
18/07/2023
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती आहे. च्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. 'ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती श्रमिक, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे,' अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, तरीही या साहित्यिकांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. भांडवलशाही, मुंबईतील विषमता यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन! 💐🙏🏻