23/10/2025
Nagpur
नागपूरमध्ये 50 कचरा पॉईंट्सचे सौंदर्याकरण होणारः स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय, 15 नोव्हेंबरपर्यंत मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष्य
नागपूर : नागपूर सर्वात जास्त कचरा जमा होणाऱ्या शहरातील 50 ठिकाणांचे नागपूर महा नगरपालिकेतर्फे सौंदर्याकरण करत येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत ही कचरा ठिकाणे कायमची बंद करण्याचे लक्ष्य आहे. या ठिकाणी कचरा जमा होणे बंद झाल्यानंतर शहराच्या सौंदर्गीकरणात भर पडण्यास मदत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरातील 10 झोन मधील सर्वात जास्त कचरा जमा होणारी 50 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक झोन मधील पाच सर्वाधिक कचरा जमा होणारे पॉईंट निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणांना कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक कचरा कां जमा होत आहे, याची मूळ कारणे शोधून या ठिकाणी पुन्हा कचरा जमा होणार नाही, याची दक्षता स्वच्छता निरीक्षकांना घ्यावयाची आहे. यानंतर या ठिकाणांचे सौंदर्गीकरणाची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकाला देण्यात आली आहे. हे अभियान महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यशस्वीपणे राबवण्यासाठी आयईसी व एनडीएस पथकाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरातील हे 50 सर्वाधिक कचरा जमा होणारे ठिकाणे कायमची बंद करून या ठिकाणांचे सौंदर्याकरणाचे अभियान येत्या 15 नोव्हेंबर-पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती वसुमना पंत यांनी दिले आहेत.
#या ठिकाणांच्या सौंदर्याकरणानंतर या ठिकाणांवर पुन्हा कचरा जमा होणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर राहणार आहे तसेच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयईसीच्या पथकाने संबंधित भागात जाऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करणे व या ठिकाणी कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.