Mahati Live

Mahati Live "जिथे सत्याला मिळते आवाज"

‘माधुरी’ हत्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या विषयाचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उच्चस...
12/09/2025

‘माधुरी’ हत्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या विषयाचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उच्चस्तरीय समितीकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच, वनतारा आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नांदणी येथे हत्तीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापूरचा राजेशाही दसरा आता महाराष्ट्राचा अधिकृत "महत्त्वाचा उत्सव"!महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कोल्...
12/09/2025

कोल्हापूरचा राजेशाही दसरा आता महाराष्ट्राचा अधिकृत "महत्त्वाचा उत्सव"!
महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजेशाही दसऱ्याला राज्यातील "महत्त्वाचा उत्सव" म्हणून मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाला आहे.

दरवर्षी हा भव्य उत्सव राजेशाही मिरवणुका, पारंपरिक तलवार विधी, विंटेज गाड्यांची रॅली, देवींच्या पालख्यांचे सोहळे आणि दसरा चौकात होणाऱ्या नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघतो.

कोल्हापूरच्या राजघराण्याच्या नेतृत्वाखालील रंगीत मिरवणुका, बँड पथके, सजवलेले हत्ती-घोडे, मराठा योद्ध्यांच्या शौर्याची पुनर्रचना, कुस्तीचे सामने आणि लोकसंगीत यांच्या संगतीने हा उत्सव कोल्हापूरच्या जिवंत इतिहासाला नव्याने उभारी देतो.

मनोज जरांगे यांच्याकडे अजेंडा नाही. ते प्रस्थापित मराठ्यांसाठीच काम करत आहेत, गरिबांसाठी नाही.- बाळासाहेब आंबेडकर
12/09/2025

मनोज जरांगे यांच्याकडे अजेंडा नाही. ते प्रस्थापित मराठ्यांसाठीच काम करत आहेत, गरिबांसाठी नाही.
- बाळासाहेब आंबेडकर



Nepal Protest!Why?
11/09/2025

Nepal Protest!
Why?

मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
11/09/2025

मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल

04/09/2025

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे!

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे.

“भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.”

जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे.

“ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.”

वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे.

देशातील कर प्रणालीत मोठा बदल करत जीएसटी परिषदेने नवीन दर जाहीर केले आहेत. आता देशात फक्त दोनच स्लॅब असतील – ५% आणि १८%. ...
04/09/2025

देशातील कर प्रणालीत मोठा बदल करत जीएसटी परिषदेने नवीन दर जाहीर केले आहेत. आता देशात फक्त दोनच स्लॅब असतील – ५% आणि १८%. यामुळे १२% व २८% चे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. तसेच लक्झरी व तंबाखू उत्पादनांवर विशेषतः ४०% जीएसटी आकारला जाणार आहे.

नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असून यामुळे ग्राहक व उद्योग क्षेत्र या दोन्हींवर परिणाम होणार आहे. कर रचना सोपी करणे, पारदर्शकता वाढवणे आणि महसूल वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

१३.५ वर्षांचा ठाण्याचा ईशान आणेकर वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स २०२५ मध्ये चमकला! 🌍🏊‍♂️गारगोटीचे मूळ असलेल्या ईशानने २ सुवर...
04/09/2025

१३.५ वर्षांचा ठाण्याचा ईशान आणेकर वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स २०२५ मध्ये चमकला! 🌍🏊‍♂️
गारगोटीचे मूळ असलेल्या ईशानने २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकत भारताचा झेंडा फडकावला. १० व्या वर्षी वडिलांनी दिलेल्या किडनी प्रत्यारोपणानंतरही त्याने हार न मानता जलतरणात जिद्द कायम ठेवली.

ड्रेसडन (जर्मनी) येथे त्याने १००मी आणि २००मी फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण, तर ५०मी बटरफ्लायमध्ये रौप्य पटकावले. विशेष म्हणजे त्याचे वडील अनंत आणेकर यांनीही या स्पर्धेत २ रौप्य पदके मिळवली. आणेकर कुटुंबाने मिळवलीत तब्बल ५ पदके!

ईशानचे यश केवळ भारतासाठी गौरव नव्हे, तर अवयवदानाने नवीन जीवन आणि नवीन स्वप्नांना मिळणारा नवा उजाळाही ठरला.

वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेमान्य स्पर्धा असून दर दोन वर्षांनी अवयवदान आणि प्रत्यारोपण झालेल्या खेळाडूंच्या जिद्दीचा उत्सव म्हणून आयोजित केली जाते. यंदा ड्रेसडन, जर्मनी येथे झालेल्या स्पर्धेत ५१ देशांतील १६०० खेळाडूंनी सहभाग घेतला. भारताच्या ४९ अवयव प्रत्यारोपण झालेले व ८ अवयवदान करणारे खेळाडू उतरले होते. भारताने १६ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कांस्य अशी एकूण ६३ पदकं जिंकत दमदार कामगिरी केली. ✨🇮🇳

03/09/2025

पूज्य भंते विनाचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा व जनसंवाद.
"महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन"

आचार्य अत्रे सभागृह पिंपरी चिंचवड पुणे Live..

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी म...
03/09/2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, 'ओबीसींचं नुकसान होत असेल, तर आमची हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे.'


पीटर यांच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ? कमेंटमध्ये सांगा.
03/09/2025

पीटर यांच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ? कमेंटमध्ये सांगा.










छाती ठोकपणे सांगतो, एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही, - विनोद पाटील           official
03/09/2025

छाती ठोकपणे सांगतो, एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही,
- विनोद पाटील
official

Address

Nanded Airport Area
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahati Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahati Live:

Share