21/07/2026
Nanded News | नांदेडच्या लेबर कॉलनीत EF फॉर्मसाठी नागरिकांची फरफट; BLO गैरहजर, अखेर ARO यांनी स्वतःच्या मोबाईलवरून भरले फॉर्म!
नांदेडच्या लेबर कॉलनीतील यादी भाग क्रमांक १४४ मधील नागरिक मागील अनेक दिवसांपासून SIR प्रक्रियेतील EF फॉर्म भरण्यासाठी संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, BLO उपलब्ध नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
१९ जुलै रोजी नागरिक पुन्हा BLO कॅम्पमध्ये पोहोचले असता ARO गणेश कोरे उपस्थित होते, मात्र संबंधित BLO उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ARO यांनी BLO यांच्याशी फोनवर संपर्क साधून BLO App चा ॲक्सेस घेत नागरिकांचे EF फॉर्म ऑनलाइन सबमिट केले.
या प्रकारामुळे नागरिकांच्या सोयीसाठी नियुक्त BLO प्रत्यक्षात उपलब्ध नसतील, तर EF फॉर्म भरण्यासाठी नागरिकांनी जायचे कुठे? तसेच BLO App चा ॲक्सेस इतर व्यक्तींना देण्यात आल्याचा आणि संबंधित BLO स्वतःच्या नियुक्त क्षेत्रात सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करून संबंधित BLO यांना त्यांच्या नियुक्त क्षेत्रात नियमितपणे उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
📲 SIR-2026 आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Nandigram Times ला फॉलो करा.
Election Commission of India
CMOMaharashtra
Maharashtra DGIPR
Atul Save
Collector Office Nanded
#नांदेड #लेबरकॉलनी #मतदारयादी #नांदेडबातम्या #नंदिग्रामटाईम्स
#शेखजहुरदुधडकर