Nilesh Raut

Nilesh Raut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Raut, Media/News Company, Nagpur.

महाराष्ट्रात 'सकाळ' 'नंबर वन'...वाचकांचे आभार..!
13/09/2025

महाराष्ट्रात 'सकाळ' 'नंबर वन'...
वाचकांचे आभार..!

06/09/2025

गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या!'

आयुष्याचे खरे शिल्पकार...शिक्षक🙏 ज्ञानदीपांना मनःपूर्वक वंदन...🙏शिक्षक म्हणजे केवळ धडे शिकवणारा नव्हे, तर तो विद्यार्थ्य...
05/09/2025

आयुष्याचे खरे शिल्पकार...शिक्षक

🙏 ज्ञानदीपांना मनःपूर्वक वंदन...🙏

शिक्षक म्हणजे केवळ धडे शिकवणारा नव्हे, तर तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्ञान, मूल्ये आणि संस्कार रुजवणारा खरा शिल्पकार असतो. आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात सर्वांत मोठा वाटा जर कोणी घडवतो, तर ते म्हणजे शिक्षक. शिक्षक आपल्या आयुष्यात दिव्यासारखे असतात…स्वतः जळत राहूनही आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यास उजळून टाकतात. विद्यार्थी चुकला तरी त्याला परत योग्य वाटेवर आणण्यासाठी जे संयम, प्रेम आणि कठोरता लागते ते फक्त शिक्षकांच्या हृदयात असते.

शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर आपल्या जीवनाला अर्थ देतात. लहानपणी आपण अक्षर ओळखतो, तेव्हा शिक्षक आपला हात धरून 'अ' शिकवतात…मोठं होताना आपण आयुष्याला सामोरं जातो, तेव्हा शिक्षक आपला हात धरून माणूसपण शिकवतात. म्हणूनच शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील कृतज्ञतेचा आणि आदराचा दिवस आहे.

या दिवशी मी सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करतो आणि त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही हे नम्रपणे मान्य करतो.

सर्व शिक्षकांना मनःपूर्वक कृतज्ञता व वंदन!
🎉 शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! 🎉

  नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा दीक्षांत समारंभ संपन्न नागपूर : राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ४, हिंगणा रोड येथील कवायत ...
25/08/2025

नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा दीक्षांत समारंभ संपन्न

नागपूर : राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ४, हिंगणा रोड येथील कवायत मैदानावर आज २७३ नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या शिपायांनी नऊ महिन्यांचे खडतर मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, आता ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली (भापोसे), त्यांच्यासोबत गट क्र. ४ चे समादेशक बच्चन सिंह (भापोसे) हे देखील उपस्थित होते. दीक्षांत समारंभ यशस्वीतेकरिता राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4, नागपूर तसेच प्रशिक्षक वर्ग व इतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पांडे यांनी केले. आभार सहाय्यक समादेशक दादा ईश्वरकर यांनी मानले.

लिटल स्कॉलर्स स्कूलमध्ये पालक सभा संपन्ननागपूर,ता.१९ : बेझनबाग: येथील लिटल स्कॉलर्स स्कूलमध्ये नुकतीच एक पालक सभा पार पड...
20/08/2025

लिटल स्कॉलर्स स्कूलमध्ये पालक सभा संपन्न

नागपूर,ता.१९ : बेझनबाग: येथील लिटल स्कॉलर्स स्कूलमध्ये नुकतीच एक पालक सभा पार पडली, ज्यात मुलांच्या सर्वांगीण विकासावर आणि शिक्षणासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करतांना निलेश राऊत.

'लाईफ इन बॅलन्स'तर्फे विद्यार्थ्यांना 'दीपध्याना'तून एकाग्रतेचे धडे.  शहरातील विविध शाळेमध्ये ' दीप ध्यान  ' हा नावीन्यप...
07/08/2025

'लाईफ इन बॅलन्स'तर्फे विद्यार्थ्यांना 'दीपध्याना'तून एकाग्रतेचे धडे. शहरातील विविध शाळेमध्ये ' दीप ध्यान ' हा नावीन्यपूर्ण प्रयोगशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे मार्गदर्शन करताना योग प्रशिक्षक सुधीर सुतार.

01/08/2025
फौजा सिंग: शतकाहून अधिक काळ धावणारे मॅरेथॉनपटूआजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व दिवसें...
27/07/2025

फौजा सिंग: शतकाहून अधिक काळ धावणारे मॅरेथॉनपटू

आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी, फौजा सिंग या नावाचे स्मरण आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. 'टर्बन टॉर्नेडो' म्हणून ओळखले जाणारे हे व्यक्तिमत्व केवळ एक धावपटू नव्हते, तर ते दृढनिश्चय, अदम्य इच्छाशक्ती आणि वयावर मात करण्याच्या जिद्दीचे प्रतीक होते.

