NashikBulletin

NashikBulletin � Nashik Breaking News
� City Updates | Viral Stories
� Real News. Real Time
� Follow for update

15/09/2026
13/09/2026

🔴 पाइपलाइनच्या कामातील निष्काळजीपणाचा बळी!

नवीन नाशिकमधील सिद्धार्थ नगर येथे पाइपलाइनचे काम सुरू असताना रस्त्यावर आडवे टाकलेले काळे पाइप अंधार व पावसामुळे दुचाकीस्वारांना दिसले नाहीत. रिफ्लेक्टर्स किंवा सुरक्षेची योग्य व्यवस्था नसल्याने दुचाकी पाइपवर आदळली.

या दुर्दैवी अपघातात सिद्धार्थ गोरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि ६ महिन्यांची व २ वर्षांची दोन लहान मुली आहेत. 💔

या घटनेला जबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नागरिक गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले.

दरम्यान, राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर नागरिकांचा ठिय्या, तर मृतदेह घेऊन नातेवाईक महापालिका प्रवेशद्वारावर दाखल झाले.

❓ या निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

नाशिकच्या ताज्या अपडेटसाठी Nashik Bulletin ला Follow करा.

NashikMunicipalCorporation NashikBreakingNews नाशिक अपघात नवीननाशिक

12/09/2026

🚨 पंचवटीत कर्णबधिर शाळेच्या बसचा अपघात!

पंचवटीतील रामवाडी पुलाजवळ, गोदा पार्क परिसरात कर्णबधिर शाळेची बस एका पत्र्याच्या शेडमध्ये घुसल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.
दरम्यान, बसने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवती जखमी झाली आहे. प्रथमदर्शनी बसचे ब्रेक फेल झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर चालकाला पंचवटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

❓ या घटनेबाबत तुमचं मत काय?

📲 अशाच ताज्या नाशिक अपडेट्ससाठी Follow करा Nashik Bulletin

NashikAccident TrafficUpdate NashikBulletin नाशिक पंचवटी अपघात नाशिकबातम्या

12/09/2026

🚨 देवलाली कॅम्प रोडवर मोठी वाहतूक कोंडी!

📍 देवलाली कॅम्प रोडवर मागील दोन तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांची मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

⚠️ सध्या शक्यतो या मार्गाने जाणे टाळा आणि पर्यायी मार्गाचा वापर करा.

❓ तुम्हीही या वाहतूक कोंडीत अडकला आहात का? कमेंटमध्ये कळवा!

📲 अशाच ताज्या स्थानिक अपडेट्ससाठी Nashik Bulletin ला Follow करा.

Deolali NashikBulletin नाशिक देवलालीकॅम्प वाहतूककोंडी

Address

Nashik
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NashikBulletin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share