणेश गिरणीचा धैकाला’ नावाचं एक प्रायोगिक नाटक केलं होतं ज्यात मी एक छोटी भूमिकाही करत असे. मी आर्किटेक्चर पास झाल्यावर गिरण्यांच्या भग्नावस्थेतल्या खंडहरवजा इमारती , शहरातल्या नव्या जनतेला या इतिहासाची सुतराम कल्पना नसणं, आणि या लॅन्ड पॅाकेट्सचा बांधकाम व्यवसायावर होत गेलेला परिणाम हेदेखील पाहण्यात आलच. धनंजय दिवाळी अंकातल्या माझ्या ‘वास्तुपुरुष’ या कथेचं मूळ या सगळ्यात कुठेतरी आहे.
गंमत म्हणजे या कथेची कल्पना अत्यंत साध्या गोष्टीतून सुचली, जी खरी घडली की नाही याबद्दलही मी साशंक आहे. मला असं पुसटसं आठवतं, की मी खूपच लहान असताना एकदा बाबा घरी खूप उशीरा आले. दुसऱ्या दिवशी मला आईने सांगितलं की स्टेशनवर कोणीतरी त्यांच्या गळ्यातली चेन खेचली, काहीतरी झटापट झाली आणि त्यांना थोडं लागलं. त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. या घटनेवरून/ आठवणीवरुन मला प्रथम जे दिसलं ते, आणि ‘वास्तुपुरुष’ कथा यात काहीही साम्य नाही. हा फारतर एक टेक ऑफ पॅाईन्ट होता असं म्हणावं लागेल. पण टेक ऑफ पॅाईन्ट महत्वाचे असतात. आणि प्रत्यक्षात आपण कोणत्या वाटेला जाणार याची लेखकांना कल्पना असतेच असं नाही. मला तरी नसतेच.

धनंजय दिवाळी अंक (नारायण धारप विशेषांक)
मूल्य - 450 रुपये / पृष्ठसंख्या - 360 (घरपोच मोफत)
रेखाचित्र - Ravikant Soitkar
अंक नोंदणी - 98200 19703 (Gpay) / 9664241946 (Gpay)

#धनंजयदिवाळीअंक

Ganesh Matkari Kiran Kshirsagar Neelima Kulkarni Anushree Shenoy

04/10/2025
'धनंजय' दिवाळी अंक २०२५च्या  नारायण धारप विशेषांकांचं अंतरंग.मूल्य - ४५० रुपये / पृष्ठसंख्या - ३६०सवलतीत ३६० रुपये + पोस...
04/10/2025

'धनंजय' दिवाळी अंक २०२५च्या नारायण धारप विशेषांकांचं अंतरंग.

मूल्य - ४५० रुपये / पृष्ठसंख्या - ३६०
सवलतीत ३६० रुपये + पोस्टेज फ्री - सवलत उद्या ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत
अंक नोंदणी - 98200 19703 (Gpay) / 9664241946 (Gpay)

रेखाटन - Ravikant Soitkar

Neelima Kulkarni
Kiran Kshirsagar
Anushree Shenoy
Saurabh Kulkarni

#धनंजयदिवाळीअंक

04/10/2025

चंद्रकांत दिवाळी अंक २०२५!
लवकरच प्रकाशित होत आहे.

लवकरच प्रकाशित होत आहे नारायण धारप विशेषांक दिवाळी २०२५!
27/09/2025

लवकरच प्रकाशित होत आहे नारायण धारप विशेषांक दिवाळी २०२५!

धनंजय दिवाळी अंक २०२४. Amazon.in वर उपलब्ध:
24/10/2024

धनंजय दिवाळी अंक २०२४.

Amazon.in वर उपलब्ध:

वर्ष सरकत राहतात, काळाचा पट मागे पडतो, जुनं मागे पडतं. विज्ञानाची प्रगती होते पण निसर्ग आपली ताकद दाखवतच असतो. मनुष....

24/10/2024

✨ दिवाळीचा आनंद, गोष्टींच्या सोबत! ✨

आमच्या या विशेष दिवाळी अंकात तुमच्यासाठी आहे अस्सल मराठी कथांचा खजिना! 💫 छोट्या गोष्टींमध्ये मोठा आशय, जीवनाचे विविध रंग आणि अनुभव.

✨ शब्दांचे सुंदर विश्व आणि अनुभवांची खाण यासाठी आजच तुमचा अंक मिळवा! 📚

#दिवाळीअंक #मराठीकथा #दिवाळी२०२४ #शब्दांचीसांज

Neelima Kulkarni
Anushree Shenoy
Aditi Kulkarni
Kaustubh Kulkarni
Dhananjay Diwali Magazine

रहस्यमयी कथा प्रेमींसाठी खास! धनंजय च्या नव्या अंकात तुम्हाला भेटणार आहेत थरारक कथा, गूढ गोष्टी, आणि बुद्धीला चालना देणा...
16/10/2024

रहस्यमयी कथा प्रेमींसाठी खास!
धनंजय च्या नव्या अंकात तुम्हाला भेटणार आहेत थरारक कथा, गूढ गोष्टी, आणि बुद्धीला चालना देणारे रहस्यप्रसंग!

तुमचा आवडता प्लॉट कोणता असेल? वाचून कळवा! 😎📖

#रहस्यकथा #गूढप्रेम #कथामेळा

Address

Rajendra Prakashan, Girgaon
Mumbai
400004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhananjay Diwali Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category