Dhammpala

Dhammpala " नशिबावर विश्वास ठेवू नका, आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा"
"Do not believe in fate. Believe in your strength"

- Dr. Babasaheb Ambedkar

29/04/2026

बाबासाहेबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या समाजाकडून "भीमा" "भीमराव माझा" या एकेरी उल्लेखावर कुठलाही आक्षेप आजवर ऐकण्यात आला नाही.
जय भिम 🙏🏻💙

भाजपसोबत जाताच राघव चढ्ढा यांनी १६४ जुन्या पोस्ट केल्या दिलीट.....
26/04/2026

भाजपसोबत जाताच राघव चढ्ढा यांनी १६४ जुन्या पोस्ट केल्या दिलीट.....

कुठला गांजा मारून पोस्ट करतात हे 😂
24/04/2026

कुठला गांजा मारून पोस्ट करतात हे 😂

शेवटी एकदा आम्हाला आठवले,आम्हीच बंद करून ठेवली होतीआमच्या विकासाची कवाडे,आम्हाला नव्हतास्वतःचा असा कधी प्रकाश,आम्ही फक्त...
22/04/2026

शेवटी एकदा आम्हाला आठवले,
आम्हीच
बंद करून ठेवली होती
आमच्या विकासाची कवाडे,
आम्हाला नव्हता
स्वतःचा असा कधी प्रकाश,
आम्ही फक्त होतो
राजदरबारातले गवई,
खऱ्या अर्थाने
रिपब्लिकन
कधीच नव्हतो आम्ही !

#राजदारी

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निमित्ताने....मातंग समाजातील अनेकांना आज महार समाजासोबत सलगी नको आहे,त्यांना आंबेडकर चळवळ नको आहे...
21/04/2026

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निमित्ताने....
मातंग समाजातील अनेकांना आज महार समाजासोबत सलगी नको आहे,त्यांना आंबेडकर चळवळ नको आहे,त्यांना बौद्ध धम्म नको आहे,मातंग समाजातील जे तरुण आज आंबेडकरवादी मातंग म्हणून कार्य करत आहेत ते त्यांना नको आहे परंतु त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्व अधिकार हवे आहेत अशा लोकांना माझे सांगणे आहे की तुम्हाला वाटेल त्या चळवळी काढा, वाटेल राजकीय ते नेतृत्व माना,तो तुमचा अधिकार आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श माना म्हणजे त्यांच्या जातीतील आजच्या राजकीय नेत्यांनाच नेता माना, असं माझं बिलकूल म्हणणं नाही.
तुम्हाला महार समाजाशी दुश्मनी ठेवायची असेल तर ती ठेवा, तुमच्या वाटेल त्या राजकीय भूमिका घ्या,त्यावर कुणाचं बंधन नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारांची जाण ठेवलीच पाहिजे. त्या माणसाने स्वतःचं आयुष्य झिजवलं, रक्ताचं पाणी केलं, संघर्ष केला, तेव्हा आज आपण इथे उभे आहोत हे विसरून चालणार नाही.
मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे हे नक्कीच जातीचे मोठे आदर्श आहेत, त्यांनी इतर क्षेत्रात खूप मोठं काम केलंय त्यांना मानायलाच हवं.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांचे सामाजिक काम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचा उद्धार केलेले काम यात जमीन आसमानचा फरक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आपल्याला बुद्ध,शाहू,फुले,अण्णाभाऊ,लहुजी ही नावे ऐकायला देखील भेटली नसती.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांचे मुक्तिदाता आहेत हे सत्य आहे, आणि ते आजिबात बदलणार नाही हे लक्षात ठेवा.
काल एक पोस्टर पाहिलं, ज्यात बाबासाहेबांबद्दल अतिशय घाणेरडी भाषा वापरली होती. कदाचित मातंग बांधवांनी ते केलं नसेल, पण अनेकांनी ते शेअर केलं ही गोष्ट खूप चिड आणणारी आहे. आपल्या मुक्तिदात्याबद्दल अशी घाणेरडी विचारसरणी ठेवणं योग्य नाही.
तुम्हाला जे काही मतभेद ठेवायचे आहेत ते ठेवा, पण एक लक्षात ठेवा बापाला बाप म्हणायला शिका… आणि दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं बंद करा.

Santosh Shinde ✍️

अ ब क ड वर्गीकरण फक्त बहाना आहे, मुळात यांना  #बाबासाहेबांना विरोध करायचा आहे, उघडपणे विरोध करू शकत नाहीत म्हणून, वर्गीक...
18/04/2026

अ ब क ड वर्गीकरण फक्त बहाना आहे, मुळात यांना #बाबासाहेबांना विरोध करायचा आहे, उघडपणे विरोध करू शकत नाहीत म्हणून, वर्गीकरणाच्या आडून बाबासाहेबांना विरोध करत आहेत. पण एक लक्षात ठेवा तुमच्यासाठी सर्वात जास्त मातंग परिषदा डॉ.बाबासाहेबांनी घेतले आहेत. त्यांचे उपकार आमच्या काय तुमच्या काय येणाऱ्या हजारों पिढ्या फेडू शकणार नाही.

