14/11/2025
आरटीआय एक्टिविस्ट, माहितीचा अधिकार
विषय कौतुकाचा की करूया धिक्कार…
आपण येथे केवळ आपल्या या राज्याच्या महाराष्ट्राच्या माहितीच्या अधिकारावर विचार करूया ज्याची सुरुवात अण्णा हजारे यांचे आभार मानून करूया ज्यांनी हा अधिकार आपल्याला मिळवून दिला. राज्यातल्या बहुतेकांची सवय माझ्या माहितीच्या एका दुष्ट माणसासारखी ज्याला नागपुरातील एक स्त्री भाऊ म्हणायची भाऊ म्हणायची म्हणजे या स्त्रीने आपल्या या मानलेल्या भावाला सर्वोतपरी मदत करून पुढे मुंबईत पाठविले एक दिवस याच भावाकडे या स्त्रीने पोटच्या देखण्या तरुण मुलीला मुंबईत त्याच्याकडे नोकरीनिमित्ते पाठविल्यानंतर त्याने तिलाच वेश्या व्यवसायात मोठ्या खुबीने ढकलले. राज्यातील प्रत्येक योजना आणि निर्णय हे सुरुवातीला या अशा देखण्या तरुणीसारखे असतात मात्र आम्ही बहुतेक सारेच्या सारे प्रत्येक निर्णयाला आणि योजनांना त्या कंस मामासारखे ठार वेश्या बनवून सोडतो टाकतो आणि त्यातलाच एक हजारे यांनी आम्हाला मिळवून दिलेला माहिती अधिकार. चार दोन वर्षांपूर्वी माझ्याशी त्यावेळचे ठाणे महापालिकेचे आयुक्त गप्पा मारताना म्हणाले की ठाणे पुणे नागपूर आणि मुंबईत किंवा या पद्धतीच्या महानगरातून शहरातून माहितीचा अधिकार लोकांना मिळाल्यानंतर जेवढ्या म्हणून इमारती उभ्या राहिल्या त्या सर्व इमारतींनी जे आरटीआय एक्टिविस्ट आहेत होते त्या सर्वांना श्रीमंत करून टाकले ज्यांची तत्पूर्वी दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत होती, म्हणजे अमुक एखाद्या भूखंडावर इमारत उभी करताना त्या त्या बिल्डरला जे विविध मंडळींना म्हणजे त्यात महापालिका आमदार नगरसेवक स्थानिक गुंड आणि नेते इत्यादींना जशी नेहमीची टक्केवारी मोजावी लागते त्यातला प्रमुख घटक त्या परिसरातले ठरलेले नेहमीचे आरटीआय एक्टिविस्ट असतात त्यांच्यासाठी सुरुवातीलाच तो बिल्डर ठराविक रक्कम बाजूला काढूनच म्हणजे सारेच बिल्डर आजकाल प्रभावी नेत्यांची भागीदारी घेत इमारती बांधतात ते देखील यांना घाबरून पैसे मोजतात अन्यथा असे न केल्यास पुढल्या काही दिवसात त्या इमारतीच्या बांधकामावर न्यायालयाची हमखास स्थगिती आणल्या जाते. पुण्यातला एक प्रख्यात की कुख्यात तथाकथित पण सतत टीव्हीवर दिसणारा समाजसेवक आरटीआय एक्टिविस्ट तर प्रत्येकाला मी सोडून अर्थात घाबरावतो त्यानंतर त्याचा पर्यावरण खात्याशी संबंधित व्यवसाय मस्त पैसे त्यातून तो हमखास दररोज कमावतो. विशेष म्हणजे तोही ब्राह्मण आहे…
