
16/09/2025
ट्रॅक्टर खरेदीची सुनामी येणार..!
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला असल्यामुळे देशभरात ट्रॅक्टरच्या विक्रीत तब्बल 25% वाढ झाली आहे. 2025 च्या ऑगस्ट महिन्यात 73 हजार 199 ट्रॅक्टरची विक्री झाली. गेल्या वर्षी हीच संख्या ऑगस्टमध्ये 54, 733 इतकी होती. यंदा जुलै 2025 च्या तुलनेतही ऑगस्ट महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात 72 हजार 797 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. जीएसटी कपातीमुळे सुद्धा ट्रॅक्टरच्या खरेदीमध्ये नवरात्र उत्सवानंतर आणखी गती येण्याची शक्यता आहे. ट्रॅक्टर अँड मेकॅनिझेशन असोसिएशनने ही आकडेवारी जाहीर केली आहे.