12/05/2025
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १२ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)
*छत्रपती_शिवरायांची_ऐतिहासिक_आग्रा_भेट*
स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.
छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, होते.
औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला.
औरंगजेबसमोर येताना चेहर्यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती...
अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले...
खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश... सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना... या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत..
साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे ही पाहणार नाही..
#शेरास_सव्वा_शेर_छत्रपती_नडले
औरंगजेब स्वत:ला आलमगीर आणि शेर म्हणवून घेत असे.
त्याला त्याच्याच दरबारात सव्वाशेरानी मात दिली तो सुवर्ण दिन...
महाराजांच वय त्यावेळी ३६ वर्ष होतं आणि शंभूराजे त्यावेळी ९ वर्षाचे होते ...
म्हणजे १ पूर्णशेर ३६ वर्षे..
व् दूसरा शेर १/४ म्हणजेच ९ वर्षे..
अशा प्रकारे स्वत:ला हिन्दुस्तान चा शेर म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राचे सव्वा शेर नडले..
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १२ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)
किल्ले रामसेजच्या मदतीसाठी रुपाजी भोसले यांची कुमक!
किल्ले रामसेजच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी (बहुतेक किल्लेदाराचे नाव रंभाजी पवार असावे) रुपाजी भोसले नाशिकच्या आसमंतात उतरला. रुपाजी भोसलेंबरोबर मानाजी मोरेही होते. रुपाजी भोसले व मानाजी मोरेची खबर लागताच नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या गणेश गावाजवळ शहाबुद्दीन फिरोजजंग अटकाव करण्यासाठी पुढे सरसावला. मात्र हर हर महादेवाच्या घोषणा देत मराठ्यांनी शहाबुद्दीन फिरोजजंगाच्या मोगली सेनेवर इतक्या प्रखरपणे हल्ला चढवला की, मराठ्यांच्या घणाघाती हल्ल्यापुढे शहाबुद्दीन फिरोजजंगाची डाळ शिजली नाही. फिरोजजंग या जंगात पराभूत झाला. ५०० घोड्यांचा पाडाव करून मराठ्यांनी विद्युत वेगाने माघार घेतली. मराठ्यांचा हेतू साध्य झाला होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १२ मे इ.स.१७३९
दोन वर्षे चाललेली वसईची मोहीम मराठ्यांना दणकेबाज विजय मिळवून देऊन संपली. मराठ्यांनी वसईचा ताबा १२ मे १७३९ रोजी घेतला आणि वसई किल्ल्याच्या तटावरून भगवा झेंडा मोठ्या समारंभपूर्वक सुमुहूर्त पाहून तारीख २३ मे रोजी फडकाविला. पोर्तुगीज सत्ता लयास जाऊन मराठ्यांची राजसत्ता आसमंतात आल्याची जाणीव ह्या फडफडणाऱ्या झेंड्याने परिसरांतील जनमानसात रूजविली. पश्चिम किनारा व्यापार उद्योगासाठी पोर्तुगिजांच्या ताब्यात दोन शतके होता. या तहाने पोर्तुगिजांचा समुद्र काठचा अंमल नाहीसा झाला. फक्त गोवा, दीव व दमण एवढीच ठिकाणे पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिली. मराठ्यांच्या या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडकी भरली. मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हावयाची अशी शंका त्यास जाचू लागली. म्हणून त्यांनी कॅ. इंचबर्ड यास जून १७३९ त चिमाजी अप्पांच्या भेटीस पाठविले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १२ मे इ.स.१७४१
श्रीमंत वबाजीराव पेशव्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते. पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वीच बाजीराव पेशवे तारीख २८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले. तेव्हा ही अपुरी कामगिरी पार पाडण्याची कामगिरी श्रीमंत बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांस करावी लागली. पेशवे बाळाजी बाजीरावानी तारीख २१ ऑक्टोबर १७४० रोजी पुण्याहून उत्तरेस जाण्याकरिता निघून माळवा प्रांतावर चढाई केली. बादशहाने प्रयागचा सुभेदार व अयोध्येचा सुभेदार ह्यांना सवाई जयसिंगास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी हुकूम सोडिले. वरील दोन्ही सुभेदारांनी सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्यास कुचराई केली. सबब मराठ्यांचा पराभव आपल्या एकट्याच्याने होणे नाही हे सवाई जयसिंगास कळून चुकल्यामुळे त्यानी मराठ्यांशी धोलपूर मुक्कामी तह केला. पेशवे व सवाई जयसिंग ह्यांच्या भेटी तारीख १२ मे १७४१ रोजी झाल्या. त्या समयी सवाई जयसिंगानी मराठ्यांना माळवा प्रांताच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून सहा महिन्यात मिळवून द्यावी असे ठरले. ही स्वारी तारीख ११ जून १७४१ रोजी संपली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