01/06/2026
नाशिक : सटाणा येथील जुन्या अमरधाममध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री घडलेल्या कथित अंधश्रद्धाजन्य प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही व्यक्ती स्मशानभूमी परिसरात संशयास्पद विधी करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यापूर्वी या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, पुष्प, कवड्या तसेच इतर साहित्य वापरून पूजाविधी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता समोर आलेल्या व्हिडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
#अंधश्रद्धा