Amol gurav

Amol gurav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol gurav, Digital creator, osmanabad, Murum.

10/09/2024
10/09/2024
10/09/2024
10/09/2024
09/09/2024

मुख्यमंत्री योजनादूत'च्या माध्यमातून काम
जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी..

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी त्यांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत करावा.

09/09/2024

लेडीज क्लबच्या वतीने गौरी-गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन : हजारोंची बक्षीस जिंकण्यासाठी नक्की सहभागी व्हा!

लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यावर्षी दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती आगमनानंतर दि.१० सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.१०,००१ असून दुसरे पारितोषिक रु.७००१ तर तिसरे पारितोषिक रु.५००१ ठेवण्यात आले आहे. दि.११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तरी जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा. श्री.गडकर- ७९७२२३९९२०, श्री.लक्ष्मण माने-८१६९५६६५१७, श्री.अतुल अदमाने- ९४२०४७७८८७, श्री.अविराज खांडेकर -७६६६५८१४५१, श्रीमती सर्जे मॅडम- ८९९९३८५४८६ , सौ.अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, सौ.अर्चना पाटील - ९८२१३३९३९०

#गौरी #गणपती #महिला #स्पर्धा #धाराशिव

09/09/2024

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. ९० दिवसांसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार!

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे..

त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल अनुदान द्यावे या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ९० दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे..

#महायुती_सरकार #निर्णय #सोयाबीन #हमीभाव

Address

Osmanabad
Murum
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol gurav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share