
31/03/2025
🎭 नाट्यप्रेमी परिवारच्या ‘१२ महिने, १२ नाटके’ योजनेचे भव्य २०व्या वर्षात पदार्पण! 🎭
गेली १९ वर्षे सातत्यपूर्ण एखादी योजना चालविणे हे प्रचंड अवघड काम समीर बापर्डेकर या ध्येयवेड्या नाट्यप्रेमीने यशस्वी करून दाखविले आहे. अनेक नवनव्या आव्हानांवर, अडचणींवर मात करत त्यांनी ही नाट्यचळवळ १९ वर्षे यशस्वी राबविली आहे. ही योजना सुरु राहण्यामध्ये दर्दी नाट्यरसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आणि आशीर्वादाने, गेली १९ वर्षे, वर्षभर सवलतीच्या दरात '१२ महिने १२ नाटके' ही योजना यशस्वीरीत्या सुरु आहे. दर्जेदार नाटकांची निवड आणि अत्यंत काटेकोर व शिस्तबद्ध नियोजन हे या यशाचे फलित असून आता ही १९ वर्षांची परंपरा यापुढेही अशीच अखंड सुरु ठेवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता चालू २०२५ या वर्षी २० व्या वर्षात भव्य पदार्पण करीत असून आजपासून २०२५ - २०२६ ची सशुल्क सवलत सभासद नोंदणी सुरु करीत आहोत. नाट्यपरिवार संस्थेने ही योजना केवळ मुंबईतील मध्यवर्ती असलेल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथील सोमवार ते शनिवारी होणाऱ्या प्रयोगांसाठी असणार आहे. मर्यादित संख्येत उपलब्ध असलेल्या सवलतीच्या सभासदत्वाची संधी रसिकांनी नक्कीच सोडू नये, अधिक माहिती आणि सभासद नोंदणी साठी संपर्क श्री. समीर बापर्डेकर : 9769977380
योजनेचे तपशील खालीलप्रमाणे :
1. सर्व नाटके सोमवार ते शनिवार दुपारी 4.00 वाजता यशवंत नाट्य मदिंर, माटुंगा येथे होतील.
2. सभासद फीस E to O row साठी ₹.3,800/- & रू. 3,700/-
3. सभासद झाल्यावर सभासदाना एक ओळखपत्र देण्यात येईल ज्यावर त्यांचा आसन क्रमांक लिहिला असेल. (जो सर्व नाटकांसाठी एकच असेल). हे ओळख पत्र नाटकाला येताना घेऊन येणे बंधनकारक असेल.
4. ओळख पत्र हस्तांतरणीय (transferable) असेल. म्हणजेच एखाद्या नाटकाला सभासद स्वतः येऊ शकत नसेल तर तो त्याच्या ओळखपत्रावर दुसर्या व्यक्तीला पाठवु शकतो. मात्र त्या व्यक्तीने ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.
5. सभासद होण्याची वर्गणी रोख, धनादेश किंवा NEFT / गूगल पे द्वारे स्वीकारली जाईल.