04/11/2025
खासदार बाळ्यामामांचा,माजी खासदार कपिल पाटील यांच्या वर टीका : “कपिल पाटीलांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला”
मुरबाड │ प्रतिनिधी
मुरबाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “कपिल पाटलांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला आहे. ते दहा वर्ष सत्तेत होते, पण या कालावधीत त्यांनी मुरबाडच्या जनतेसाठी काहीच ठोस केले नाही.”
खासदार म्हात्रे पुढे म्हणाले, “मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असतो तर हा विषय कधीच मिटला असता. मुरबाडकरांना रेल्वेसेवेचा लाभ मिळावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, पण मागील कार्यकाळात केवळ आश्वासने दिली गेली, प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही.”
पत्रकार परिषदेत त्यांनी मुरबाड रेल्वे प्रकल्पाबरोबरच इतर अनेक प्रलंबित विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा, पत्रकार भवन, तसेच कल्याण-मुरबाड महामार्गाचा विलंब या विषयांवर त्यांनी प्रशासनाला आणि माजी मंत्र्यांना जबाबदार धरले.
खासदार म्हात्रे यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, मुरबाडकरांच्या विकासासाठी सर्व प्रलंबित आश्वासने पूर्ण करण्यासाठी ते संबंधित मंत्रालयांशी थेट संवाद साधत आहेत. “मुरबाडचा विकास रोखून धरला जाणार नाही. येत्या काळात या प्रकल्पांना नवचैतन्य मिळेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेमुळे मुरबाड तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलाच उत्साह आणि चर्चा रंगली आहे.
मुरबाड अपडेट :- चेतन सुधीर पोतदार
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर टच करा👇
बाळ्यामामांचा कपिल पाटीलांवर हल्लाबोल : “कपिल पाटीलांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला”मुरबा...