Nanded News

Nanded News news and entertainment

17/06/2025

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

१९ व २० रोजी यॅलो अलर्ट जारी

नांदेड,दि १६ जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 16 जून 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 19 व 20 जून 2025 हया दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 19 व 20 जून 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

16/06/2025
16/06/2025

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची मोठी कारवाई!

शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी तयार करणाऱ्यांवर एकाच दिवशी मोठा “मास रेड”
- एकूण मुद्देमाल जप्त – ₹3,36,880/-
- 61 गुन्हे दाखल
- 61 आरोपींवर कारवाई

नांदेड पोलीस दलाचे अवैध धंद्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण!

16/06/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

एआयची दुनिया (The World of AI)आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे नाव खूप ऐकायला मिळते. साध्य...
16/06/2025

एआयची दुनिया (The World of AI)
आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे नाव खूप ऐकायला मिळते. साध्या भाषेत सांगायचे तर, एआय म्हणजे मशीनला माणसांसारखे विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवणे. ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी आपल्या आजूबाजूला वेगाने पसरत आहे आणि आपले जीवन खूप सोपे करत आहे.
एआय म्हणजे काय?
एआयमध्ये कॉम्प्युटर सिस्टीम्स तयार केल्या जातात, ज्या मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करू शकतात. यात शिकणे (learning), समस्या सोडवणे (problem-solving), निर्णय घेणे (decision-making) आणि भाषा समजून घेणे (understanding language) यांसारख्या क्षमतांचा समावेश असतो. एआय सिस्टिम डेटावरून शिकतात आणि अनुभवानुसार स्वतःला सुधारतात.
एआयचे काही महत्त्वाचे प्रकार:
* मशीन लर्निंग (Machine Learning): हा एआयचा एक उपसंच आहे जिथे सिस्टिमला स्पष्टपणे प्रोग्राम न करता डेटावरून शिकवले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही फोटोमध्ये मांजरीला ओळखायला शिकवता, ते मशीन लर्निंग वापरून होते.
* डीप लर्निंग (Deep Learning): हा मशीन लर्निंगचाच एक प्रकार आहे जो मानवी मेंदूच्या न्यूरल नेटवर्कसारख्या संरचनेचा वापर करतो. चेहऱ्याची ओळख (facial recognition) आणि आवाज ओळखणे (voice recognition) यामध्ये डीप लर्निंगचा वापर होतो.
* नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (Natural Language Processing - NLP): एआयला मानवी भाषा समजून घ्यायला आणि तिच्याशी संवाद साधायला मदत करते. गूगल ट्रान्सलेट (Google Translate) किंवा व्हॉइस असिस्टंट (voice assistants) याची उत्तम उदाहरणे आहेत.
* कॉम्प्युटर व्हिजन (Computer Vision): एआयला चित्रांमधून किंवा व्हिडिओंमधून माहिती समजून घ्यायला आणि विश्लेषण करायला शिकवते. सेल्फ-ड्रायव्हिंग कार (self-driving cars) आणि वैद्यकीय इमेजिंगमध्ये (medical imaging) याचा उपयोग होतो.
एआयचा उपयोग कुठे होतो?
एआयचा वापर आज अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे:
* आरोग्य सेवा (Healthcare): रोगांचे निदान करणे, औषधे शोधणे आणि रुग्णांची वैयक्तिक काळजी घेणे.
* वाहतूक (Transportation): सेल्फ-ड्रायव्हिंग गाड्या, ट्रॅफिक व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स.
* शिक्षण (Education): विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे आणि अभ्यासक्रमाला वैयक्तिकृत करणे.
* मनोरंजन (Entertainment): नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आवडतील अशा शिफारसी देणे.
* व्यवसाय (Business): ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी चॅटबॉट्स, फसवणूक ओळखणे आणि डेटा विश्लेषण.
* कृषी (Agriculture): पिकांची काळजी घेणे, पाण्याची बचत करणे आणि उत्पादकता वाढवणे.
एआयचे फायदे आणि आव्हाने:
फायदे:
* कामाची कार्यक्षमता वाढवते.
* वेळेची बचत होते.
* मानवी चुका कमी होतात.
* गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करते.
आव्हाने:
* नोकरीची उपलब्धता कमी होऊ शकते.
* नैतिक आणि गोपनीयतेचे प्रश्न निर्माण होतात.
* एआयला बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा आणि संसाधने लागतात.
* एआय प्रणालींमध्ये पूर्वग्रह (bias) निर्माण होऊ शकतो.
भविष्यात एआय:
एआयचे भविष्य खूप रोमांचक आहे. संशोधक सतत नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. भविष्यात एआय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे, ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती येईल.
एआयची दुनिया खूप मोठी आहे आणि ती दररोज नवीन गोष्टी शिकत आहे.

Good News! Mumbai-Jalna Vande Bharat Extended To Nanded, Brings Major Relief The Railway Ministry has approved the exten...
16/06/2025

Good News! Mumbai-Jalna Vande Bharat Extended To Nanded, Brings Major Relief
The Railway Ministry has approved the extension of the Mumbai-Jalna Vande Bharat Express up to Nanded. This move has brought immense joy citizen, as it will now be easier for them to travel to Hazur Sahib more conveniently and comfortably.

Train Routes And Timings

According to The Free Press Journal, a statement issued by the community on Sunday confirmed the train timings. Train No. 20705 (Nanded to Mumbai) will depart at 5 am and reach Mumbai by 2:25 pm. It will stop at Parbhani, Jalna, and Chhatrapati Sambhajinagar. On the return route, Train No. 20706 (Mumbai to Nanded) will leave at 1:10 pm and reach Nanded by 10:50 pm, with halts at Chhatrapati Sambhajinagar, Jalna, and Parbhani.

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share