Police Today

Police Today Daily updates of everything that you need know about what is going on in the city...

मंगेश हरिश्चंद्र फदाले, विशेष प्रतिनिधी-मुंबईजे. जे .समूह रुग्णालयाच्या आपत्कालीन प्रवेशद्वाराच्या बाहेर गेले दोन दिवस ए...
06/09/2020

मंगेश हरिश्चंद्र फदाले, विशेष प्रतिनिधी-मुंबई
जे. जे .समूह रुग्णालयाच्या आपत्कालीन प्रवेशद्वाराच्या बाहेर गेले दोन दिवस एक वयोवृद्ध इसम जखमी अवस्थेत पडून आहे त्याकडे कोणी लक्ष देईल का???....
दोन, तीन दिवसांपासून त्याचं विव्हळणे चालू आहे.! त्याच्या वेदनांची कोणी दखल घेईल का??....
तो असा रस्त्यावर का पडला आहे आणि त्याच्या वरती काही प्रथमोपचार होतील का.??..भर पावसा मध्ये देखील तो भिजत होता!..त्याची नेमकी समस्या काय आहे ....हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल का....??
मुळात त्याचा सध्या जीव वाचवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी कोन पुढाकार घेईल....????

ताळेबंद आणि प्रशाकीय गोंधळ..!या करोना काळत टाळेबंदी जारी झाल्यापासून केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी जारी केलेल्या नव...
06/05/2020

ताळेबंद आणि प्रशाकीय गोंधळ..!

