inside नाशिक News

inside नाशिक News News and Updates About Nashik

01/05/2025
नाशिक: पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या आरोपीला २४ तासांत अटक ! नाशिक । ३० एप्रिल २०२४: पोलिसांच्या हाताला हिसका देत ...
01/05/2025

नाशिक: पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या आरोपीला २४ तासांत अटक !
नाशिक । ३० एप्रिल २०२४: पोलिसांच्या हाताला हिसका देत पळून गेलेला संशयित आरोपी क्रिश शिंदे याला पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.
काठे गल्लीतील युवकावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेला संशयित क्रिश शिंदे (रा. भद्रकाली) हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या मित्राच्या दुचाकीवरून पळून गेला होता. मंगळवारी (दि. २९) दुपारी १ वाजता हा पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने वेगवेगळी पथके तयार करून सदर आरोपी व त्यास पळुन जाण्यात मदत करणाऱ्या इसमाचा नाशिक शहरात व आजुबाजुचे ग्रामीण परीसरात कसोशीने शोध घेतला. त्यावेळी आरोपी क्रिश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी, रा. कथडा, नाशिक याला व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याचेकडे आरोपी क्रिश शिंदे याचेबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने क्रिश शिंदे याला रात्रीच्या सुमारास निलगीरी बाग, आडगाव शिवारात सोडल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर तो कुठे गेला गेला याबाबत त्याला माहिती नसल्याचे सांगितलेले.
काही एक माहीती नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने सदर आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसतांना मानवी कौशल्याने व तांत्रिक पध्दतीने तपास करून सदर आरोपीस २४ तासांच्या आत इगतपुरी शिवार, जि. नाशिक येथुन ताब्यात घेतले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, विक्रम मोहीते हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते, भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार: सतिष साळुंके, कय्युम सैय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश जुद्रे, पोलीस शिपाई: धनंजय हासे, तौसिफ सैयद, जावेद शेख, गुरू गांगुर्डे, सागर निकुंभ, योगेश माळी, उत्तम खरपडे यांच्या पथकाने केली

10/04/2025

प्रशासन मस्त नागरीक त्रस्त
*सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव यात्रेचे प्रशासनाचे नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांचे हालच हाल*

10/04/2025

मुंबईत दोन्ही मुलं अधिकारी, नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, स्वत:लाही संपवलं..

02/04/2025

नवीन नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच उत्तम नगर येथील शिवपुरी चौकात राहणार मुलाचा स्टेडियम परिसरा मधे खून झाल्याची समजते.
InsideNashikNews

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे लिहून वादात अडकलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्ट...
28/03/2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे लिहून वादात अडकलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिला आहे. ७ एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. माझ्या जीवाला धोका असून महाराष्ट्रातील कोर्टासमोर उभा राहू शकत नाही असं कुणाल कामराने त्याच्या याचिकेत म्हटलं होते. त्यातच मुंबईतील खार पोलिसांनी ३१ मार्च रोजी कुणाल कामराला हजर राहण्यासाठी दुसरं समन्स पाठवले आहे.

28/03/2025

वडाळा गाव म्हाडा बिल्डिंगच्या बाहेर 100 फुटी रस्त्यावर बिल्डिंग क्रमांक A7 च्या बाहेर येथे डीवाईडर मध्ये बसून दहा ते पंधरा लोक रोज गांजा चरस पितात, येता जाता नागरिकांना खूप त्रास होतो.
नागरिक त्रस्त गांजा पिणारे मस्त

28/03/2025

Breaking News|
नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटमध्ये मधमाशांचा हल्ला | नातेवाईकांसह रुग्णांची उडाली धावपळ.. पाच ते सहा जण हल्ल्यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती...

ओझर बलात्कार प्रकरण आरोपी हा अल्वावयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेसदर अल्पवयीन मुलीवरसामूहिक बलात्कार झाला न...
26/03/2025

ओझर बलात्कार प्रकरण आरोपी हा अल्वावयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

सदर अल्पवयीन मुलीवर
सामूहिक बलात्कार झाला नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे....

दुःखद निधन:नाशिक महापालिकेचे माजी कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांचे काही वेळापूर्वीच दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धा...
25/03/2025

दुःखद निधन:
नाशिक महापालिकेचे माजी कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांचे काही वेळापूर्वीच दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

24/03/2025

नाशिक मध्ये रिक्षा चालकाकडून होणारी महिलांची छेड व दादागिरी कधी थांबणार? आज पुन्हा गंजमाळ सिग्नल वर एका रिक्षावाल्याने इनोवा गाडी अडवून एका लेडीजला शिवीगाळ व मारहाण केली
अशी दादागिरी भर चौकात शर्ट वरती करून मोबाईल रेकॉर्डिंग चालू असताना सुद्धा लेडीज ला शिवीगाळ मारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि गुर्मीने म्हणतो निकाल रेकॉर्डिंग मेरा कुछ वाकडा नही करेगा कोई

Nashik City Police

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात दोघं भावांची धारदार शास्त्रांनी निर्गुण  हत्या करण्यात आली.. या दोघ...
19/03/2025

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात दोघं भावांची धारदार शास्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आली..

या दोघा भावांची हत्या झाल्याने उपनगर परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे....

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when inside नाशिक News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to inside नाशिक News:

Share