माझ्या ओळखीचे ज्यांना मी ते पैशांनी भिकारी होते तेव्हापासून अगदी जवळून बघतो आज ते अनुक्रमे मुंबई ठाणे जिल्हा आणि पुण्यातले वरकरणी अतिशय नामवंत आरटीआय एक्टिविस्ट आहेत मात्र ज्यांची एकेकाळी दोन वेळच्या जेवणाला भ्रांत होती आज त्यांची मालमत्ता डोळे दिपवून टाकणारी आहे ते तिघेही हजार कोटींच्या आसपास अगदी सहज आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात अमुक एखादा विषय हाती घेतला रे घेतला की त्यात त्यांना कित्येक कोटी मोजल्याशिवाय ते माघार घेत नाहीत, वाटल्यास मी त्यांची नावे द्यायला तयार आहे पण प्रसंगी पोलीस देखील त्यांना घाबरून त्यांच्या केसेस बंद करतील एवढे या पद्धतीचे आरटीआय एक्टिविस्ट कायद्याचा अभ्यास करून प्रसंगी त्या पोलिसांची देखील या अधिकारात माहिती घेऊन त्यांना घाबरवतील. या पद्धतीच्या आरटीआय एक्टिविस्टचे वैशिष्ट्य असे की ते ज्यांना माहितीच्या अधिकारात सुरुवातीला प्रचंड अडचणीत आणतात पुढे त्यांना एकदा का मोठी रक्कम मिळाली की हेच एक्टिविस्ट त्या व्यक्तीला आणलेल्या संकटातून मार्ग काढून बाहेर काढतात त्याच्यावर त्यांनी आणलेल्या संकटातून ते त्याला खुबीने बाहेर काढतात. अंजली दमानिया माहेरची मराठी ब्राह्मण तिचे बालपण आणि लग्न केल्यानंतर आजवरचे तिचे आयुष्य अगदीच माझ्या घराच्या आसपास सांताक्रुझ पश्चिमेला,आम्हा जोशी कुटुंबियांची अंजली अतिशय आवडती आणि लाडकी थोडक्यात तिच्या कोणत्याही संकटात आमची तिला नक्कीच साथ असेल यात तीळमात्र शंका नाही, आता तिने अजित पवार आणि कुटुंबियांचा जो विषय उचलून धरला आहे तिच्याकडे असलेले जे पुरावे आहेत त्यातून थेट वरून देव जरी अवतरले तरी अजित पवार आणि कुटुंबियांची त्यांनी केलेल्या भानगडीतून भ्रष्टाचारातून नक्की सुटका नाही पण हेच माझे मत थेट नितीन गडकरी यांच्या बाबतीत होते जेव्हा अलीकडे अंजलीने त्यांचा विषय सुरुवातीला उचलून धरला पण नंतर तिचे आरोप पाठपुरावा सारे काही हवेत विरल्यासारखे झाले कारण पुढल्या केवळ काही दिवसातच अंजली त्या गडकरी आणि कुटुंबियांना याच पवार पद्धतीने रस्त्यावर आणणार होती पण आज तरी असे दिसते आहे की अंजलीने तो विषय संपवलेला आहे मला मात्र त्यावर अतिशय वाईट वाटले आहे की अंजली सुद्धा अमुक एखादा विषय इतर बदमाश बिलंदर भ्रष्ट आरटीआय एक्टिविस्ट सारखा अर्ध्यावर सोडून देऊ शकते !!नेमके हे असेच अजित पवार प्रकरणी तिच्या हातून घडले तर, म्हणजे एकमेव या राज्यातील अतिशय धाडसी पराक्रमी मेहनती बुद्धिमान अभ्यासू तेजस्वी आरटीआय एक्टिविस्टला आम्ही गमावून बसणार आहोत की काय ? ज्या अंजलीच्या आजपर्यंत मी नमस्कार करण्यासाठी थेट तिच्या पावलांकडे बघतो उद्या तिच्याकडे रागाने बघण्याचा वेळ देवाने माझ्यावर आणू नये किमान तिने गडकरी विषय का किंवा कोणाच्या दबावाला बळी पडून थांबविला हे जाहीर करावे म्हणजे आम्ही या राज्यातले तिचे चाहते तिच्याकडे देखील संशयाने बघणार नाही किंवा मी ज्या पद्धतीने या राज्यातल्या नावाजलेल्या पण अति भ्रष्ट आरटीआय एक्टिविस्ट पायाशी ठेवतो ती वेळ माझ्यावर येणार नाही, अंजली तुला हात जोडून विनंती करतो की पाप करणारे अतिशय गांडू असतात तू कृपया त्यांना बळी पडू नको आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत….
विषय अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी