Namaste Nanded

Namaste Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Namaste Nanded, Media/News Company, Nanded.
(2)

02/06/2026

अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने आमराबाद तांडा परिसराला मोठा तडाखा दिला. वादळामुळे परिसरातील केळीच्या बागा मुळासकट उखडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहीजणांना पत्रे लागली तर काहींच्या अंगावर पत्रावर ठेवलेली दगड अंगावर पडून दुखापत झाली. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, काही घरावरील पत्रे ३०० ते ४०० फूट दूर उडून गेली.

02/06/2026

महाराष्ट्र राज्यातील लालपरीच्या सेवेला नुकतीच 78 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने हदगांव बसस्थानकात एसटीचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.

01/06/2026

Admission are open for Play Group , Nursery , LKG-UKG & 1st to 10 th. Call - 7378757651 & 7758099961

मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वेस्टेशन इथल्या भोकरे कुटुंबाने देशसेवेचा आदर्श निर्माण केलाय. रोहिदास भोकरे यांच्या कुटुंब...
01/06/2026

मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वेस्टेशन इथल्या भोकरे कुटुंबाने देशसेवेचा आदर्श निर्माण केलाय. रोहिदास भोकरे यांच्या कुटुंबातील अमोल भोकरे,कैलास भोकरे,सुर्या भोकरे आणि अभिमान भोकरे हे चारही भाऊ भारतीय सैन्यात सेवा बजावत देशरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. तसेच वैशाली भोकरे आणि सहदेव भोकरे हे दोघे पोलीस दलात कार्यरत असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. एकाच घरातील सहा सदस्य विविध सुरक्षा दलांमध्ये कार्यरत असणे ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली जात असून भोकरे कुटुंब आज युवकांसाठी प्रेरणास्थान बनलय.

01/06/2026

एका भरधाव कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदेडमध्ये रात्री थरारक अपघात झालाय, नियंत्रण सुटलेल्या या कारच्या धडकेत एकूण चार जण जखमी झाले. तर या कारच्या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियंत्रण सुटलेल्या कारचा चालक मद्याच्या अंमलाखाली होता अशी चर्चा आहे. रात्री उशिरा शहरातील पूर्णा रोडवर घडलेल्या या प्रकाराने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

31/05/2026

नांदेड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी तर अर्धापुर तालुक्यातील नांदला-दिग्रस शिवाराला गारपीटीचा तडाखा, गारपिटीमुळे केळी बागांचे झाले नुकसान

31/05/2026

कर्ज काढण्यासाठी तारण ठेवलेले तब्बल 800 ग्राम सोने बँकेतील दोन कर्मचाऱ्यांनीच गायब केले अन ही फसवणूक लक्षात येऊ नये म्हणून लॉकरमध्ये 400 ग्राम बनावट सोने आणून ठेवले, बँकेच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेडच्या डॉक्टर लेन इथल्या शाखेतील हा धक्कादायक प्रकार आहे.

अर्धापुर तालुक्यातील मालेगांवच्या अनिल सितळेच्या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक होतंय. घरच्या गरिबीमुळे अनिलच्या आईवडीलांन...
31/05/2026

अर्धापुर तालुक्यातील मालेगांवच्या अनिल सितळेच्या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक होतंय. घरच्या गरिबीमुळे अनिलच्या आईवडीलांनी मोल मजुरी करत कुटुंबाचा सांभाळ केला. आईवडिलांना साथ देण्यासाठी त्याने पाच वर्षांपूर्वी होमगार्ड म्हणून काम सुरू केले. दिवसा होमगार्डची नोकरी अन रात्री पोलीस भरतीचा सराव आणि अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थितीत त्याने जिद्द सोडली नाही, याच मेहनतीच्या बळावर नुकतीच त्याची मुंबई पोलीस दलात निवड झालीय. त्याच्या या प्रेरणादायी यशाचे सर्वत्र कौतुक होतंय.

30/05/2026

30/05/2026

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा कोण होणार विजेता ?

Address

Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namaste Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share