MS news.live

MS news.live MSNEWS lLIVE24*7

All over MSNEWS LIVE Available

26/08/2026

NASHIK SATPUR : अंबड लिंक रोड दुर्घटनाः महापौरांकडून बोरसे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; कुटुंबातील एका सदस्याला मानधनावर नोकरी 24 ठेकेदारावर गुन्हा दाखल करा: दिनकर पाटील यांची मागणी अंबड लिंक रोडवरील नुकत्याच झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सुनील बोरसे यांच्या कुटुंबीयांची नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले.​



​ .

26/08/2026

नाशिक उड्डाणपुलावर चारचाकीचा अपघात; वाहतूक कोंडी, प्रशासनाचे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
​ नाशिक येथील उड्डाणपुलावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
​अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...

26/08/2026

NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​

26/08/2026

NASHIK : सातपूर येथे मोठा अपघात टळला!
​सातपूर कॉलनी परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी मार्गाने (Single Line) वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
​मंगळवारी या मार्गावरून जात असताना एका दुचाकीस्वाराची गाडी अचानक घसरली. सुदैवाने, वाहतूक संथ असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होता, ज्यामुळे दुचाकीस्वाराचे किरकोळ नुकसान झाले आणि मोठा अपघात टळला...​ MS news.live Nashik - नाशिक - Maharshtra Mojammil Sayyed

25/08/2026

NASHIK SATPUR :अंबड लिंक रोड अपघात: अंगावरून आयशर गेल्याने पेंटिंग कामगाराचा जागीच मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
​अंबड लिंक रोड परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताची घटना थेट सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
​सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, रस्ता निसरडा असल्याने एक दुचाकी अचानक घसरली. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. गाडी घसरल्यामुळे चालक ईश्वर पेंटर हे रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले आणि सुदैवाने बचावले. मात्र, विरुद्ध दिशेला पडलेले बोरसे यांच्या अंगावरून आयशर ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
​मयत बोरसे हे पेंटिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​दरम्यान, अंबड लिंक रोडसह शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पावसाळ्यामुळे झालेला निसरडा रस्ता यामुळे हे अपघात वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी तीव्र मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे...​

25/08/2026

सातपूरच्या अंबड लिंक रोड येथे अपघात अपघातात एकाचा मृत्यू ....​








25/08/2026

NASHIK SATPUR : सिटीलींकं प्रवासादरम्यान पिंपळगाव बहुला दरम्यान महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले
त्र्यंबकेश्वर ते पंचवटी असा सिटीलिक गाडीने प्रवासादरम्यान
सोमवार (दि 24) च्या रात्री सात वाजेच्या दरम्यान महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना पिंपळगाव बहुला दरम्यान घेतली आहे. यां प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे...

24/08/2026

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग; तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू
​अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे भीषण आग लागली. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत तीन लहान बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर या कक्षातील इतर सहा अर्भकांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
​आग लागल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कक्षातील बालकांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांना वाचवता आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी माजी खासदार नवनीत राणा यांनी भेट देऊन बाधित कुटुंबांचे सांत्वन केले.
​या दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर आणि अग्निरोधक उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मृत बालकांचे नातेवाईक आणि नागरिकांकडून केली जात आहे... Mojammil Sayyed

24/08/2026

सुरगाणा: मृत्यूनंतरही मरणयातना कायम! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना करावा लागतोय धडकी भरवणारा नदीप्रवास.सुरगाणा तालुक्यातील एका गावात मृत्यूनंतरही मयताच्या टाळूवरील लोणी खाणारा कारभार पाहायला मिळत आहे. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना चक्क भरलेल्या नदीपात्रातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
​पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्यास कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला स्मशानभूमीची झालेली अत्यंत दुरवस्था, तर दुसऱ्या बाजूला शेड नसल्याने भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
​"जिवंतपणी सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, कमीत कमी मृत्यूनंतर तरी सन्मानाने निरोप देता यावा," अशी उद्विग्न भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन या ठिकाणी पूल आणि सर्वसुविधायुक्त स्मशानभूमी उभारणीची योग्य उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.. ​

24/08/2026

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम! पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांसह भाविकांसोबत बसने प्रवास
​त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा ताफा पार्किंगजवळ सोडून सामान्य प्रवासी व भाविकांसोबत सरकारी बसने प्रवास करत व्यवस्थेचा आढावा घेतला.
​यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि पर्यावरण तज्ज्ञ राजनाथ सिंग यांच्यासह त्यांनी श्रावण सोमवारी होणाऱ्या गर्दीचा आढावा घेतला व त्यादृष्टीने काय उपाययोजना करता येतील, याची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरी जवळ एक महत्त्वाची बैठकही आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.. MS news.live Nashik - नाशिक - Maharshtra

Address

Satpur Colony
Nashik
422007

Alerts

Be the first to know and let us send you an email when MS news.live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share