
16/01/2025
सूर्याला तलवारीचा धाक दाखवायचा नसतो !
धैर्य, शौर्य, आणि ज्ञानाच्या तेजाने सारा हिंदुस्थान उजळून टाकणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अजरामर प्रेरणास्रोत आहेत.
आज त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या पराक्रमाला व दूरदृष्टीला त्रिवार मानाचा मुजरा ! छत्रपतींच्या अद्वितीय नेतृत्वाखाली स्वराज्य अधिक बळकट झाले, संस्कृतीचं रक्षण झालं, आणि स्वाभिमानाने झुंजण्याची प्रेरणा मिळाली.
छत्रपतींच्या या महान कार्याला कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपण समाजासाठी व स्वराज्यासाठी योगदान द्यायला सदैव तत्पर राहूया.
जय शंभूराजे! जय हिंदवी स्वराज्य !