YFC Trending News

YFC Trending News Here we are media and news company working on Trending news politics Entertainment news.

लष्करी जवानाच्या दोन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्याची थरारक घटना नाशिकमध्ये घडल्याचे समोर आले आहे. अंगणात खेळ...
24/09/2025

लष्करी जवानाच्या दोन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्याची थरारक घटना नाशिकमध्ये घडल्याचे समोर आले आहे. अंगणात खेळताना दोन वर्षांच्या चिमुरड्याला बिबट्याने पळवून नेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकच्या वडनेरदुमाला गावाच्या मुख्य चौकात तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) 'कारगिल' प्रवेशद्वारालगत आतील बाजूने लष्करी जवानांची एम.एम. क्वार्टर वसाहत आहे. या वसाहतीत हा प्रकार घडला.बिबट्याने मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास प्रवेश करत लष्करी जवानाच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला अंगणात खेळत असताना उचलून नेल्याची घटना घडली.मध्यरात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या पथकांसह आर्टिलरी सेंटरमधील जवानांकडून जंगल आणि वालदेवीच्या पात्रालगत मुलाचा शोध घेतला जात होता. सैन्यातील जवान, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला असून नाशिक तालुक्यात पहिल्यांदा सैन्याची तुकडी बिबटयाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी आहे.पिंपळगाव खांब सोडल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाजवळच आर्टिलरीचे प्रवेशद्वार आहे. परिसरात झाडीझुडपांचे जंगल आहे. या जंगलातून बिबट्या वसाहतीत आला.ओट्यावर खेळणाऱ्या श्रुतीक गंगाधर या चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात धरून धूम ठोकली. श्रुतीकच्या रडण्याचा आवाज येताच पित्याने बाहेर धाव घेतली, तेव्हा बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडले.
आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरड करत धाव घेतली. सुमारे शंभर मीटरपर्यंत पित्यासह त्यांचे सहकारी धावत सुटले. नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने धाव घेतली. मात्र बिबटचा पसार झाला होता. मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेपर्यंत बेपत्ता मुलाचा शोध लागू शकला नव्हता.

रविवारी सकाळी चारकोप येथील सरकारी औद्योगिक वसाहतीतील त्यांच्या कार्यालयात 65 वर्षीय फाउंड्री व्यावसायिक मोहम्मद अयुब सय्...
24/09/2025

रविवारी सकाळी चारकोप येथील सरकारी औद्योगिक वसाहतीतील त्यांच्या कार्यालयात 65 वर्षीय फाउंड्री व्यावसायिक मोहम्मद अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी पीडितेचा धाकटा मुलगा, त्याचा व्यावसायिक भागीदार आणि भाड्याने घेतलेल्या मारेकऱ्यांपैकी एकासह तिघांना अटक केली आहे, तर दुसरा हल्लेखोर फरार आहे
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या पीडितेचा मुलगा हनीफ सय्यद आणि त्याचा साथीदार शानू चौधरी (40) यांनी रचलेल्या कटाचा परिणाम आहे. या दोघांनी गोवंडी येथील दोन कॉन्ट्रॅक्ट किलरना कामावर ठेवले होते आणि त्यांना या कामासाठी 6.5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 1 लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते आणि उर्वरित रक्कम गुन्हा घडल्यानंतर देण्यात येईल. खैरुल इस्लाम कादिर अली (27) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी उघड केले की अयुबने अलिकडेच मालाडमधील एव्हरशाईन नगरमध्ये आपल्या मुलाला भेट म्हणून दिलेल्या फ्लॅटची कागदपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यासाठी कारण त्याने त्याच्या मुलाच्या बेजबाबदार वर्तनाचे कारण सांगितले होते. त्याच वेळी, फाउंड्री व्यवसायात कोट्यवधी रुपये गुंतवले आणि यंत्रसामग्री खरेदी केली, चौधरी कोणताही परतावा न मिळाल्याने निराश झाला होता. या असंतोषामुळे दोघांनी हत्येचा कट रचला.रविवारी सकाळी दोन जणांनी अयुबच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले आणि पळून गेले. या हल्ल्याने स्थानिक व्यापारी समुदायाला धक्का बसला. पोलिस उप आयुक्त संदीप जाधव आणि एसीपी नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चौहान यांच्या नेतृत्वाखाली चारकोप पोलिसांच्या पथकाने काही दिवसांतच हे प्रकरण उलगडले सहायक पोलीस निरीक्षक धनंजय आव्हाड आणि उपपोलीस निरीक्षक आबा पवार यांच्यासह शोध पथकाने मुलगा, जोडीदार आणि एका खुनीला अटक केली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री प्रेमी युगलाचा थरारक शेवट झाल्याच्या प्रकरणात एक नवीन ...
24/09/2025