या करोना काळत टाळेबंदी जारी झाल्यापासून केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी जारी केलेल्या नवनव्या आदेशांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. हे इतके आदेश वाचून पालन करायचे असेल तर संबंधितांचे डोके फिरले नाही तरच नवल. टाळेबंदीचे अद्याप दीड आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे या एकूण आदेशांची संख्या दुपटीने वाढण्यास हरकत नाही. आपल्याकडच्या या प्रशासकीय गोंधळामागे एक कारण आहे.
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात करोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव नाही. असे असताना मग दारूविक्री सुरू करण्याचा तसेच या स्थलांतरित मजुरांना मूळ गावी परत पाठवण्याचा निर्णय सरकारने कोणत्या तोंडाने घेतला? तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्री चालत असेल, तर ती मग दुसऱ्या टप्प्यातही चालायला हवी होती. या दोन टप्प्यांच्या दरम्यान राज्य असो वा केंद्र, या सरकारांनी काही चमकदार वैद्यकीय दिवे लावल्याचे दिसले नाही. तसेच या सरकारांच्या कार्यक्षमतेमुळेच करोनावर नियंत्रण येते आहे असेही कोणते चिन्ह नाही. पण तरी मद्यविक्रीस परवानगी. कारण सरकारला वाटले म्हणून? हे असे वाटण्याची बुद्धी आधी का नव्हती, याचे काहीही तार्किक उत्तर नाही. व्यवस्थित अंतर पाळून ग्राहक जर मद्यखरेदी आता करू शकतात, तर ते तेव्हाही करू शकले असते. आणि यातून मद्यच काय, सर्व काही खरेदीची सोय त्यांना असायला हवी होती. तिसऱ्या टप्प्यात मद्य तेवढे जीवनावश्यक, पण केशकर्तन, अंतर्वस्त्रे किंवा कपडे खरेदी आदी घटक हे जीवनावश्यक नाहीत, हे सरकारचे तर्कट अजबच म्हणायचे.
तिसऱ्या टप्प्यात मजुरांचे स्वगावी परतणे योग्य; पण दुसऱ्या टप्प्यात मात्र ते अयोग्य. या मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली ती सरकारी धोरणांमुळे. शब्दश: हातावर पोट असणाऱ्या या मजुरांवर सरकारी वरवंटय़ामुळे उपासमारीची वेळ आली. मुळातच जेमतेम असलेली त्यांच्याकडची रोकड संपली. ती संपण्यास कारणीभूत निर्णय सरकारचा. आणि ते संपल्यावर हेच सरकार त्यांना उपकाराच्या भूमिकेतून आपापल्या गावी पाठवताना त्यांचा प्रवासखर्च मागणार. या स्थलांतरितांची दुरवस्था अनेक माध्यमांनी दाखवून दिली. परत या मजुरांची स्थानिक पोलीस ठाण्यांत नोंदणी हवी आणि त्यांच्याकडे करोनामुक्तीची वैद्यकीय प्रमाणपत्रेही हवीत. यात पोलिसांचा संबंध का आणावा असे सरकारला वाटले, याचे उत्तर सामान्यांच्या बुद्धीपलीकडचेच असावे. आणि करोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्याइतक्या चाचण्या करण्याची मुळात कोणत्याही सरकारची ऐपत नाही. तेव्हा हे मजूर अशी आजारमुक्तीची प्रमाणपत्रे आणणार कोठून, याचाही काही विचार नाही. यामुळे अशा प्रमाणपत्रे मिळवून देणाऱ्याच्या उत्पन्नाची तेवढी सोय झाली. यात सरकारी संवेदनशून्यता किती असावी त्याला काही सुमारच नाही.
प्रशासनाचा स्वभाव, हे ते कारण. आपली राष्ट्रीय प्रशासनिक मानसिकता ही ‘बंद करा’, ‘बंदी घाला’ किंवा ‘प्रतिबंधित करा’ हेच करण्यात धन्यता मानते. किंबहुना त्यांना तेच करता येते. कारण त्यांनी तेच करावे अशीच आपली जडणघडण आहे. हा आपल्या ‘गप्प बसा’ या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा परिणाम. काही तरी करून दाखवण्यापेक्षा आहे ते बंद करून दाखवण्यातच आपले प्रशासन धन्यता मानते. नेपाळला जाणारे विमान पळवले गेले?- घाला नेपाळला जाणाऱ्या विमानांवर बंदी. विषारी मद्यामुळे काहींनी प्राण गमावले?- घाला सर्वच मद्यावर बंदी.. हे आणि असेच निर्णय घेण्यास आपले प्रशासन सरावलेले आहे. त्यांना करोनाकाळ म्हणजे अधिकार गाजवण्याची सुसंधी. कारण या काळात काहीही केले तरी त्याविरोधात बोभाटाहोण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यातील एक जिल्हाधिकारी वर्तमानपत्रांचे वितरण अजिबात होऊ देणार नाही, असे म्हणतात; तर दुसरे सकाळी दहानंतर एकही वर्तमानपत्र विकू देणार नाही, अशी धमकी देतात. कशाचा कशाशी ताळमेळ नाही आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आताही स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांचा अत्यानंद कोणता?
तर आपल्या अधिकारकक्षेत आपण कडेकोट बंद कसा करून दाखवला याचा. सर्व प्रशासकीय प्रेरणांचे बीजच मुळी हे सुनियोजिततेपेक्षा सक्तीच्या शांततेत बंद पाळून दाखवण्याचे. करोनाकाळाचा आपण काही धडा शिकणारच असू तर आपल्या सरकारी अधिकाऱ्यांची या ‘बंदी’शाळेतील विद्यार्थीदशा संपवायला हवी. जगाची प्रगती काही तरी करून दाखवणाऱ्यांकडून होते. आणि काही तरी करणे म्हणजे सुरू आहे ते बंद करून दाखवणे नव्हे.

01/05/2020

हिंदू पुराणकथेमध्ये याची नोंद आहे की नाही हे माहित नाही ... परंतु संदर्भ आवडला, म्हणून शेयर करतोय..

एकदा भगवान इंद्र शेतकर्‍यांवर चिडले, त्यांनी जाहीर केले की 12 वर्षे पाऊस पडणार नाही .. आपण पिके घेण्यास सक्षम नसाल...

भगवान इंद्रांकडून शेतकर्यांनी विनम्रतेची विनवणी केली.
इंद्र देव म्हणाले की, भगवान शिवने आपला डमरू वाजविला ​​तरच पाऊस शक्य आहे! परंतु त्यांनी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकर्‍यांशी सहमत न होण्याची विनंती केली होती. जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर डमरु वाजवला जाईंल असे सांगितले ..

निराश शेतकर्‍यांनी 12 वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.

परंतु एक शेतकरी नियमितपणे राबत होता, मशागत करत होता . बियाणे पेरत होता. इतर शेतकरी त्या शेतकर्‍याची चेष्टा करत होते. काही वर्षांनी , इतर शेतकर्‍यांनी त्याला विचारले , “१२ वर्षे पाऊस पडणार नाही हे आपणास माहित असताना तुम्ही आपला वेळ व उर्जा का वाया घालवत आहात?”

त्याने उत्तर दिले, “मला माहीत आहे का पीक येणार नाही .. परंतु मी हे काम मी केवळ “सराव ”म्हणून करतो आहे. 12 वर्षानंतर मी पिके उगवण्याची आणि शेतात काम करण्याची प्रक्रियाच विसरुन जाईन. शरीराची श्रम करण्याची सवय मोडेल, म्हणूनच मी हे करत राहतो जेणेकरून 12 वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड वाटणार नाही ”

त्यांचा युक्तिवाद ऐकून देवी पार्वतीस कौतुक वाटले व ती भगवान शिवला मजेत म्हणाली , “तुम्ही पण 12 वर्षानंतर डमरू वाजवणे विसरू शकता!”

भगवान शिवलाही काळजी वाटली. डमरु वाजतो की नाही हे तपासण्यासाठी म्हणुन त्यांनी डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला. डमरुचा आवाज ऐकताच पाऊस पडु लागला .. आणि नियमितपणे काम करणार्या त्या शेतकर्याच्या शेतात भरभरून पीक आले, बाकी सगळ्यांना मात्र पश्चाताप झाला..

“ सराव “आपल्याला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. सराव म्हणजे तारुण्याचे गुपित..

2 आठवडे, 2 महिने किंवा 2 वर्षानंतर कधीतरी लॉकडाउन संपेल..त्याकडे डोळे लावुन बसण्याएवजी एक गोष्ट नक्की करा .. ज्या व्यवसायात आहात किंवा क्षेत्रात आहात , त्यातील आपली कौशल्ये धारदार करीत रहा, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा .
… आज आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा, स्वतःला अजुन कसं चांगले करता येतील याकडे लक्ष द्या ..
.. जेणेकरुन जेव्हा पुन्हा काम करायची वेळ येईल तेव्हा सगळी आव्हाने पूर्ण करण्यास तयार असाल..

लेख कोणी लिहला आहे माहीत नाही, पण त्यांचे मनापासून आभार ...बाकी काय मनाचे भास आणि कल्पनेचे खेळ आहेतच पण त्या आपले काम आणि त्यासाठी लागणारे कौशल्य कसे वाढवता येईल याची तयारीत राहा आणि आपले ज्ञान वाढवत राहा म्हणजे येणाऱ्या काळात आपले जीवन अजून सुखकर होईल. आज 1 मे 2020 महाराष्ट्र व कामगार दिनी आपल्याला हार्दिक शुभेच्या...💐

30/04/2020

आरोग्य, समृध्दी आणि प्रबळ इच्छा शक्ती असेल तर
आपल्या मार्गावर कोणीही येऊ शकत नाही. आपण एकजूट होऊन व्रत घेऊयात की या कढीन समयी आपल्या राज्याला शासनाला नव्या उंची गाठण्यासाठी धर्य देऊया. घरात राहा. सुरक्षित राहा. महाराष्ट्र व कामगार दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर...
27/04/2020

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी इथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.

भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी जाहीर झाली आहे. केवळ चौघांच्या उपस्थितीत भेंडवळ घटमांडणीचं भाकीत जाहीर करण्यात आलं. यंदा पाऊस भरपूर होईल पण पीक परिस्थिती साधारण राहील, देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवलं आहे.

चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी सकाळी सूर्योदयावेळी हे भाकीत वर्तवलं आहे.

दरम्यान, यंदा वर्तवण्यात आलेल्या भाकितामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होईल, देशावर नैसर्गिक संकट ओढवेल. संरक्षण व्यवस्था मजबूत जरी असली तरी शत्रूच्या कारवाया सुरुच राहतील, त्यामुळे सर्वांना सोबत राहून संकटाशी सामना करावा लागेल, असं म्हटलं आहे.

आपल्या शाळेच्या सुरूवाती पासून  सर्वजण ए पासून झेड पर्यंत शिकलो आहोत. म्हणजे A फॉर Apple  B फॉर BollC फॉर Cat इथून  पुढे...
25/04/2020

आपल्या शाळेच्या सुरूवाती पासून सर्वजण ए पासून झेड पर्यंत शिकलो आहोत. म्हणजे
A फॉर Apple
B फॉर Boll
C फॉर Cat
इथून पुढे ... आपल्या सर्वांना हे पुन्हा शिकावे लागेल, परंतु वेगळ्या अर्थाने. माझ्यावर विश्वास ठेवा हे आम्हाला कोविड_19 विरूद्ध लढा जिंकण्यास मदत करेल.

http://www.lokhitwadi.in/2020/04/blog-post_55.html
24/04/2020

http://www.lokhitwadi.in/2020/04/blog-post_55.html

मेेधाताई पाटकर व नासिक येथून पत्रकार रत्नदीप सिसोदिया यांनी फिरविली चक्रे! नेहमीच पोलिसदादा कडे वाकड्या नजरेने ....

पोलिसांना एकदा बनऊन पहा आपला मित्रनक्कीच बदलता येईल आपल्याला समाजाचे चित्र
23/04/2020

पोलिसांना एकदा बनऊन पहा आपला मित्र
नक्कीच बदलता येईल आपल्याला समाजाचे चित्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देण्याकरिता केंद्राकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशामध्ये केंद्र सरकारने...
06/04/2020

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देण्याकरिता केंद्राकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशामध्ये केंद्र सरकारने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान ,राज्यपाल ,केंद्रीय मंत्री व सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही ३० टक्के कपात होणार आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

त्याचप्रमाणे, खासदारांच्या दोन वर्षांचा खासदार निधीही केंद्र शासनाने रद्द केला आहे.२०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली, असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. कोरोनाशी सामना करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली | कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांची 30 टक्के पगार कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्र...

03/04/2020

करोना संकट काळात महिला जनधन खात्यात प्रत्येक महिन्याला 500 रुपये पुढील तीन महिण्यासाठी टाकण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार 3 एप्रिल ते 9 एप्रिल या काळात ते टाकण्यात येतील. IBA च्या आदेशानुसार सर्व बँकांना सूचित करण्यात आले असून पैसे टाकणे सुरू देखील झाले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महिला जनधन खात्यात पुढील तीन महिण्यासाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत महिला खाते धारकाच्या मदतीची रक्कम टाकली जाईल. खाते धारकाच्या शेवटच्या खाते नंबर नुसार वेगवेगळ्या दिवशी टाकले जातील ज्यामुळे काही गडबड नाही होणार याची खात्री घेण्यात अली असून पुढील नियमप्रमाणे असेल.
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 0 किंवा 1 असेल त्याच्या खात्यात 3 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 2 किंवा 3 असेल त्याच्या खात्यात 4 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 4 किंवा 5 असेल त्याच्या खात्यात 5 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 5 किंवा 6 असेल त्याच्या खात्यात 6 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 7 किंवा 8 असेल त्याच्या खात्यात 8 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल
# ज्या खाते धारकांचा शेवटचा अंक 8 किंवा 9 असेल त्याच्या खात्यात 9 एप्रिल रोजी रक्कम टाकण्यात येईल

लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ताळेबंद निर्णया नंतर वित्त मंत्री माननीय निर्मला सीताराम यांनी सांगितले होते की, महिला जनधनं खात्यात प्रत्येक महिन्याला 500 रुपये टाकले जातील. एकूण जनधन खात्यानं पैकी 53 टक्के महिलांचे जनधन खाते आहे. यानुसार 20 करोड महिलांना याचा लाभ मिळणार . यानुसार पहिल्या हप्त्याची सुरवात देखील जाली आहे ....

