GPL marathi news

GPL marathi news I am indian journalist ..ganesh p. lanjekar ...my email:- [email protected]

29/07/2022

ये है BJP का विनाश मॉडल...

इस मॉडल से देश को भगवान ही बचाए ।

*वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर* वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .           दोन दिवसापूर्वी महावितरणा ने...
14/07/2022

*वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर*

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .

दोन दिवसापूर्वी महावितरणा ने व इतर खाजगी वीज कंपनी ने जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी चंद्रपुर ने जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे नेतृत्वात स्थानिक गांधी चौक येथे काल आंदोलन केले.

या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. १०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १ रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे. त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन नुसार बल्लारपुर, घुग्गुस, चिमूर, नागभीड़, ब्रह्मपुरी आदि तालुक्यात सुद्धा विज दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यात आप च्या पदाधिकारी यांनी आणि जनतेनी आपल्या दुःखवटा व्यक्त केल्या.

'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज ३०% स्वस्त देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने , आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे , *दरवाढ मागे घ्या, शिवाय आता ही ३० टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे दाखवून द्या ' असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.*

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच पंजाब मध्ये नव्याने आलेल्या आपच्या भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आजच्या निवेदनातून ' राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. वीज कंपन्यांचे कॅग / CAG ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अश्या मागण्या आज आम आदमी पार्टीने केल्या आहेत . जनतेच्या मनातही वीज बिल बाबत मह्वाविकास आघाडीवर रोष होता आता नव्या सरकारला या मुद्द्यावरून आम आदमी घेरणार असे दिसते आहे .

या आंदोलनात भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष मयुर राईकवार यूवा जिल्हाध्यक्ष, ॲड.सुनिताताई पाटील महिला अध्यक्षा, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, राजु कुडे शहर सचिव, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, शंकर धुमाले, सुनिल सदभैया, अनूप तेलतुंबड़े, मधुकर साखरकर, अजय आंबेकर, जास्मिन शेख उपाध्यक्ष, आरतीताई आगलावे सचिव, सुजाता बोदले संगठन मंत्री ,अशरफ सैयद, चंदू मादडूरवार, सुनिल भोयर, योगेश आपटे, डॉ. देवेंद्र अहेर, ऍड. किशोर पुसलवार, मनोहर पाटिल, पवन वाघमारे, देवेंद्र प्रधान, अमजद खान, सुमित शुक्ला, अनिल ठाकुर ,चंद्रकांत वासनिक, पूजा कावरे, सावित्री, येमलवाड,पुष्पा येगनरे, नंदा शर्मा,पायल गवई, सोनाली गनवीर,लथुया कलबल, राधाताई दुर्गे,अनिता गनपलवार,सुरेखा अपुनवार,अलिमिया खान,वंदना कुंदावार तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

02/07/2022
*जुनोना चौक येथे सार्वजनिक शौचालयाचे काम तत्काळ सुरू करून महिला विद्यार्थी प्रवाशांचे शौचालय अभावी होत असलेले कुचंबना था...
29/06/2022

*जुनोना चौक येथे सार्वजनिक शौचालयाचे काम तत्काळ सुरू करून महिला विद्यार्थी प्रवाशांचे शौचालय अभावी होत असलेले कुचंबना थांबवा :- आप चे राजू कुडे यांची मागणी*

चंद्रपूर - बाबुपेठ मधील आंबेडकर चौक जूनोना चौक हे दोनिही ठिकाण अतिशय रहदारीचे असून येथे बस थांब दिलेले आहे . मागील कित्तेक वर्षा पासून बाबुपेठ जनतेचे या दोन्ही चौकात सुलभ शौचालय देन्यात यावे अशी मागणी होती . परंतू प्रशासनाचा दुर्लक्ष पणामुळे ते होवू शकले नाही. पंतप्रधान मोदीजीच्या महत्वाच्या योजणे पैकी स्वच्छ भारत मिशन हे महत्वाची योजना मानली जाते. असे असून देखील सत्ताधीश भाजपने मागील 5 वर्षात कुठेही कोणत्याही चौकात सार्वजनिक शौचालये उभारले नाही.

