17/10/2025
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक - नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची मोठी कारवाई: दोन भामटे केरळमधून जेरबंद, फिर्यादीचे ₹ १० लाख परत मिळवले, ₹ २०.४४ लाख गोठवले!
* नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने झालेल्या फसवणुकीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
* फेसबुकवर अनोळखी महिलेने विश्वास संपादन करून फिर्यादीकडून एकूण ₹ २,७८,५०,०००/- ची आर्थिक फसवणूक केली होती.
* फिर्यादीने २२/०८/२०२५ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कोझीकोड, केरळ येथून दोन आरोपींना अटक केली.
* आरोपींची नावे: १) सजा हनुन आणि २) अब्दुल बासिथ थंगल.
* या कारवाईमुळे, फसवणूक झालेल्या रकमेपैकी ₹ १०,००,०००/- (दहा लाख रुपये) फिर्यादींना परत मिळवण्यात यश आले आहे.
* याव्यतिरिक्त, विविध बँकांमध्ये असलेले ₹ २०,४४,०००/- (वीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये) गोठविण्यात आले आहेत.
* नागरिकांनी अनोळखी कॉल्स, लिंक्स किंवा रिक्वेस्टवर विश्वास न ठेवता फसवणूक झाल्यास त्वरित १९३०/१९४५ वर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.