05/06/2023
LGBTIQ+ समुदायाच्या 'अभिमान महिन्या'निमित्त पुण्यातील 'युतक' या संस्थेच्या वतीने, काल पुण्यात LGBTIQ+ समुदायाची अभिमान पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, पुणे हेही या पदयात्रेत सहभागी झाले होते. आपला समाज LGBTIQ+ समुदायाला समजून घेत आपलेसे करेल अशी भावनाही श्रीकांत देशपांडे यांनी या वेळी व्यक्त केली.
लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि आदर ही यंदाच्या अभिमान पदयात्रेची संकल्पना होती. त्या निमित्ताने पारलिंगी व्यक्तींची मतदार नोंदणी, आणि त्यांच्या लोकशाहीतील समावेशनाविषयी समाजात जाणीव-जागृती करण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पहिल्यांदाच या अभिमान पदयात्रेत सहभाग घेतला होता.
✅Like
🔄Share
💬Comments