
03/08/2025
हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू! शिक्षकाचा लॉजमधून मृतदेह सापडल्याने खळबळ.
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील आशिष शिंदे या खासगी शिक्षकांचा मृतदेह अर्धापूरमधील स्वराज लॉजमध्ये आढळून आला. रुममधून दिवसभर बाहेर न आल्यामुळे वेटरला संशय आला आणि दरवाजा तोडल्यावर मृतदेह सापडला. पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.