
10/07/2025
वर्षावास म्हणजे आत्मपरीक्षण, साधना आणि धम्म चळवळ अधिक गतिमान करण्याची संधी.
ही परंपरा केवळ भिक्षूंनाच नव्हे, तर प्रत्येकाने अंतर्मुख होण्यासाठी आणि धम्ममार्गावर चालण्यासाठी केलेला निश्चय आहे.
या वर्षावासात आपण प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचा अभ्यास करून, समाजात करुणा, मैत्री, प्रेम आणि समतेचे बीज पेरूया.
भिक्षू संघाच्या उपस्थितीत धम्मशिक्षण घेण्याची ही संधी आहे. चला, यावर्षी वर्षावासात धम्म जाणून घेऊया आणि बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आचरणात आणूया.
सर्वांना वर्षावास प्रारंभाच्या मंगलमय शुभेच्छा!