03/04/2020

सकाळी 6 वाजल्या पासून सर्व न्युज चॅनेल्स बांबरडींग करत होती की सकाळी 9 वाजता माननीय प्रधानमंत्री श्री. मोदीजी चा विडिओ मॅसेज येणार आहे ... पण ऐकून निराश झालो. हे साऱ्या जगाला माहीत आहे की ते एकटे नाही सारं जग यातून सुटलेले नाही. सकाळ पासून सर्व न्युज चॅनेल्स तर्क लावत होती की, माननीय मोदीजी ताळेबंदवर बोलतील, त्याच्या पुढच्या पॉलिसीज सांगतील, पर्शिअल लॉक डाउन कसे असेल. ज्या मेडिकल एवयीपमेंट्स व्हा तुटवडा आहे यो कसा भरेल. लोकांसाठी काही विशेष सवलती असतील का. असे बरेच काही चर्चा न्युज चलेन्स वर चालत होती. आणि प्रत्येकशात जेव्हा माननीय मोदीजी आले तेव्हा मात्र या साऱ्या गोष्टीचा व्हॉट युज झाला. अत्ता ते प्रधान मंत्री आहेत त्यामुळे ते काहीही विचार करून लोकांना करायला सांगू शकतात. पण त्याचा खरंज काही उपयोग आहे का याचे मनणं करावे. तसेही हीच गोष्ट काल राम नवमी च्या प्रीत्यर्थ करण्यात आलेली आहे. आणि त्या साठी काही कारणे होती. पण हे जे काही 5 तारखेला करायचे आहे त्याला काही महत्त्व आहे का याचा विचार व्हावा. मला वाटले की माननीय प्रधानमंत्री मोदीजी काही विशेष सांगतील. मला तर शंकाच आहे घंटीच्या नाद करायला सांगितले तेव्हा भक्तांनी ड्रम, सिलेंडर, घरचे पत्रे वाजवले. आत्ता काय माहीत हेच लोक दिवा लावण्या ऐवजी आग लावतील का काय.? जे लोक लॉक डाउन पालन नाही करत आहे त्याच्या विषयी काहीच उदगार नाही. 22 तारखे प्रमाणे 5 तारखेलाही रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपल्या म्हणण्यानुसार लोक करोना केसेस च्या केस मध्ये त्यांना एकटे वाटू नये म्हणून लोक दिवा, मेणबत्ती, किंवा टॉर्च लाईट लावतील ही पण लोकांन शकत मलाही कळणार नाही की ही गोष्ट का कश्यासाठी करण्यात आली. माननीय मोदीजी आपण खूप चांगले काम करत आहात. कदाचित तुमचा हा विचार ही योग्य असेल. पण लोकांना हे कळणार कसे.मला असे वाटते की जो पर्यंत दोन मुलं असणाऱ्या कडून टॅक्स घेऊन दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना फुकट धान्य जोवर देण्यात येईल तो पर्यंत या देशाचे काहीही नाही होऊ शकत. डिसेंम्बर पासून जगाला करोना ची लागण व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हा पासून का मेडिकल equipmets ची व्यवस्था का करणयात आली नाही. का भारताच्या लोकांनी शासना शकत असे गृहीत धरले होते की आपल्याकडे हे होणार नाही. किंवा झाल्यावर बघू. ....असो शेवटी आपल्या मताची आणि भक्ताची संख्या खूप मोठी आहे. त्या नुसार होणार . देव तुमचे भले करो....!

Address

Flat No. 8, Nirmal Apartment
Nashik
422005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Police Today posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Police Today:

Share