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री प्रेमी युगलाचा थरारक शेवट झाल्याच्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने ज्या नावाने मुलीचे नाव जाहीर केलं होतं, ते खोटं निघालं असून मयत मुलीचं खरं नाव ऋतुजा पद्माकर खरात आहे. ती साखरखेर्डा येथील शिंदी गावातील रहिवासी होती. ऋतुजाने खोटं आधार कार्ड देत या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला होता.
मंगळवारी रात्री संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारं हत्या-आत्महत्या प्रकरण बुलढाण्यातील खामगाव येथे घडलं होतं. 19 वर्षीय मयत तरुणी ऋतुजा खरात ही खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षाचं शिक्षण घेत होती. ती अभ्यासात हुशार असल्याचं सांगितलं जातं. यावर्षी उन्हाळी 2025 परीक्षेत विशेष प्रावीण्य श्रेणीत ती उत्तीर्ण झाली होती.हॉटेल जुगनू येथे 22 वर्षीय प्रियकर साहिल उर्फ सोनू राजपूत याने ऋतुजाची चाकूने निर्घृण हत्या केली. त्यानंतर सोनूने स्वतःवर चाकूने करुन घेत आत्महत्या केल्याचा आरोप आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील सजनपूर येथील जुगनू हॉटेलमध्ये 23 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान हे थरारक हत्याकांड घडलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.मयत प्रेमी युगल सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील रहिवासी असून खामगाव येथे राहत असल्याची माहिती आहे. या दोघांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. या हॉटेलमध्ये ते यापूर्वी आठ वेळा आले असल्याचीही रजिस्टरवर नोंद असल्याचे कळते.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी कोपली आहे. अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 29 गावांना सीना नदीने ...
24/09/2025

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी कोपली आहे. अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 29 गावांना सीना नदीने वेढलं आहे. पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सीना नदीकाठच्या 124 गावांना पुराचा इशारा देण्यात आला असून, 185 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी पूल रात्री 11.30 वा. बंद करून गाड्या सावळेश्वर टोल नाक्यावर अडवून ठेवल्या. पूल बांधल्यापासून प्रथमच वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे. सोलापूर-पुणे महामार्ग पहिल्यांदाच बंद करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने घेतला आहे.
मराठवाड्यात तुफान पाऊस सुरु असून अजून तीन दिवस परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये पावसाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. माढा तालुक्यातील शिंगेवाडी, वाघेगव्हाण, मुंगशी, लव्हे, तांदूळवाडी, दारफळ, सुलतानपूर, कैवड, वाकाव, खैराव, कुंभेज आदी दहाहून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. मोहोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, तिर्हे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले, राजूर, नांदूर, गावासह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.सोलापुरात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. माढा तालुक्यात लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदत घेत दारफळ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही काही ग्रामस्थ पाण्यात अडकलेले असून, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीनं स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना तुरुंगात पाठवण्याची योजना आखली. त्यासाठी प्रियकराच्या मद...
24/09/2025

