20/09/2026
झणझणीत मटण रस्सा | ढाबे जैसा स्वाद घर पर! | Authentic Mutton Rassa Recipe | Kavire Family Vlogsआज बनवूया एकदम झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट मटण रस्सा! 😋
घरच्या मसाल्यांनी बनवलेला हा मटण रस्सा भाकरी, पोळी किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागतो. ❤️
Kavire Family Vlogs वर अशाच घरगुती, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीजसोबत फॅमिली व्लॉग्स पाहायला विसरू नका.🍖 साहित्यमटण – 1 किलो
कांदा – 4 मध्यम, बारीक चिरलेला
टोमॅटो – 3 मध्यम
दही – 200 ग्रॅम
अद्रक-लसूण पेस्ट – 2 मोठे चमचे
तेल – 5 मोठे चमचे
लाल मिरची पावडर – 2 छोटे चमचे
हळद – ½ छोटा चमचा
धने पावडर – 1 चमचा
धने पावडर – 2 छोटे चमचे
जिरे पावडर – 1 छोटा चमचा
गरम मसाला – 1 छोटा चमचा
मीठ – चवीनुसार
तेजपत्ता – 2
दालचिनी – 1 तुकडा
मोठी वेलची – 2
हिरवी वेलची – 3
लवंग – 4
हिरवी मिरची – 2
ताजा धणे – सजावटीसाठी
👩🍳 थोडक्यात कृती
कढईत तेल गरम करून तेजपत्ता, दालचिनी, वेलची, लवंग आणि कांदा घालून कांदा छान सोनेरी होईपर्यंत परता.
त्यात अद्रक-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून चांगले परता.
हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर आणि इतर मसाले घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजा.
आता मटण आणि दही घालून चांगले एकत्र करा आणि काही मिनिटे मसाल्यात परता.
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून झाकण ठेवून मटण मऊ होईपर्यंत शिजवा.
शेवटी गरम मसाला आणि ताजा कोथिंबीर घाला.
गरमागरम मटण रस्सा भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा. 😋🔥
घरच्या चवीला… मनापासून! ❤️
Kavire Family Vlogs