फौजा सिंग यांचा जन्म १ एप्रिल १९११ रोजी पंजाबमधील ब्यास पिंड गावात झाला. त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ शेतीत गेला. धावण्याची आवड असली तरी, त्यांनी कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे पाहिले नव्हते. वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांचे आयुष्य सामान्य होते. मात्र, याच काळात त्यांनी पत्नी आणि मुलांच्या निधनाचे दुः ख अनुभवले. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी, त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी धावण्याचा गंभीरपणे सराव सुरू केला. अनेकांना हे वेडेपणाचे वाटले, पण फौजा सिंग यांनी हार मानली नाही.

२००० साली त्यांनी लंडन मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क, टोरंटो आणि मुंबईसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्यांची सर्वात अविस्मरणीय कामगिरी म्हणजे २०११ मध्ये, १०० वर्षांचे असताना टोरंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन पूर्ण करणे. असे करणारे ते जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आणि त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. त्यांच्या या पराक्रमाने ते जगभरात प्रसिद्ध झाले आणि लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले.
फौजा सिंग यांनी हे सिद्ध केले की, शारीरिक मर्यादांपेक्षा मानसिक शक्ती कितीतरी पटीने अधिक महत्त्वाची असते. "वय ही केवळ एक संख्या आहे" हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

२०२५ मध्ये वयाच्या ११४ व्या वर्षी एका रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले, ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होती. पण त्यांच्या धावण्याने आणि त्यांच्या जिद्दीने त्यांनी जो वारसा मागे ठेवला आहे, तो आजही आपल्याला प्रेरणा देत राहील.

फौजा सिंग यांच्या जीवनातून आपण हे शिकतो की, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वय किंवा परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही. गरज असते ती फक्त दृढ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाची. त्यांच्यासारख्या व्यक्ती आपल्याला सतत आठवण करून देतात की, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर नवीन सुरुवात करण्याची आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी असते.

तुम्ही कधी धावण्याचा विचार केला आहे का? किंवा फौजा सिंग यांच्यासारख्या कोणत्या व्यक्तिमत्त्वाने तुम्हाला प्रेरणा दिली आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा!

: Marathoner who ran for over a century

https://youtube.com/shorts/CvWxdQWcVOI?si=_wZFYFkqs9GR6KC_👆👆 इंदोरा चौक : गटारीच्या पाण्याचा रस्त्यावर निचरा..! हे योग्य...
18/07/2025

https://youtube.com/shorts/CvWxdQWcVOI?si=_wZFYFkqs9GR6KC_
👆👆 इंदोरा चौक : गटारीच्या पाण्याचा रस्त्यावर निचरा..! हे योग्य आहे का..? नागपूरकर आपले मत नोंदवा..

🎉 सकाळ & गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने...📢 एक अनोखा उपक्रम!✨ सकाळ वेद - भविष्याचा आणि सत्कार गुणवं...
14/07/2025

🎉 सकाळ & गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने...
📢 एक अनोखा उपक्रम!

✨ सकाळ वेद - भविष्याचा आणि सत्कार गुणवंताचा! ✨
📍 स्थळ: कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर
वेळ- सकाळी 11 वाजता
📅 दिनांक: 02 ऑगस्ट 2025

👩‍🎓 दहावी - बारावी - पदवीधर - पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष सन्मान सोहळा!

🎁 कार्यक्रमात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी –
💧 वॉटर बॉटल गिफ्ट!
🎊 आणि एक भाग्यवान विजेता जिंकणार ब्रँड न्यू लॅपटॉप! 💻

📝 नोंदणीसाठी आवश्यक:
✅ गुणपत्रिकेची सत्यप्रत (Eligibility ची खात्री होण्यासाठी)

👫 चला, एकत्र येऊन आपल्या गुणवंत मित्रमंडळींचा सन्मान करूया!
🌟 हा क्षण बनवा अविस्मरणीय!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📲 8275045320

नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर जा अथवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा
https://forms.gle/jeAFMfaPRAdNg9V58

👇👇👇
🌐 आजच नोंदणी करा आणि मिळवा सन्मान, बक्षीस व आठवणी!

Address

Nagpur

Telephone

+919075018366

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nilesh Raut:

Share