15/09/2026
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा भव्य आगमन सोहळा ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पार पडला. फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून बाप्पांची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली आणि वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित जय गणेश प्रांगणात बाप्पा विराजमान झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या देखण्या सोहळ्याचा नयनरम्य नजारा ड्रोन व्हिडिओतून पाहायला मिळाला.