Mumbai Marathi News

Mumbai Marathi News Mumbai Marathi is a trustworthy, unbiased, and people-centric digital platform for Marathi news.
(1)

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. महाराजपूर परिसरातील ३२ वर्षीय तीन मुलांची आई ६ सप्टेंबर रोजी माह...
19/09/2026

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. महाराजपूर परिसरातील ३२ वर्षीय तीन मुलांची आई ६ सप्टेंबर रोजी माहेरच्या घरातून अचानक निघून गेली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासात ती कानपूरच्या पनकी परिसरात दिल्लीतील २५ वर्षीय तरुणीसोबत राहत असल्याचे समोर आले. महिलेने पती आणि कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार देत त्या तरुणीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

#कानपूर #उत्तरप्रदेश #अजबप्रेमकहाणी #प्रेमकहाणी #कानपूरन्यूज #महाराजपूर #पनकी

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मात्र...
19/09/2026

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यात मालिकावीर ठरलेल्या आणि १५१ धावा करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संपूर्ण मालिकेत संधी मिळाली नाही. अंतिम सामन्यातही त्याऐवजी अनुभवी संजू सॅमसनला पसंती देण्यात आली. मालिकेनंतर पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वैभवला संधी न देण्यामागील कारण स्पष्ट केले.
#वैभवसूर्यवंशी #गौतमगंभीर #संजूसॅमसन

19/09/2026

ही कसली स्टंटबाजी? विनाहेल्मेट बाईकवर ‘सुपरमॅन’ स्टंट

19/09/2026

नवले पुलावर वाहनांचा थरारक अपघात, ब्रेक फेल झाल्याने अनेक गाड्या धडकल्या
#पुणे #नवलेपूल #अपघात

पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पेस परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. या परिषदेदरम्यान अ...
19/09/2026

पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पेस परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. या परिषदेदरम्यान अनेक उद्योजकांशी स्पेस उद्योग आणि गुंतवणुकीबाबत चर्चा झाली. भारतातील पहिले अंतराळ पार्क महाराष्ट्रात उभारण्याचा मानस असल्याचे सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पेस क्षेत्रातील विचारविनिमयासाठी मुंबईत फेब्रुवारी २०२७ मध्ये स्पेस परिषद आयोजित करण्यात येणार असून, फ्रान्समधील स्पेस क्षेत्रातील उद्योजकही त्यात सहभागी होणार आहेत.
#अंतराळपार्क #स्पेसपार्क #उदयसामंत #महाराष्ट्र #अंतराळतंत्रज्ञान #स्पेसइंडस्ट्री

गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान तांबोसे परिसरात दाखल झालेल्या ‘ओंकार’ हत्तीने दिवसभर धुमाकूळ घातला. हत्तीने भातशेती आणि ब...
19/09/2026

गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान तांबोसे परिसरात दाखल झालेल्या ‘ओंकार’ हत्तीने दिवसभर धुमाकूळ घातला. हत्तीने भातशेती आणि बागायतींचे नुकसान केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळनंतर ‘ओंकार’ने तेरेखोल नदी पार करून पुन्हा सिंधुदुर्गातील कास परिसराच्या दिशेने कूच केली. त्यामुळे स्थानिकांनी तात्पुरता सुटकेचा नि:श्वास सोडला
#ओंकारहत्ती #सिंधुदुर्ग #तेरेखोलनदी #हत्ती #हत्तीचाधुमाकूळ #शेतीचेनुकसान #भातशेती #बागायती

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई ...
19/09/2026

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सुकृति फूड्सचा मालक कैलाश चंद मंगला याला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, शुद्ध गायीच्या तुपाऐवजी रिफाइंड पाम ऑइल, पाम कर्नेल ऑइल, पामोलिन आणि विविध रासायनिक घटकांचे मिश्रण करून तयार केलेले तूप पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आ

19/09/2026

विटा उचलताना अचानक निघाला ब्लॅक कोब्रा, नागरिकांमध्ये उडाली खळबळ

19/09/2026

सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला

19/09/2026

गणपती बाप्पाच्या विसर्जनाला कृष्णा अभिषेकच्या कुटुंबाची भावुक उपस्थिती

Address

Kandivali East
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Marathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share