13/05/2026
नांदगावचा शुभम खैरनार याचे नाव सध्या संपूर्ण भारतभर NEET पेपर लीक प्रकरणामुळे चर्चेत आहे. इंस्टाग्रामवरील ४.५ मिलियन फॉलोअर्स असलेल्या “comedyculture.in” सारख्या मोठ्या पेजेसवर त्याच्याबद्दल पोस्ट्स व्हायरल होत आहेत. तसेच “Shubham Khairnar” नाव इंस्टाग्रामवर सर्च केल्यास लाखो व्ह्यूज असलेले अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.
“Flirting.lines” सारख्या २.८ मिलियन फॉलोअर्स असलेल्या पेजेसपासून ते सकाळ, ABP News आणि इतर अनेक न्यूज चॅनेल्सवर सुद्धा शुभम खैरनार याच्याच नावाची चर्चा सुरू आहे.
मात्र, अजूनपर्यंत या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आलेले नाही. तपास सुरू असून अधिकृतरीत्या सर्व तथ्य स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्य बाहेर येण्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.