प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीनं स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना तुरुंगात पाठवण्याची योजना आखली. त्यासाठी प्रियकराच्या मदतीनं एका तरुणाचा खून केला. पण शेवटच्या कॉलवरील आवाजानं संपूर्ण केस फिरली आणि तरुणीसह तिचा प्रियकर अडकला. दोघांच्या हाती बेड्या पडल्या. प्रेम कहाणीत कुटुंबाचा अडसर नको म्हणून त्यांना तुरुंगात पाठवायला निघालेली तरुणी आता स्वत:च तुरुंगात पोहोचली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये १८ सप्टेंबरच्या सकाळी पाकबडा परिसरात एक अज्ञात मृतदेह सापडला. त्याच्या शेजारी एक मोबाईल पडलेला होता. पोलिसांनी त्याची कॉल लिस्ट तपासली. त्यानं शेवटचा कॉल ११२ नंबरवर केला होता. त्यातील आवाजातून त्यानं कोणाच्यातरी वडील आणि भावांवर मारहाणीचा आरोप केला जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. कोणीतरी मारहाण केल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी तपास सुरु केला. पण लवकरच हे प्रकरण जटिल बनलं. पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंग ग्रामस्थ आणि मृत तरुणाच्या कुटुंबियांना ऐकवलं. तेव्हा त्यांनी हा आवाज मृत पावलेल्या योगेशचा नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या हत्येमागे मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आला.कॉल डिटेल रेकॉर्डिंग ( सीडीआर ) आणि लोकेशन ट्रॅकिंगमधून समोर आलेल्या माहितीनं तपासाची दिशा बदलली. मृत योगेशचा थेट वाद शोभाराम किंवा त्याच्या मुलांशी नव्हता. योगेशनं अखेरच्या कॉलमध्ये शोभाराम आणि त्याच्या मुलांची नावं घेतली होती. पण प्रकरण वेगळंच होतं. शोभारामची मुलगी स्वाती आणि गावात राहणाऱ्या मनोज नावाच्या तरुणाचे प्रेम संबंध होते. हीच प्रेम कहाणी हत्येचं मूळ ठरली.

विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणार्‍या गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एका महिले...
24/09/2025

विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणार्‍या गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एका महिलेची हत्या झाली आहे. रेखा नावाच्या महिलेचा तिच्या प्रियकरानं अतिशय निर्घृणपणे खून केला. रेखाचे अन्य कोणाशी तरी प्रेम संबंध असल्याचा संशय प्रियकराला होता. याच संशयाच्या भरातून त्यानं रेखाची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. रेखाच्या प्रियकरानं तिच्यावर ११ वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.
मृत पावलेली रेखा २८ वर्षांची होती. ती बंगळुरुच्या कामाक्षीपल्ला परिसरात असलेल्या एका खासगी कंपनीत टेलिकॉलरचं काम करायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि लोकेश यांनी २ ते ३ महिन्यांपूर्वी एका मंदिरात लग्न केलं होतं. त्याआधी ते काही महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रेखाचं आधी एक लग्न झालं होतं. तिला दोन मुलंदेखील आहेत. पण ती पहिल्या पत्नीपासून वेगळी राहात होती. तर आरोपी लोकेशदेखील घटस्फोटित आहे.रेखानं लोकेशला तिच्याच कंपनीत ड्रायव्हरची नोकरी मिळवून दिली होती. पण लोकेशला तिच्या चारित्र्यावर संशय होता. रेखाची परपुरुषाशी जवळीक असल्याचे आरोपही त्यानं केले होते. सोमवारी रेखा तिच्या लेकीसोबत बस थांब्यावर उभी होती. ती बसची प्रतीक्षा करत होती. त्यावेळी लोकेश तिथे आला. त्यानं रेखावर चाकूनं हल्ला केला. त्यानं रेखावर ११ वार केले.रेखावर सपासप वार करुन लोकेश तिथून फरार झाला. ही संपूर्ण घटना रेखाच्या लेकीच्या डोळ्यांसमोर घडली. यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. स्थानिकांनी आणि कामाक्षीपाल्या पोलिसांनी रेखाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रेखानं जीव सोडला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही.

