15/04/2018
माझा मुलींची शाळेत एडमिशन तर केलि पण पाठवायची इच्छा नाही होत आहे,कुणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही आहे, आम्ही नवरा बायको नोकरीवाले, घरी फक्त आझि आजोबा खाली खेळायला पण पाठवायची हिम्मत होत नाही, मुलगी झाली त्यावेळेस अस वाटल लक्ष्मी आली,जसा जसा बातम्या कानावर येऊ लागल्या दिसू लागल्या की मानवी व्रूत्ति इतकी बदलली आहे की पाळन्यातल्या मूली पण हरामखोर सोडत नाही आहे तर मुलगी कुणासाठी वाचवू, कुणासाठी मोठी करू,त्यांना कशी झांसी जिजाऊ ची शिकवण देवू, या नराधमांसाठी मुलगी मोठी करू का? अरे प्रत्येक व्यक्ति आपला राग फक्त social media वर व्यक्त करतो किव्वा मोर्चातून.
मोर्चावर आता माझा विश्वास नाही,कारण मराठा मोर्चात बघितल मी की कोटि कोटि लोक रसत्यावर आली सगळ झाल पण निकाल शुन्य...का?
ह्या नालायकाना सरकार -वकील का पुरवतात? ह्यांना फाशी का होत नाही? यांना का कारागृहात जेवण देतात? यांना का प्रोटेक्ट करतात? यांना लोक का हीरो बनवतात?
कारण मीच नालायक आहे😢?
मी पण दुसर्यांच्या मुलींना बघतांना त्याच नजरेने बघतो?
मी पण.. मुलगी दिसली तर माझा आतील तो अश्लील प्राणी जागा होतो का?
मी पण चार मित्र सोबत असल्यावर ..एकटी जात असलेल्या मुलीवर जर माझा मित्र comment pass करत असेल तर त्याला support करतो??
आज जर मला माझी मुलगी वाचवायची असेल तर मला दुसऱ्या मुलींना बघतांना तिला चांगल्या नजरेने बघायला हव,कुणी मुलींना त्रास देत असेल तर मला आवज न उठवता त्याच्या कानाखाली द्यावी लागेल, मुलगी ही फक्त सेक्ससाठी नाही हे आधी मला शिकायला हव, कारण मी फक्त माझा आईला आई मानतो,माझा बहिनीला बहिन् मानतो, माझे नातेवाईक आहे म्हणून माझी नजर वाइट नाही जात👯.
आणि दूसरी कोणतिहि मुलगी असली तर ती मला माल,item.... वाटते.
त्यामुळ मलाच आज हा संकल्प करावा लागेल की मुलगी कोणतीही असो तीला आदर मीच देइल, तिला बघतांना माझा नजरेत खुप पावित्र ठेविल, मी केव्हा पर्यन्त दुसरयाला दोष देवू,सरकारवर ओरडू,कायद्याला दोष देऊ. काही चुकल असेल तर माफ कराल पण इतक लिहतांना डोळ्यात पाणी आल आणि मन भरुन आल.👯
आकाश पवार