
15/06/2025
नायगाव तालुक्यात हळदीच्या पिकाची लागवड सर्वत्र जोमाने !
नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.
निसर्ग शेतकऱ्यांना हुलकावण्या देत असताना शेतकऱ्याने शेतातील पेरणीसाठी टाकलेले पैसे सुद्धा पिकाच्या स्वरूपात परत मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सदैव चुकीचे अमिषा दाखवून भुलथापा दिल्याने व शेतीच्या मालाला भाव न दिल्यामुळे उदासीन झालेला शेतकरी आता सोयाबीन कपाशी पेक्षा पिवळ्या सोन्याला भाव समजले जाणाऱ्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे आवश्यक नायगाव तालुक्यात पाहावयास मिळत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे थापा देत शेतकऱ्यांना केवळ झुलवण्याचे काम करीत असताना शेतकऱ्याच्या कपाशी सोयाबीन तूर चना आदी मालाला भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी शेतकरी पिवळे सोने समजले जाणाऱ्या हळदी या पिकाची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दृश्य पहावयास मिळत असून लागवडीसाठी आलेल्या मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्यामुळे रोजगारात समाधान व्यक्त होत आहे
https://massmaharashtra.com/turmeric-sowing-in-naigaon/
*मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क*.
*नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी*