16/02/2026
#कळमेश्वर तहसील मधील शिरजोरी बाबा देवस्थानाला प्रचंड गर्दी
हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमले शिरजोरी बाबा देवस्थान अनेक वर्षापासून लोकांची मनोकामना पुरे करणारे शिरजोरी बाबा देवस्थान दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही प्रचंड गर्दीमध्ये यात्रा भरण्यात आली आणि या यात्रा मध्ये हजारोंनी गर्दी भक्तांच्या दर्शनामुळे दिसू लागली. #कळमेश्वर तालुक्यातील लिंगा नजीकच्या जंगलातील टेकडीवर स्थित जेजुरी बाबा देवस्थान येथे रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमला होता .निसर्गरम्य परिसर व दोन किमीच्या पायी प्रवासाची ओढ भाविकांना शिरजोरी बाबा च्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पर्वावर दरवर्षी यात्रा लागलेली असते. या यात्रेत महिला, आबालवृद्ध, तरुण मोठ्या प्रमाणात वन परिसराचा आनंद लुटत शिरजोरी बाबांच्या यात्रेला जातात. हे देवस्थान जंगलात असल्याने येथे वन्यप्राण्यापासून भाविकांना धोका होऊ नये व भाविकांच्या आगमनाने वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये, याकरिता मागील काही वर्षापासून जंगल परिसराच्या बाहेर दुकाने वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणापासून शिरजोरी बाबा देवस्थान परिसरापर्यंत भाविकांना पायी जावे लागते, यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना पचमढी नागद्वार यात्रा चा आनंद अनुभवता येतो. त्याचप्रमाणे भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच अल्पो आहारासाठी विविध सामाजिक संघटना प्रयत्न करत राहतात. यात्रेदरम्यान अनुचित घटना तसेच जंगल परिसरामध्ये आग लागू नये याकरिता वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक वाटकर ,के एम जामगडे, डोके, सारवे, प्रियंका पाटील , #मीनाक्षीबोधले, अनिता कातकडे, वन मजूर विष्णू बनसोड सुरेश नागपुरे ,आदींनी याला सहकार्य केले .यावेळी ठाणेदार मनोज काळपांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चौक बंदोबस्त होता.
प्रतिनिधी - #अमोलपुरी सहकॅमरामन #आयुषसाठवणे .