Amchimansa

Amchimansa आपल्यासाठी सदेव तत्पर.....

23/09/2019
जैसे थे!निरव शांतता, झाडेमाडे चहुबाजुंना धुके उभे मधोमध घर कौलारू स्थितप्रज्ञागत मुके कोकणातल्या गावागावात घराघरात बहुता...
11/09/2019

जैसे थे!

निरव शांतता, झाडेमाडे
चहुबाजुंना धुके
उभे मधोमध घर कौलारू
स्थितप्रज्ञागत मुके

कोकणातल्या गावागावात घराघरात बहुतांश लोकांकडे दीड दिवस किंवा पाच दिवस बाप्पा मुक्कामाला असतो. विसर्जनाचा आणि विसर्जनानंतरचा एक दिवस बाप्पाच्या निरोपानंतर आणखी एका निरोपाच्या क्षणाची संध्याकाळ घेऊन येणारा असतो. चाकरमानी, मुंबईव्यतिरिक्त इतर शहरं, राज्यांतनं आलेल्या लेकी - सुना, लेक-जावई, नातवंड-पतवंड सगळी जण ट्रेन म्हणू नका, एश्ट्या म्हणू नका, मोटारी म्हणू नका, ट्रक म्हणू नका जे काय मिळेल त्या वाहनाने नोकरीचा पदभार पुन्हा सांभाळण्यासाठी जायला निघतात. बाप्पा जातो तेव्हा इतकाच हाही क्षण कोकणच्या माणसासाठी प्रचंड भावनिक असतो.

चार - सहा दिवस नुसती हुंदडणारी पोरं - टोरं, हौस - मौज करणारे बापे लोक, हौशीने रांधून वाढणाऱ्या सुना -‌माहेरवाशिणी सगळे असताना कसं घर भरलेलं असतं. पण एका दिवसात हे अवसान ओसरतं. खोलीन् खोली पुन्हा अंधारी होते.

वर्षातनं एकदा चकचकीत साफ झालेल्या कंदीलावर काजळी धरायचे दिवस इथून पुढे पुन्हा सुरु होतात.

पोटाची खळगी भरायला इथला माणूस बाहेर जातो. कोणी वेटर‌ आहे, कोणी ड्राईव्हर आहे, कोणी कटिंग करतो, कोणी ब्यांकेत नोकरी करतो, कोण कुठल्याशा हॉटेलात म्यानेजर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी सरकारी कार्यालयात कारकून आहे, कोणी ब्रोकर आहे, कोणी टॅक्सी - रिक्षा चालवतो, कोणी दूधाचा व्यवसाय करतो, कोणी कुठल्याशा स्टुडिओत काम करतो, कोणी कुठल्या मॉलमध्ये, कोणी सिक्युरिटीमध्ये काम करतो, कोणी न्यूज चॅनेलला आहे, कोणी डिलिव्हरी पार्टनर आहे, कोणी अजून काय करतो. सगळे बाप्पासमोर सारखेच नि आपापल्या आयशी-बापसाला तितकेच प्रिय. चार - सहा दिवस आले की घराला घरपण येतं.

चार भिंतींवर लावलेली माती दरवळते अहो अक्षरश:!

शेणाच्या सारवणाने तयार केलेली जमिन पण बेल्जियम ग्रेच्या दोन फूट बाय दोन फूट लाद्यांपेक्षा जास्त गुळगुळीत लागते पायाला.

दारातला सांडलेल्या प्राजक्ताच्या सड्याला तोळं तोळं सोन्याइतकं कौतुक करुन जमवतात ही मोकळं - ढाकळं जगणारी माणसं.

गुलबक्षीच्या वेण्या करीत बसलेल्या लेकी,
पत्ते कुटत राजकारणाच्या गफ्फा मारीत बसलेले काका-मामा,
'आमच्या वेळी सासूबाई इतकं सगळं करायला लावायच्या' असं पुढच्या पिढीच्या सुनांना सांगणाऱ्या सासवा,
सुपारी कातरीत 'मिळालेलं आयुष्य सुखात गेलंय, याच्यापुढे पोरांचं भलं होऊ दे' अशा आशयाच्या निरवानिरवीच्या गप्पा करत बसलेली सगळी जुनी खोडं...

