Nandedkar MH26

Nandedkar MH26 आपल्या नांदेड चे व्हिडीओ पाहण्यासाठी फॉलो करा
बातमी आणि जाहिराती साठी मो 8888201516

30/07/2025
नांदेड (प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पव...
24/01/2025

नांदेड (प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पवयीन बालकांना विमानतळ पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत 48 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. शिक्षण घेण्यासाठी आलेली बालके गुन्हेगारीकडे कशी वळत आहेत, त्याची कारणे काय आहेत, त्यावर उपाय काय आहेत. यावर सामाजिक स्तरावर चर्चा घडून तोडगा निघायला हवा तरच हा सर्व प्रकार थांबेल.

दि.22 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आनंदनगर राज मॉलमध्ये एका 17 वर्षीय बालकाला तिक्ष्ण हत्यारांनी गोंदुन त्याचा खून झाला. राज मॉलमध्ये रक्तच रक्त सांडले होते. जखमी अवस्थेतील बालक साईनाथ प्रकाश कोळेकर (17) रा. आखाडा बाळापूर जि. हिंगोली यास दवाखान्यात नेले असता. तो दवाखान्यात पोहचण्यापुर्वीच मरण पावलेला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेवून आणि आपल्या कौशल्याचा वापर करून विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, स पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, पोलीस उपनिरि विनोद साने, महिला पोलीस उपनिरिक्षक बोबडे यांच्यासह पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, रितेश कुलथे, डोईफोडे, शेख जावेद, नागनाथ स्वामी, राजेश माने, शेख

29/12/2024

तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला

राष्ट्रीय दुःखवटयामुळे माळेगाव यात्रेतील डॉ.शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन पुढे

नांदेड दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यामुळे २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनीच्या नियोजित 29 डिसेंबरच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला असून आता हे प्रदर्शन 2 जानेवारीपासून सुरू होणार आहे.शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

26 डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शन तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतातील प्रसिद्ध यात्रा माळेगाव येथे सटवाई मंदिराजवळ हे प्रदर्शन दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार आहे. माळेगाव यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा व प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कार प्राप्त शेतकरी, स्टॉल धारक तसेच शेतातील फळे भाजीपाला व पिके स्पर्धेसाठी आणणाऱ्या स्पर्धकांनी हा बदल तातडीने लक्षात घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

पिके स्पर्धा 2 जानेवारीला

या प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाची फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा 2 जानेवारीला होईल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा.स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे नमुने 2 जानेवारी गुरुवारी सकाळी बारा वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनात कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सत्कार कार्यक्रम सकाळी 11 वाजता

या कृषी प्रदर्शनात प्रस्तावित करण्यात आलेला कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील दोन जानेवारीला च होणार आहे.कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार ठीक सकाळी अकरा वाजता होईल, सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळी स्टॉल उभारावे

तसेच प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व स्टाल धारकांनी आपले बियाणे, खते, औषधी, ट्रॅक्टर, शेती उपयोगी अवजारे व इतर सर्व स्टॉल दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी कृषी प्रदर्शनात उभे करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे. त्यासाठी लवकर कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कृषी प्रदर्शन २ ते ४ जानेवारी

फळे भाजीपाला व मसाले पिके स्पर्धा तसेच कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार हा दोन जानेवारी रोजी होत आहे तथापि हे कृषी प्रदर्शन दोन ते चार जानेवारी असे तीन दिवस सुरू असणार आहे तेव्हा नांदेड महानगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला भेटी द्याव्यात असे आवाहनही कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे.
000000
#माळेगावयात्रा

*राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील     शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून* नांदेड दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान...
28/12/2024

*राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून*

नांदेड दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे.
माजी प्रधानमंत्री यांचा दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते.

*पालखी २९ डिसेंबरलाच*
तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

*अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून*

मात्र 29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून होणार आहे. ( १ जानेवारी नंतर ) 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे.

*२ जानेवारीपासूनचे कार्यक्रम*

जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत...

2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल.

महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.

*लावणी कार्यक्रम २ जानेवारीलाच*

तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.

3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.

४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.

5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दिवंगत माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी असा एकूण सात दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुखवट्याच्या कालावधीत संपूर्ण भारतात सदर दिवशी कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत,असे आदेश शासनाने दिले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात आदेश निर्गमित केले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभागीत्व ठेवावे, असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

15/12/2024
14/12/2024

पानी लेट आयेगा आज
टक्कर का पानी wad 16

जलशुद्धीकरन केंद्र येथे तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 14/12/2024. रोजीचा किल्ला व वजिराबाद जलकुंभातून होणारा संयुक्त टक्करचा पाणीa पुरवठा उशिराने होईल ,प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याची वेळ नंतर कळविण्यात येईल. करिता माहितीस्तव व सहकार्यस्तव

12/12/2024

लोहा , कंधार विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 155 कोटी मंजूर : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड :- सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे केले आहे.
सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यासह कंधार आणि लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदार झाला होता . अशा परिस्थितीत आसमानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती . यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या पाठपुराव्याला यश आले असून आता कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 386 लाख रुपये मंजूर झाले आहेत. दिनांक 01.01.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यत मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

पत्नीला परत का पाठवतनाहीस, असे म्हणून जावयाने सासुरवाडीत येऊन घरासमोर बसलेल्या सासूचा खंजीरने गळा कापून निघृण खून केला. ...
12/12/2024

पत्नीला परत का पाठवत

नाहीस, असे म्हणून जावयाने सासुरवाडीत येऊन घरासमोर बसलेल्या सासूचा खंजीरने गळा कापून निघृण खून केला. ही घटना नरसी येथील बजरंगनगरात ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. खून करणाऱ्या जावयासह अन्य एकास रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नरसी येथील बजरंगनगरातील वडार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्ज्वला हिचे नांदेड येथील तरोडा खु., येथे राहणारा अशोक किशन धोत्रे यांच्यासोबत लग्न झाले. मागील एक वर्षापासून पत्ती अशोक हा सतत मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने उज्ज्वलाची आई
..तर त्यांनाही संपवेल

■ आशोकने सासूचा गळा चिरून खून केल्यानंतर आरडाओरडा करत 'कोण जवळ येते, कोण साथ देते, त्यांनाही अशाच प्रकारे संपवतो,' असे म्हणून दशहत निर्माण केली होती. घरात पत्नी, पारूबाईची सून, हे दोघे होते. सून बाहेर येताच तिचाही अशोकने पाठलाग केला. मात्र, घराचे गेट बंद करून घेतल्याने जीव वाचला, अशी आपबीती परिसरातील महिलांनी सांगितली. मयत पारूबाई रॅपनवाड यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुले, असा परिवार आहे.

पारूबाई लक्ष्मण रॅपनवाड यांनी मुलीसह तिच्या दोन अपत्यांना नरसी येथे

परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही खबरदारीच्या सूचना, पोलीस यंत्रणा सतर्कगुरुवारी काही पक्ष, संघटना ९ नांदेड ...
12/12/2024

परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही खबरदारीच्या सूचना, पोलीस यंत्रणा सतर्क

गुरुवारी काही पक्ष, संघटना ९ नांदेड शहरात करणार निषेध, प्रशासकीय पातळीवरून शांततेचे आवाहन

10/12/2024

माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड, दि. 9 डिसेंबर :- माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 12 ते 15 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे व माहूर पोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत.

प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे ते फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणेबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेबद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.

हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीतानी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांमुळे शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जारी केले आहेत.
000000

Address

Nanded

Telephone

+918888201516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandedkar MH26 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nandedkar MH26:

Share