#जयभीम ✊🔥

उपवर्गीकरण अजेंडा आता मोडीत जाण्याच्या मार्गावर  सर्व जातीय समाज विरोधात एकवटले सर्वात प्रथम राष्ट्रीय ढोर समाज, मग अखिल...
18/04/2026

उपवर्गीकरण अजेंडा आता मोडीत जाण्याच्या मार्गावर

सर्व जातीय समाज विरोधात एकवटले

सर्वात प्रथम राष्ट्रीय ढोर समाज, मग अखिल भारतीय चर्मकार महासंघ ,नंतर अखिल भारतीय होलार समाज संघटना यांनी उपवर्गीकरण विरोध केला आहे.
आता एक जात फक्त विरोधात काम करत आहे.कुणाच्या तरी अज्ञानासाठी अजेंड्यासाठी कुणी उपवर्गीकरण करण्याचा खोडसळपणा केला तर...

सर्व जातीय जनता अशांना धडा शिकवणार. खासकरून कॉँग्रेस,राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेना मनसे आप या राजकीय पक्षातील नेत्यांनी जर उपवर्गीकरण समर्थनात भूमिका घेतली तर मागासवर्गीय समाजातील सर्व जातींनी लक्षात घ्यावे की हे लोक तुमच्या हिताच्या विरोधात काम करतात.

कॉँग्रेसच्या नाना पटोले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.त्यांचे आभार.
जे नेते समर्थन करतील त्यांना मतदान करताना हे लक्षात ठेवा.
चुकीला माफी नाही....

Milind Dhumale

आपण जर एव्हढा विरोध करूनही जर SC उपवर्गिकरण लागू झाला तर तेव्हा बौध्द समाजाने स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ येईल त्याने ते ...
16/04/2026

आपण जर एव्हढा विरोध करूनही जर SC उपवर्गिकरण लागू झाला तर तेव्हा बौध्द समाजाने स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ येईल त्याने ते वर्गीकरण कसा आहे याचा अभ्यास करावा,
बौद्ध महार समाजाची लोकसंख्या SC मध्ये सर्वात जास्त आहे आणि त्यानुसार आरक्षण मिळालं आहे का नई ते पहावं आणि नसेल तर त्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी,

फक्त हे आरक्षण नोकरीच नाही तर राजकीय आरक्षण मधे पण लागू झाले पाहिजे आणि आपल्या लोकसंखे नुसार जिसकी जितनी संख्या भरी उसकी उतणी भागीदारी म्हणत ग्रामपंचायत पासून ते खासदारकी पर्यंत फक्त बौद्ध उमेदवारच आपल्या आरक्षणातून गेले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे आणि हे सर्वात महत्वाचे आहे कारण SC राखीव जागेवर कधी बौद्ध उमेदवार उभा केला जात नाही...

आणि जेव्हा केव्हा कोणत्या इतर समाजावर SC म्हणून अत्याचार होईल तेव्हा बौद्ध समाजाने तो आपला विषय नाही असा समजून त्या कडे दुर्लक्ष करावे जेणेकरून बौद्ध समाजाचे महत्व काय आहे इतरांना समजेल.

ही स्वार्थी भूमिका जरी असली तरी ही घ्यावी लागेल कारण आपण SC एकत्र करू पाहत आहोत आणि बाकीचे SC मध्ये फूट पाडत आहे, म्हणून आपणही आपला विचार आता करायला हवा, कारण फक्त बौद्ध समाजाने ठेका नाही घेतला SC मधील सर्वांना एकत्र धरून ठेवण्याचा...

इच्छा तर हीच आहे उपवर्गीकरण नाही झाला पाहिजे पण झालाच तर बौद्ध समाजाला ही त्याचा विचार करायला हवा असा मला वाटत

जय भीम
नमो बुद्धाय 🙏

- Suraj more

16/04/2026

देशाच्या सीमेवर भीम जयंती साजरी करताना भारतीय जवान..🔥🪖🇮🇳

जय भीम जय संविधान..!
जय हिंद जय भारत..!

#जयभीम #बाबासाहेबजी

आंबेडकर म्हणजे सगळ्या रूढी, परंपरा आणि व्यवस्थांना उद्धवस्त करणारा अणुबॉम्ब !आंबेडकर म्हणजे क्रांती !आंबेडकर म्हणजे आग !...
15/04/2026

आंबेडकर म्हणजे सगळ्या रूढी, परंपरा आणि व्यवस्थांना उद्धवस्त करणारा अणुबॉम्ब !

आंबेडकर म्हणजे क्रांती !
आंबेडकर म्हणजे आग !
आंबेडकर म्हणजे विद्रोह !
आंबेडकर म्हणजे विचार !
आंबेडकर म्हणजे समानता !
आंबेडकर म्हणजे मानवता !
आंबेडकर म्हणजे शांती !
आंबेडकर म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगायचा अधिकार देणारा बाप माणूस !

मिर्झा... ❤️

Sanchita garde

#जयभीम #बाबासाहेबजी

ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटल,मुंबईच्या MBBS च्या विद्यार्थ्यांनी साकारलेले बाबासाहेब आणि महाडचा सत्याग्रह ❤️ #जय...
14/04/2026

ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटल,मुंबईच्या MBBS च्या विद्यार्थ्यांनी साकारलेले बाबासाहेब आणि महाडचा सत्याग्रह ❤️

#जयभीम

14/04/2026

महाराष्ट्रात कोठे ही Dj लावल्यामुळे पोलिस प्रशासन गुन्हे दाखल करत असतील तर त्या केसेस चे जामिन मोफत करण्यात येतील...

Adv Swapnil jagtap - 8369412682..

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhammpala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhammpala:

Share