Marathi Times News

Marathi Times News धाराशिव लातूर सोलापूर सह सर्व जिल्ह्यातील सत्य आणि ताज्या घडामोडींचा निःपक्ष आणि निर्भीड बातम्या देणारं, मराठी टाइम्स न्यूज, Reg no - MH 24-0005108

28/07/2026

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आवाहन

#धाराशिव #पीकविमा #महाराष्ट्र
#शेतकरी

26/07/2026

मराठी टाइम्स | Fast Top 10 : 26 JULY 2026

पहा मराठी टाइम्स न्यूज

21/07/2026

📢 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास! 🗳️

१९६२ पासून २०२४ पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खासदारांची संपूर्ण यादी एका पोस्टमध्ये! इतिहास जाणून घ्या आणि आपल्या मतदारसंघाच्या राजकारणाचा प्रवास पाहा.

💬 तुमच्या मते जनतेची कामे करणारा खासदार कोण? 👇 कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा.

👍 पोस्ट आवडल्यास Like करा 🔄 मित्रांसोबत Share करा 📌 अशाच राजकीय इतिहासाच्या पोस्टसाठी मराठी टाइम्सला Follow करा.

#छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #लोकसभा #खासदार

20/07/2026

दिवसभरातील प्रमुख घडामोडी हेडलाईन्स मध्ये फक्त मराठी टाइम्स न्यूज वर

#महाराष्ट्र #हेडलाईन्स #ब्रेकिंगन्यूज

20/07/2026

श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे सुरू जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन
#धाराशिव #महाराष्ट्र

INDvsENG 🏏: लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी...
20/07/2026

INDvsENG 🏏: लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली.

इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकांत 7 बाद 360 धावाच करता आल्या.

20/07/2026

दिवसभरातील प्रमुख घडामोडी हेडलाईन्स मध्ये फक्त मराठी टाइम्स न्यूज वर

18/07/2026

📢 मराठवाड्यातील लोकांची काम करणारी खासदार जोडी!

बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या मतदारसंघांतील खासदारांपैकी तुमच्या मते सर्वात चांगले काम करणारी खासदार जोडी कोणती? 🤔

🗳️ तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा!

1️⃣ बीड – बजरंग सोनवणे (बप्पा) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
2️⃣ छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे – शिवसेना (शिंदे)
3️⃣ नांदेड – वसंतराव चव्हाण – काँग्रेस
4️⃣ जालना – डॉ. कल्याण काळे – काँग्रेस
5️⃣ लातूर – डॉ. शिवाजीराव कागले – काँग्रेस
6️⃣ परभणी – संजय जाधव (बंडू) – शिवसेना (ठाकरे गट)
7️⃣ हिंगोली – नागेश आष्टीकर – शिवसेना (ठाकरे गट)
8️⃣ धाराशिव – ओमप्रकाश राजे निंबाळकर – शिवसेना (ठाकरे गट)

💬 तुमच्या मते कोण सर्वाधिक जनतेसाठी काम करत आहे? कारणासह कमेंट करा.

👍 पोस्ट आवडल्यास Like करा, Share करा आणि अधिक राजकीय अपडेट्ससाठी Follow करा.

#मराठवाडा #लोकसभा #बीड #छत्रपतीसंभाजीनगर #नांदेड #जालना #लातूर #परभणी #हिंगोली #धाराशिव #महाराष्ट्रराजकारण

माय भारत' विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधीधाराशिव- दि.१७ जुलै,  ...
17/07/2026

माय भारत' विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी

धाराशिव- दि.१७ जुलै,

देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत' (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला गुरुवारी १६ जुलै रोजी प्रारंभ झाला.

१ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना 'माय भारत' पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास,कौशल्यविकास, अनुभवानिष्ठ शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेतली.या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या अभियानादरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालये,शाळा,युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने 'माय भारत' पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी केले.

युवकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातूनही 'माय भारत' पोर्टलशी सहज जोडता येणार आहे.यासंदर्भातील सविस्तर माहिती पीपीटीच्या माध्यमातून 'मेरा युवा भारत' विभागाकडून बैठकीत सादर करण्यात आली.

'माय भारत' हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी,नेतृत्व विकास,कौशल्यवृद्धी तसेच विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्व युवक-युवती, माय भारत,राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC), शैक्षणिक संस्था तसेच युवक संघटनांनी या विशेष नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन मेरा युवा भारत,धाराशिव कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Address

महाराष्ट्र
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Times News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share