Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर

  • Home
  • India
  • Nandurbar
  • Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर

Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर Nandurbar Smart City is a Smart application, envisioned to be a single-window source for all informa

एक पाऊल स्मार्ट सिटीच्या दिशेने टाकत खास नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व स्मार्ट नंदुरबारकरांसाठी , नंदुरबार स्मार्ट सिटी ' हा जिल्ह्यातील सर्वात मोठा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म तसेच प्ले स्टोअर वरील नंदुरबार मधील सर्वाधिक डाऊनलोड असलेले अँप आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जगभरातील नंदुरबार करांना एकाच ठिकाणी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत, आपल्या नंदुरबार ला देशाच्या व जगाच्या

नकाशात ओळख वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा व आपल्या शहरावरील प्रेम व्यक्त करण्याचा नंदुरबार स्मार्ट सिटी हा एक स्मार्ट व प्रेरणदायी प्रवास आहे

10/10/2025

❤️Nandurbar

05/10/2025

मूळवाट'! आता नोकरीसाठी गाव सोडायची गरज नाही !

आपल्या नंदुरबार जिल्ह्यातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य!

‘मूळवाट’ – आपल्या गावातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य!

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवा पर्व सुरू झाला आहे. स्थलांतर, गरीबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत. मा. पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला ‘मूळवाट’ हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला, तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही. यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून, कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तरीही स्थलांतर अटळ असल्यास, नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुखादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे. यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचण आल्यास प्रशासनाला तत्काळ मदत करता येईल.

प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणींसाठी दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत:

📞 मजदूर हेल्पलाईन: 1800 120 11211
📞 महिला व बालक हेल्पलाईन: 1800 3000 2852

या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार, रेशन, आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवता येते. तसेच, ग्रामपंचायतीकडे काम उपलब्ध नसल्यास, कोणतीही सामाजिक संस्था किंवा शुभचिंतक थेट या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात.

‘मूळवाट’ हा उपक्रम नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन गावोगावी आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झाला आहे.

जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभं आहे. ‘मूळवाट’ उपक्रमाद्वारे आपल्या मातृभूमीला स्थलांतरमुक्त आणि समृद्ध बनवूया.

🌧️ नंदुरबार जिल्ह्यासाठी हवामानाचा पाच दिवसीय अंदाज 🌧️मौसम विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यात पुढील...
27/09/2025

🌧️ नंदुरबार जिल्ह्यासाठी हवामानाचा पाच दिवसीय अंदाज 🌧️

मौसम विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

📅 २७ सप्टेंबर २०२४
➡️ नंदुरबार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी.
⛈️ मुसळधार पावसाची शक्यता.

📅 २८ सप्टेंबर २०२४
➡️ नंदुरबार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट कायम.
⛈️ काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता.

📅 २९ सप्टेंबर २०२४
➡️ नंदुरबार जिल्ह्यात ग्रीन अलर्ट.
🌦️ हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित.

📅 ३० सप्टेंबर २०२४
➡️ नंदुरबार जिल्ह्यात ग्रीन अलर्ट.
🌦️ विखुरलेला पाऊस.

📅 ०१ ऑक्टोबर २०२४
➡️ नंदुरबार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट.
⛈️ मुसळधार पावसाची शक्यता.

⚠️ सावधानतेचे आवाहन
•नद्या, नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळा.
•शेतकरी बांधवांनी शेतीसंदर्भात काळजीपूर्वक नियोजन करावे.
•नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवावे.

👉 हा अंदाज लक्षात घेऊन नंदुरबारकरांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी.

25/09/2025

'शांतता राखा, कायद्याचा सन्मान करा' – मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन
नंदुरबारमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेल्या मुक मोर्चाला काहींच्या गैरवर्तनामुळे हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे, तसेच कायद्याचा आदर करून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या संदेशात सांगितले की,
📍 जिल्हा प्रशासन तुमच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
📍 कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका.
📍 शांततामय मार्गाने आपली मागणी मांडणे हेच लोकशाहीचे बळ आहे.
📍 जर कोणाकडे घटनेविषयी कोणतीही महत्त्वाची माहिती असेल किंवा तपास प्रक्रियेसाठी सहकार्य करायचे असेल, तर त्यांनी तात्काळ ९६९९७११८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासन नागरिकांनी दिलेली माहिती पूर्ण गोपनीयतेने हाताळेल.
#डॉमित्तालीसेठी #शांततेचेसंदेश #लोकशाहीचासन्मान

24/09/2025

अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांचे जनतेला शांततेचे आवाहन

*दुसरी माळ. श्री संकष्टाई दर्शन नंदुरबार* 🙏🙏
23/09/2025

*दुसरी माळ. श्री संकष्टाई दर्शन नंदुरबार* 🙏🙏

आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडले कोठलीच्या योगराजचे चित्रनंदुरबार तालुक्यातील कोठली येथील के. डी. गावित विद्यालय कनिष्ठ व मह...
19/09/2025

आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडले कोठलीच्या योगराजचे चित्र

नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील के. डी. गावित विद्यालय कनिष्ठ व महाविद्यालयाचा विद्यार्थी योगराज गणेश पाडवी याने आपल्या चित्रकलेच्या जोरावर नंदुरबार जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

राज्य कलाप्रदर्शनात योगराजच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर त्याची निवड आता आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे. विशेष म्हणजे, भूतकाळातील संग्रहित वस्तूंच्या हुबेहूब प्रतिमांवर आधारित त्याच्या चित्रकृतींना परीक्षकांनी विशेष दाद दिली.

सध्या योगराज छत्रपती संभाजीनगर येथील राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालयात फाउंडेशन कोर्स करीत असून, या परीक्षेत तो महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.

विद्यालयाचे प्राचार्य ए. पी. नाईक व कलाशिक्षक आर. एन. पाटील यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यात त्याच्याकडून अजून मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

योगराजच्या या यशामुळे जिल्ह्याच्या तरुण कलाकारांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

Address

F-67 , Raghuvanshi Complex, Near Aamdar Karyalay , Navnath Nagar, Viral Vihar
Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर:

Share

Our Story

स्मार्ट नंदुरबारकरांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचा छोटासा प्रयत्न