Jivan Keshari Marathi

Jivan Keshari Marathi Welcome To The PASYAA Entertainments!

FYJC Addmission Process Students Struggle News By Prasad Bhalekar
30/05/2026

FYJC Addmission Process Students Struggle

News By Prasad Bhalekar

लवकरच....
17/05/2026

लवकरच....

विद्वत्ता बुद्धिमत्ता ज्ञान भाषा युद्ध कलेचा अधिपती शौर्याची धगधगती ज्वाला धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज...
14/05/2026

विद्वत्ता बुद्धिमत्ता ज्ञान भाषा युद्ध कलेचा अधिपती शौर्याची धगधगती ज्वाला धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!

खरं तर जयंती नव्हे तर जन्मोत्सव म्हणायला हरकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा मुघल छळत होते तेव्हा सिंहगर्जना करून सांगितले की , अरे ! छत्रपती हा काही एक व्यक्ती नाही तो एक विचार आहे सह्याद्रीच्या कणाकणातून छत्रपतींचे विचार मुघलांचा घाम फोडतील घराघरात छत्रपतींचे विचार जन्माला येतील आणि हेच विचार आजच्या काळात गरजेचे आहे ज्या प्रमाणे समाजात वातावरण आहे त्याप्रमाणे घराघरात जर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचार जन्माला आले तर महाराष्ट्र आणि ही पावन भूमी पुन्हा आनंदाने रामराज्याचा अनुभव करेल !

छत्रपती संभाजी महाराज हे विद्यार्थांचे आदर्श आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी अवघड व बिकट काळात टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर संभाजी महाराज आठवावे...

यामुळे हा छावा फक्त प्रतिमेत नव्हे तर विचारात व आचरणात रहावा हेच खरे अभिवादन ठरेल.

प्रसाद भालेकर - समूहप्रमुख जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह नाशिक

📰 दैनिक दिव्य मराठीमध्ये “जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक” च्या मागणीची दखल! ✊📚राज्यातील विद्यार्थ्यांवर लादली ज...
10/05/2026

📰 दैनिक दिव्य मराठीमध्ये “जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक” च्या मागणीची दखल! ✊📚

राज्यातील विद्यार्थ्यांवर लादली जाणारी अन्यायकारक “लेट फी” तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच बारावी प्रवेश प्रक्रिया देखील अकरावीप्रमाणे केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबवावी या महत्त्वाच्या मागण्या आता व्यापक चर्चेत!

विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागू नये, आर्थिक दंडाच्या नावाखाली होणारी लूट थांबावी आणि शिक्षणाचा अधिकार अधिक सुलभ व्हावा यासाठी “जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह” सातत्याने लढा देत आहे. 🔥

🗞️ आज दैनिक दिव्य मराठी मध्ये या आंदोलनाची बातमी प्रकाशित झाली असून विद्यार्थ्यांच्या आवाजाला आता अधिक बळ मिळत आहे.

✍️ — प्रसाद भालेकर
समूहप्रमुख, जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक

#जीवन_केशरी

📢 विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मोठे पाऊल!जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांनी अकरावी-बारावी प्रवेशावेळी ...
09/05/2026

📢 विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मोठे पाऊल!

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांनी अकरावी-बारावी प्रवेशावेळी महाविद्यालयांकडून घेतल्या जाणाऱ्या एकरकमी शुल्काविरोधात शासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. 🙌

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अधिकृत प्रतिसाद प्राप्त झाला असून शुल्क विनियमन कायद्यात सुधारणा करताना आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामीण, शेतकरी, कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी हा लढा सुरूच राहणार! ✊📚

📰 ही बातमी आज दि. ९ मे २०२६ रोजी दैनिक दिव्य मराठी – DB Star Edition मध्ये प्रकाशित झाली.

#जीवन_केशरी

🎉 SSC बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐📚तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आण...
08/05/2026

🎉 SSC बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐📚

तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि संघर्षाचे हे सुंदर यश आहे! ✨
अशाच प्रकारे भविष्यातही मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करा! 🚀

🌟 “यश तुमचेच आहे, भविष्य उज्ज्वल आहे!” 🌟

— जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक
विद्यार्थ्यांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी ❤️

#हार्दिकअभिनंदन #जीवनकेशरी StudentSuccess MarathiStudents Nashik BoardResult Congratulations Maharashtra Students Motivation Success MarathiPost

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर!
08/05/2026

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर!

📢 जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक तर्फे सर्व दहावी SSC विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌸✨उद्या दिनांक ८ मे...
07/05/2026

📢 जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक तर्फे सर्व दहावी SSC विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌸✨

उद्या दिनांक ८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता SSC बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. 📚🎯

💐 तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे उज्ज्वल भवितव्य घडो हीच सदिच्छा!

🔗 निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
https://mahresult.nic.in
https://mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org

📝 Result पाहण्यासाठी:
✔ Seat Number
✔ आईचे पहिले नाव (Mother Name)

🌟 मेहनत करा • ध्येय ठेवा • यश तुमचंच आहे!

— जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक

🔥 विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मोठा आवाज!“लेट फी”च्या नावाखाली विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक अन्याय थांबला पाहिजे ✊इयत्त...
07/05/2026

🔥 विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मोठा आवाज!

“लेट फी”च्या नावाखाली विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक अन्याय थांबला पाहिजे ✊
इयत्ता ११ वीप्रमाणेच बारावी प्रवेश प्रक्रिया देखील शासनकेंद्रित व पूर्णपणे पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची मागणी जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांनी केली आहे.

📰 सदरील बातमी आज दि. ७/०५/२०२६ रोजी दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली.

📌 मुख्य मागण्या :
✔️ अतिरिक्त “लेट फी” तात्काळ रद्द करा
✔️ बारावी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या केंद्रीकृत पोर्टलवर घ्या
✔️ विद्यार्थ्यांना उन्हात रांगेत उभे ठेवणे थांबवा
✔️ शुल्काचा पूर्ण Fee Breakup द्या
✔️ विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा सुरू करा

🎓 शिक्षण हे अधिकार आहे, व्यापार नाही!



(EducationSystem Nashik JeevanKeshari StudentVoice Transparency SaveStudents)

📢 मोठा प्रश्न शिक्षण व्यवस्थेला!बारावी प्रवेश ऑनलाईन होणार अशी घोषणा…पण ❗ अजूनही नाही GR, नाही portal, नाही वेळापत्रक!दर...
01/05/2026

📢 मोठा प्रश्न शिक्षण व्यवस्थेला!

बारावी प्रवेश ऑनलाईन होणार अशी घोषणा…

पण ❗ अजूनही नाही GR, नाही portal, नाही वेळापत्रक!

दरम्यान काही महाविद्यालयांनी स्वतःचेच admission सुरू केले 😐

👉 मग centralized system कुठे आहे?
👉 विद्यार्थ्यांनी नेमकं काय follow करायचं?

🎯 क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश आधी होत होते — हे प्रशासनाने मान्य केले आहे
मग आता उपाय काय?

की पुन्हा “नंतर बघू” अशीच भूमिका?
विद्यार्थ्यांना स्पष्टता हवी — संभ्रम नाही!

📢 आमची मागणी: ✔️ तात्काळ GR जाहीर करा

✔️ Official portal launch करा

✔️ एकच transparent admission system लागू करा

👉 शिक्षण हा हक्क आहे, प्रयोग नाही!
bhuse

Address

817, GUPTA WADA GORERAM Lane
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jivan Keshari Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jivan Keshari Marathi:

Share