fogcity bulletin

fogcity bulletin Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from fogcity bulletin, News & Media Website, Nashik.

इगतपुरी -इगतपुरी तालुक्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया मोहिमा घेऊन  प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहेत....
08/06/2026

इगतपुरी -इगतपुरी तालुक्यात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया मोहिमा घेऊन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहेत.आज तालुक्यातील वासाळी याठिकाणी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यामध्ये मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया करून दाखवण्यात आली तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी किशोर भरते आणि सहाय्यक कृषी अधिकारी विजय कापसे यांच्या उपस्थितीत तालुक्यात बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यात येत आहेत. जैविक बीज प्रक्रियेमध्ये PSB, रासायनिक मध्ये थायरम किंवा करबेण्डेणझीम यांचा वापर करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविली जात आहॆ.

नाशिक:नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अ...
05/06/2026

नाशिक:
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध आणि विषारी गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आज ही धडक कारवाई करण्यात आली.
​मिळालेल्या माहितीनुसार, चिंचलाखैरे शिवार येथील वैतरणा नदीच्या किनाऱ्यावर, डोंगराच्या कपारीत अत्यंत दुर्गम भागात अवैध गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ परिसरात छापा टाकला.
​या छाप्यात पोलिसांना गावठी हातभट्टी आणि गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील रसायन (रसायन मिश्रित कच्चे साहित्य) आढळून आले. पोलिसांनी हे संपूर्ण साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार निलेश देवराज, पोलीस शिपाई दीपक पटेकर, पोलीस शिपाई मधुकर पवार आणि महिला पोलीस शिपाई सरला भगत यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

20/05/2026

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप
इगतपुरी तालुक्यात 'लाक्षणिक बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

​इगतपुरी-देशभरातील औषध विक्रेते आणि पुरवठादार यांनी पुकारलेल्या संपामुळे शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात औषध विक्रेत्यांनी या संपात सहभाग घेत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला.
​या संपाच्या पार्श्वभूमीवर, इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील औषध बाजारपेठेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी

https://youtu.be/MVhe8AmHpvc?si=2VwAWbiLAu-xm5iw

घोटी - स्थानिक गुन्हे पथकाची दमदार कामगिरी दरोड्यातील पाच आरोपीना अटक..  घोटी पोलीस च्या हद्दीत रस्त्यात शस्त्राचा धाक द...
13/05/2026

घोटी - स्थानिक गुन्हे पथकाची दमदार कामगिरी दरोड्यातील पाच आरोपीना अटक..
घोटी पोलीस च्या हद्दीत रस्त्यात शस्त्राचा धाक दाखवत वाहन थांबवून अंबड येथील फिर्यादीवर हल्ला करत रोख रक्कम आणि मोबाईल लुटीच्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पाचही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वन विभागाची इगतपुरी तालुक्यात मोठी कारवाईआरोपीच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त ; एकाविरुद्ध गुन्हा दाखलइगतपुरी : वनपरिक...
09/05/2026

वन विभागाची इगतपुरी तालुक्यात मोठी कारवाई

आरोपीच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

इगतपुरी : वनपरिक्षेत्र कार्यालय इगतपुरी प्रादेशिक यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा गिरणारे (ता. इगतपुरी) येथे धाड टाकून आरोपीच्या घरातून वन्य प्राण्यांचे विविध अवयव जप्त करत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी मा. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, इगतपुरी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी अंदाजे ३.०० वा. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक इगतपुरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजा गिरणारे येथील एका व्यक्तीच्या घरात वन्यजीवांचे अवयव बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले आहेत. सदर माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सायंकाळी अंदाजे ५.०० वा. संबंधित ठिकाणी जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीच्या घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान आरोपी नामे चंद्रकांत राजेंद्र माळी (वय अंदाजे ३३ वर्षे, रा. गिरणारे (बनवाडी), ता. इगतपुरी, जि. नाशिक) याच्या घरातून विविध वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये सांबर शिंग, काळवीट शिंग, रानडुक्कर दात, घुबडाचे अवयव, साळींदर काटे तसेच मोरपिसांचा समावेश आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर अवयव वेगवेगळ्या ठिकाणांहून आणल्याची माहिती दिली असून धार्मिक व दैविक कार्यात त्यांचा वापर होत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, प्राप्त गुप्त माहितीनुसार आरोपीकडे बंदूक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून संबंधित शस्त्राचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

कारवाईनंतर आरोपीस ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पुढील चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून आरोपीस तात्पुरत्या स्वरूपात पोलीस विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. आज आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मिळण्याकरिता मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सदर कारवाई सिद्धेश सावर्डेकर उपवनसंरक्षक, पश्चिम भाग नाशिक तसेच कल्पना वाघेरे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत कांचन भुसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी, वनपाल गावित, भोये, पवार, दिवाणे वनरक्षक पाटील, साबळे, धादवड,बागुल,गांगुर्डे, पोटिंदे, गावंडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांचे अवयव बाळगणे, व्यापार करणे अथवा त्यांचा अवैध वापर करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारची माहिती तात्काळ वन विभागास द्यावी.

ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब
27/09/2024

ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब

https://youtu.be/kOueSubwnV0?si=jS-dnahbqRoPkDQ8मराठवाडा आणि मुंबईची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात र...
31/03/2024

https://youtu.be/kOueSubwnV0?si=jS-dnahbqRoPkDQ8
मराठवाडा आणि मुंबईची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या हक्काच्या पेयजल योजनेच्या निधीवर अधिकारी आणि ठेकेदारांचा डल्ला ?

Special Report | इगतपुरी तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण | Lokshahi MarathiDisclaimer - The c...

26/10/2023
26/10/2023
आशा #सेविका #मोर्चा #पंचायतसमिती #इगतपुरी
23/10/2023

आशा #सेविका #मोर्चा #पंचायतसमिती #इगतपुरी

Address

Nashik
422403

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when fogcity bulletin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to fogcity bulletin:

Share