हे डोळे भरुन यावेत असं चित्र एकाच दिवसात...

पागोळ्यांचे आवाज,
झोपाळ्याची करकर,
काळोखी पडवी,
कुंद वातावरण,
देवघरात एकच मंद निरांजन
नि समोर कोणीतरी पुटपुटावं एवढ्याच आवाजात पोथी वाचत बसलेली म्हातारी इथेच येऊन ठेपतं.

वाटतं...

सात्विक नात्यांची ओझी देहावर वाहत वाहत...
माणूस कधीचा फिरतो निर्मनुष्य जागा शोधत...
देवाच्या सृष्टीमध्ये का अडकत जाते जगणे?
प्रारब्ध नसे ही दुनिया, ही पिढ्यापिढ्यांची दानत!

आता न लपणाऱ्या दारिद्र्याला समाधानाचं वर्ख लावून इथला माणूस पुन्हा येणारा हरेक दिवस फक्त आणि फक्त हसत नि गावदेव, गावदेवी, महापुरुष, राखणदार, रवळनाथ, पिंपळपार यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं अंगावर घेईल.

पाण्या-पावसात एकमेकाच्या दुखल्या-खुपल्याला उभा राहील,
गावसभेत तावातावाने बोलेल,
पायी पायी दऱ्या-डोंगर पालथे घालील,
मधेच टी.व्ही.वर दिसेल ती बघील वेळ जायला,
गुरांच्या मागे पठारावर जाईल,
दळणा - कांडणाला भाऊंकडे तासभर जाऊन गफ्फा मारीत बसेल,
झेपेल तेवढ्या खर्चात लग्नं - मुंजी करील,
शांत- श्राद्ध घालील
आणि मुळात म्हणजे कसलीही चिंता न करता, आहे त्याच्यात समाधान मानून, अधिकची हाव न बाळगता, कमी असलं तरी हंबरडा न फोडता, टाळ्या देत, पान-सुपारी खात, चहा गटाळत, भात गिळत सुखासुखी जगेल पुढल्यावर्षी बाप्पा येईपर्यंत.

पण रात्री ओटीवर आडवा पडला की त्याला आठवतीलच...
पुण्या- मुंबईला परतलेले...

"माजा बावा रे नि माजी बाय गो!"

18/07/2019

*" ब्रह्मानंद "* म्हणजे काय।

▪बाप होण्यापेक्षाही...
आजोबा/आजी होण्याचा
*आनंद!*

▪नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे
ओले झाल्याचा
*वत्सल आनंद* !

आणि

▪त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा
*गोड आनंद!*

▪सूनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा
व औषध घेतले का..?
या प्रेमळ चौकशीचा
*सात्त्विक आनंद!*

▪वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा....
*ऊबदार आनंद*

▪आपण कुटुंबाला हवे आहोत......
या भावनेचा
*सुप्त आनंद*

▪दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता
लागलेली डुलकी ...
*परमानंद. !*

▪रात्रीची निरव शांतता..
आराम खुर्चीवर डोळे मिटून
पहुडलेल्या क्षणी..
आपली आवडती गझल..
रेडिओने गुणगुणावी...
*स्वर्गीय आनंद!*

▪एखादा लेख किंवा कविता
आपण पोस्ट करावी..
मित्रांनी त्याला भरभरुन
दाद द्यावी...
*साहित्यानंद!*

▪मन अशांत असतांना....
देवघरातल्या भजनामुळे
निर्माण होणारा..
*कैवल्यानंद!*

▪भेटलेल्या जुन्या सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा...
*अपार आनंद*

▪नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा....
*निर्भेळ "आनंद"!*

आणि या *सर्व आनंदाची बेरीज* *करुन,* ती मनाच्या कप्प्यात साठविली की, पडल्यापडल्या लागलेली *शांत* *झोप* म्हणजेच...
*"ब्रह्मानंद" !!!*

🌹🌹🙏🌹🌹 Like and share

तुम्हा सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!जय परशुराम..!!जय...
07/05/2019

तुम्हा सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

जय परशुराम..!!
जय श्रीराम...!!

#परशुराम_जयंती

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amchimansa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category