09/09/2026
यावेळी जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेणाऱ्या मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई या दोन्ही मंत्र्यांनाही शेलक्या भाषेत लक्ष्य केले. तुम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक झालात म्हणून जातीला विसरणार का? एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का? अशी टिप्पणी त्यांनी केली. माझी भाषा आता बदलणार नाही, तर आता यापेक्षा ती तिखट होईल, असेही मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.