03/09/2023
आदेश.....
आज रविवार दि.०३/०९/२०२३ रोजी मा. पोलिस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात गोसावी समाजाबद्दल अपशब्द वापरणारे डॉ.विश्वंबर चौधरी यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा असे निवेदन देण्यात आले. २४ तासांच्या आत कारवाई झाली नाही तर मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ, संस्थापक अध्यक्ष श्री. उत्तम मामा बुवा, सचिव संदीप खरे, सचिन खरे, केदारनाथ हरिश्चंद्रे, अशोक गायकवाड, दिनकर खरे, नंदकुमार जाधव, रविंद्र करंजे, अशोक करंजे, राजेंद्र खरे, अरुण बुवा, प्रसाद बुवा, योगेश खरे, रेवणनाथ जाधव, यश जाधव, अशोक यादव, दत्तू सुर्यवंशी, दत्तात्रय खरे, विष्णु मोरे, बाळु हरिश्चंद्रे आदि समाज बांधव उपस्थित होते.