जुनोणा चौक मधील आटो रिक्षा चालक, व्यवसायिक यांची तक्रार आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु कूडे यांचा कडे आली त्या अनुषगाने दिनांक 16/02/2022 ला मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते परंतु त्यावर पहावी तशी कार्यवाही झालेली नसल्याने आज परत मनपा आयुक्त आणि स्वच्छ्ता अधिकारी यांच्याकडे स्वच्छता गृहाकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली जर मागण्या तात्काळ मन्य झाले नाहीत तर मोठे आंदोलन छेडू असे आप चे राजु कुडे यांनी म्हंटले आहे. या वेळेला आपचे जिला अध्यक्ष सुनील देवराव मुसळे, शहर सचिव राजु भाऊ कूडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, महिला संघटन मंत्री सुजाता बोदेले, चंदु मामिडवार, सागर बोबडे, कालिदास ओरके, , जयदेव डेवगडे, भीमराज बागेसर, अंजु रामटेक, बाबाराव खडसे सुखदेव दारुंडे, सुरेंद्र जीवने, विरू भाऊ खोब्रागडे, जयंत थूल इत्यादि उपस्थीत होते.

वरोरा महावितरण चे सहाय्यक अभियंता श्रीणू बाबू चुक्का लाचेच्या सापळ्यात रंगेहात अटक वरोरा महावितरण चे सहाय्यक अभियंता श्र...
29/06/2022

वरोरा महावितरण चे सहाय्यक अभियंता श्रीणू बाबू चुक्का लाचेच्या सापळ्यात रंगेहात अटक

वरोरा महावितरण चे सहाय्यक अभियंता श्रीनु बाबू चुक्का महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या वरोरा ( शहर) बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना लाटेच्या सापळ्यात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे वरोरा शहर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून सोलर सिस्टम फिटिंग व इलेक्ट्रिशियन चे काम करतो. तक्रारदार यांनी नी ग्राहकाच्या घरी विद्युत संच (सोलर सिस्टम) किट लावण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विद्युत लावणी करता लागणारे डिमांड काढून देण्याच्या कामासाठी श्रीनु चुक्का यांनी दिनांक 24- 6- 2022 रोजी तक्रारदारकडे सहा हजार रुपयाची मागणी करून स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.त्या पडताळणी कार्यवाही वरून आज दिनांक27-6-2022 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान श्रीनु बाबू चुक्का सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या वरोरा (शहर) बोर्डा तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रारदार सहा हजार रुपये लाचेची मागणी करू न स्वतः स्वीकारल्याने महावितरण ( अर्बन) कार्यालय वरोरा येथील श्रीनु चुक्का यांच्या कक्षांमध्ये पकडण्यात आली असून पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कारवाई ही राकेश ओला, पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, तसेच पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टाफ नापोका नरेश ननावरे, पोलीस अ. रविकुमार ठेंगळे, राकेश जांबुळकर, वैभव गाडगे व चालक सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

*आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही. लोकप्रतिनिधींच्या निश्काळजीपणामुळे लोकांचे आयुष्य धोक्य...
27/06/2022

*आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश. झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही. लोकप्रतिनिधींच्या निश्काळजीपणामुळे लोकांचे आयुष्य धोक्यात.*

प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाही.

चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोलाछाप डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे अनेक जन दगावले परंतु त्याची नोंद घेतल्या गेली नाही. कोरोना काळात कोणतीही डिग्री नसतांना अनेकांनी आपले वैधकिय दुकान थाटले. याची दखल आम आदमी पार्टी तर्फे घेण्यात आली आणि तसा आवाजही उठविला गेला. प्रशासनाला याची माहिती असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले जात होते. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर पूर्ण उदासीन असून त्यांच्या या निश्काळजीपणामुळे हजारो लोकांचे आयुष्य धोक्यात होते.

आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच चिमूर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नागभीड यांना ई-मेल द्वारे झोलाछाप डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे असे कळविले होते. वातावरणातील हंगामी बदलामुळे चिमूर व नागभीड तालुक्यातील सर्वच भागामध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. बहुतांशी भाग हा ग्रामीण असल्यामुळे व जनतेमध्ये आरोग्याबद्दल पाहिजे तितकी जागरूकता नसल्यामुळे गावोगावी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट माजलेला आहे. कोणतीही वैध पदवी नसतांना अनेक बोगस डॉक्टर लोकांना औषधे, इंजेक्शन, सलाईन देतांना आढळतात. प्रशासन यावर स्वस्थ बसले असून कोणतीही कारवाही केली जात नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून यावर प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेवून प्रशाशनाने तात्काळ कारवाही चालू केली असून काही झोलाछाप डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी च्या या प्रयत्नांचे जनमानसात कौतुक होत आहे.

26/06/2022

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. या अनुषंगाने काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे.

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when GPL marathi news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GPL marathi news:

Share