24/09/2025

लक्ष्मण हाकेंची 'ढाल' बनलेल्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; 40 जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गंभीर जखमी

एका 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली झोपून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. रेशन दुकानात तांदूळ घ्...
24/09/2025

एका 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली झोपून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. रेशन दुकानात तांदूळ घ्यायला जाते म्हणून सांगितलं, पण संध्याकाळपर्यंत या दोघी मायलेकी घरी परतल्या नाही. त्यानंतर भातली रेल्वे स्थानकाजवळ या दोघींचा मृतदेह आढळून आला.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सोमवारी 22 सप्टेंबर रोजी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह धावत्या रेल्वे खाली येऊन आपली जीवन यात्रा संपविल्याने खळबळ उडली आहे. ही घटना भादली रेल्वे पुलाजवळ घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मनीषा चंद्रकांत कावळे (वय-26) आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे (वय-6) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसी) शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं या मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा कावळे या आपल्या पती चंद्रकांत आणि दोन मुलींसोबत राहत होत्या. पती चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करतात. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पती घरी असताना, मनीषा त्यांनी गावातील एका व्यक्तीच्या ओळखीच्या बाईकडून रेशनचा तादूळ आणायला जात असल्याचे सांगितले. सोबत त्यांनी लहान मुलगी गौरीला घेतले आणि त्या घरातून निघून गेल्या.

24/09/2025

अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

आरक्षण प्रश्नावरून मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघालं असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगा...
24/09/2025

आरक्षण प्रश्नावरून मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघालं असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन करवर यांच्यावर मंगळवारी रात्री सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे इतर तीन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यात काही आठवड्यांपूर्वी जेव्हा लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा पवन करवर हे हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याच करवर यांच्यावर हल्ला झाल्याने हाके यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पवन करवर आणि त्यांचे साथीदार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळील एका धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. दरम्यान, अचानकपणे 40 ते 50 अज्ञात युवक धाब्यावर पोहोचले आणि हातातील काठ्या, दांडके तसेच लाथाबुक्क्यांच्या सहाय्याने करवर यांच्यासह चौघांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही क्षण धाबा परिसरात एकच गोंधळ उडाला.

राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरण...
24/09/2025

राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून संपूर्ण मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली.भरणे म्हणाले, राज्यात सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाला असून, यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. “ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक निकष तपासणे आवश्यक असते. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्र सरकारसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.कृषीमंत्र्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन घरडून गेली आहे किंवा ज्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना शासन तातडीची मदत करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठविण्याची गरज नाही. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतात जाऊन पंचनामे करतील.मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, ज्या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तिथे शेतकऱ्यांवर कर्जवसुली होणार नाही. राज्य सरकार याबाबत बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे.
निधीची तरतूद
शासनाने नुकतेच २,२१५ कोटी रुपये मदत निधी जमा केले असून, ही रक्कम हळूहळू वाढत आहे. या निधीतून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत वितरित केली जाईल. भरणे यांनी सांगितले की, “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणतीही मदत थांबणार नाही. शासन प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवेल.”

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने रॉ गुप्तचर यंत्रणेचा एजंट अ...
23/09/2025

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने रॉ गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचं भासवून एका बँक कर्मचाऱ्याची जवळपास ४ कोटींची फसवणूक केली आहे. आपण रॉच्या मिशनवर आहोत. आपल्याला ३८ कोटी रुपये मिळणार आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी प्रोसेस फी भरावी लागणार आहे, अशी विविध कारणं सांगून आरोपीनं फसवणूक केलीय. मागच्या पाच वर्षांपासून ही फसवणूक सुरू होती.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कॉन्फरन्स कॉल’ केल्याचा देखावा केला. तसेच इतरही बनावट अधिकारी उभे केले. गोपनीय मिशनच्या बदल्यात ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, असं सांगत ही लूट केली. फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदार अधिकाऱ्याचेच काही नातेवाईक सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून पर्वती पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. फिर्यादी यांच्या मेहुण्याने शुभम गुप्तचर खात्यात कार्यरत आहे. त्याने एक मिशन पूर्ण केले असून त्याला ३८ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, अशी बतावणी केली. मात्र हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणे गरजेचे असल्याचं सांगितलं.

Address

Ap Warulwadi Kamal Plaza
Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when YFC Trending News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YFC Trending News:

Share